Sangeet Manapman First poster Out: जिओ स्टुडिओज आणि सुबोध भावे (Subodh Bhave) यांचा बहुप्रतिक्षित संगीतमय चित्रपट "संगीत मानापमान" (Sangeet Manapman) या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज गुढीपाडव्याचे (Gudhi Padwa) औचित्य साधून प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आज रिलीज झालेल्या संगीत मानापमान चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सुबोध भावेचा चित्रपटातील एक वेगळा लूक आणि पेहराव पाहता या चित्रपटाची भव्यता झळकून येत आहे.
"संगीत मानापमान" या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका सुबोध भावे करणार असून, ‘कट्यार काळजात घुसली‘ तसंच ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर‘ या चित्रपटाची संपूर्ण टीम ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहे. आणि त्याचबरोबर मुख्य म्हणजे प्रसिध्द संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत या चित्रपटासाठी असणार आहे.
सुबोधनं "संगीत मानापमान" या चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "गुढी पाडव्याच्या आणि हिंदू नव वर्षाच्या तुम्हा सर्वाना "संगीत मानापमान" च्या संपूर्ण संघाकडून मनःपूर्वक शुभेच्छा, येत्या दिवाळीत सजणार,मराठी परंपरेचा साज,मनामनात गुंजणार, सुरेल गीतांचा आवाज.....", सुबोधनं शेअर केलेल्या पोस्टरला कमेंट करुन अनेकांनी सुबोधला त्याच्या या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित आणि अभिनित, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या अजरामर कलाकृतीवरून प्रेरित, “संगीत मानापमान" हा संगीतमय चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शनास सज्ज होणार आहे.
लोकमान्य - एक युगपुरु, शुभ लग्न सावधान ,सनई चौघडे, डॉ. काशिनाथ घाणेकर,कट्यार काळजात घुसली या सुबोधच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. गेल्या काही दिवसांपासून सुबोध हा त्याच्या अलीबाबा आणि चाळीशीतले चोर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता प्रेक्षक सुबोधच्या “संगीत मानापमान" या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.