Sonakshi & Zaheer Esakal
Premier

Sonakshi & Zaheer Wedding : सोनाक्षीच्या हातावर रंगली झहीरच्या नावाची मेहंदी ; फोटो झाला सोशल मीडियावर व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

Sonakshi Sinha : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इकबाल ही जोडी २३ जून २०२४ ला लग्नबंधनात अडकतेय. त्यांच्या लग्नाआधीच्या सभारंभाना सुरुवात झालीये. सोशल मीडियावर त्यांच्या घराला केलेल्या सजावटीचे फोटो चर्चेत असून त्यांच्या मेहेंदी समारंभाचा फोटोही व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर सोनाक्षी आणि झहीरच्या मेहंदीच्या फोटोने लक्ष वेधून घेतलं आहे. लाल आणि पिवळ्या रंगाचा ड्रेस सोनाक्षीने घातला होता तर झहीरने लाल रंगाचा प्रिंटेड कुर्ता आणि पायजमा घातला होता. त्यांच्या मित्रांबरोबर फोटोसाठी पोझ करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर या कार्यक्रमासाठी फुलांची सजावट करण्यात आली होती.

झहीरचा मित्र जाफर अली मुन्शीने सोशल मीडियावर सोनाक्षी-झहीरच्या मेहेंदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे शत्रुघ्न सिन्हांनी लेकीच्या लग्नानिमित्त त्यांच्या 'रामायण' घर सुंदर सजवलं आहे. संपूर्ण घरावर रोषणाई करण्यात आली असून हे फोटोही सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

सोनाक्षी आणि झहीर २३ जूनला रजिस्टर पद्धतीने लग्न करणार आहेत. झहीरच्या घरी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सभारंभ पार पडणार असून त्यानंतर दादरमधील बॅस्टियन रेस्टॉरंटमध्ये पार्टी पार पडणार असून याला अनेक सेलिब्रिटीज उपस्थित राहणार असल्याचं म्हंटलं जातंय. दरम्यान, सगळ्याबाबत सोनाक्षी आणि झहीर कडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही.

घरच्यांची नाराजी

सोनाक्षी झहीरशी लग्न करत असल्यामुळे सिन्हा कुटूंब आणि तिच्यामध्ये वाद असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र शत्रुघ्न लाडक्या लेकीच्या लग्नाला आनंदाने उपस्थित राहणार असल्याचं समजतंय पण तास आनंद सोनाक्षीचे भाऊ आणि आई याना झाला नाहीये. लग्नसभारंभात तिची आई आणि दोन्ही भाऊ उपस्थित राहणार कि नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. इतकंच नाही सोनाक्षीच्या लग्नाच्या तयारीतही तिची आई कुठेही सहभागी झालेली पाहायला मिळाली नाही. इतकंच नाही तर त्यांनी तिला सोशल मीडियावरूनही अनफॉलो केलं आहे. आता सिन्हा परिवारातील हा दुरावा मिटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Winner: गुलिगत धोका फेम सुरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता; बिग बॉसची ट्रॉफी निघाली बारामतीला

Indian Air Force च्या Air Show मध्ये चार जणांचा मृत्यू, ९६ जण जखमी, घटनेनं खळबळ

IND vs BAN: भारतीय गोलंदाजांच्या चक्रव्ह्युवमध्ये अडकले बांगलादेशी फलंदाज! सूर्याच्या शिलेदारांसमोर १२८ धावांचे लक्ष्य

Dombivali Traffic : डोंबिवलीत अभूतपूर्व वाहन कोंडी; 5 मिनिटांच्या प्रवासासाठी लागला तासभर

Bigg Boss Marathi 5 Winner LIVE: सुरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५' चा विजेता, वाचा ग्रँड फिनालेमध्ये नेमकं काय काय घडलं

SCROLL FOR NEXT