Star Pravah Serial Esakal
Premier

Video : आणखी एका मालिकेच्या कथानकात पुनर्जन्म ? शुभविवाह मालिकेतील नव्या ट्विस्टची होतेय चर्चा

सकाळ डिजिटल टीम

Star Pravah : सध्या मराठी टेलिव्हिजनवरील मालिकांमधील ट्विस्ट अँड टर्न्स कायमच चर्चेत असतात. स्टार प्रवाहवरील सगळ्याच मालिका टीआरपी च्या शर्यतीत आघाडीवर आहेत. त्यातीलच एक मालिका म्हणजे शुभविवाह. यशोमान आपटे, विशाखा सुभेदार आणि मधुरा देशपांडे यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेच्या नव्या प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावर हा प्रोमो व्हायरल झाला आहे.

नवीन ट्विस्ट

शुभविवाह मालिकेचा नवा प्रोमो नुकताच स्टार प्रवाहच्या सोशल मीडिया हॅन्डलवर शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं कि, रागिणी भूमी आणि आकाशला हनीमूनची तिकीट देते आणि त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करायला सांगते. आकाश आणि भूमी ज्या हॉटेलवर जातात तिथे त्यांच्यासाठी एक कॉटेज बुक केलेलं असतं. ते दोघं कॉलेजमध्ये असताना अचानक रागिणीची माणसं कॉटेजला आग लावतात. भूमी आणि आकाशला जाळून मारण्याचा प्लॅन रागिणी उघड करते. मालिकेचा नवीन भाग २७ जुलैला दुपारी २ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

पहा प्रोमो

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

मालिकेच्या या प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रोमोमुळे 'सुख म्हणजे...' या मालिकेनंतर पुन्हा एकदा या मालिकतेही पुनर्जन्माची गोष्ट पाहायला मिळणार का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. तर अनेकांनी मालिकेत सतत दाखवल्या जाणाऱ्या कारस्थानांवर नाराजी व्यक्त केली आहे. तर काही प्रेक्षक मालिकेतील या नव्या ट्विस्टसाठी उत्सुकही आहेत.

आगामी कथानक

भूमी आणि आकाश या षडयंत्रातून वाचणार का ? मालिकेत आता नवीन काय ट्विस्ट येणार हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल. तेव्हा पाहायला विसरू नका शुभविवाह सोमवार ते शनिवार दुपारी २ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT