Sonu Nigam SAKAL
Premier

Sonu Nigam: "या घाणीमुळेच मी..."; व्हायरल झालेल्या ट्वीटवर अखेर सोनू निगमनं सोडलं मौन

lok sabha elections 2024: ट्वीट व्हायरल झालेल्यानंतर अनेकांनी गायक सोनू निगमला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अशातच आता सोनू निगमनं या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.

priyanka kulkarni

Sonu Nigam: प्रसिद्ध गायक सोनू निगम (Sonu Nigam) हा काही दिवसांपासून चर्चेत आहे. मंगळवारी लोकसभा निवडणुकीचे (lok sabha elections 2024) निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत अयोध्येतील (Ayodhya) भाजप (BJP) उमेदवाराचा पराभव झाला. या निकालाबाबत एक ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे ट्वीट सोनू निगम नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले होते. हे ट्वीट व्हायरल झालेल्यानंतर अनेकांनी गायक सोनू निगमला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अशातच आता सोनू निगमनं या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाला सोनू?

सोनूने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, 'मला आश्चर्य वाटते की, वृत्तवाहिन्यांसह अनेक लोकांना वाटलं की ते ट्वीट मी केलं आहे. त्यांनी त्या अकाऊंटची प्राथमिक तपासणीही केली नाही. त्या ट्विटर हँडलवर 'सोनू निगम सिंग' असे लिहिले आहे आणि त्या अकाऊंटच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं आहे, ते अकाऊंट ज्या व्यक्तीचं आहे तो एक बिहारचा फौजदारी वकील आहे."

"या घाणीमुळेच मी 7 वर्षांपूर्वी ट्विटर सोडले होते. अशा सनसनाटी राजकीय टिप्पणी करण्यावर माझा विश्वास नाही आणि मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करतो. पण ही घटना माझ्यासाठीच नाही तर माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी देखील चिंताजनक आहे.", असंही सोनूनं सांगितलं.

सोनूने सांगितले की, त्याच्या नावाने सोशल मीडिया अकाऊंट चालवणारी ही व्यक्ती काही काळापासून अशा प्रकारचे पोस्ट करत आहेत. सोनूच्या टीमने हे ट्विटर अकाऊंट असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला आहे आणि 'सोनू निगम' या नावाखाली अशा प्रकारची नाटकं बंद करण्यास सांगितलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अयोध्या या मतदारसंघात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवावर 'सोनू निगम' नावाच्या एका अकाऊंटवरून एक ट्वीट शेअर करण्यात आलं. या ट्वीटमध्ये लिहिलं होतं, "ज्या सरकारने संपूर्ण अयोध्या उजळून टाकली, नवीन विमानतळ दिले, रेल्वे स्टेशन दिले, 500 वर्षांनंतर राम मंदिर बांधले, पूर्ण मंदिर बनवले अर्थव्यवस्था निर्माण करणाऱ्या पक्षाला अयोध्येच्या जागेवर संघर्ष करावा लागत आहे. शर्मनाक है अयोध्यावासियों!"

ट्वीट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी गायक सोनू निगमला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेकांना वाटलं की हे ट्वीट गायक सोनू निगमनं केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT