Subodh Bhave sakal
Premier

Subodh Bhave: "तू भेटशी नव्याने"; सुबोध भावेनं शेअर केला जुना फोटो; खोलीत लावलेल्या 'या' अभिनेत्रीच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

priyanka kulkarni

Subodh Bhave: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. सुबोध हा विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करतो. लवकरच सुबोधची "तू भेटशी नव्याने" (Tu Bhetashi Navyane) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सुबोध हा या मालिकेचं प्रमोशन करत आहे. नुकताच सुबोधनं सोशल मीडियावर एक खास फोटो पोस्ट केला आहे. या फोटोनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

सुबोधनं शेअर केला खास फोटो

"तू भेटशी नव्याने" या मालिकेचं प्रमोशन करण्यासाठी सुबोधनं त्याचा एक जुना फोटो सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सुबोध त्याच्या खोलीमध्ये बसलेला दिसत आहे. या फोटोला सुबोधनं कॅप्शन दिलं, जुन्या आठवणींना ....... "तू भेटशी नव्याने"

खोलीत लावलेल्या 'या' अभिनेत्रीच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

सुबोधनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या खोलीत अभिनेत्री पूजा भट्टचा पोस्टर लावलेला दिसत आहे. सुबोधच्या या फोटोच्या बॅकग्राऊंडला पूजाचं सडक या चित्रपटातील "दिल है की मानता नही.. !" हे गाणं ऐकू येत आहे. सुबोधनं शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

"तू भेटशी नव्याने" या मालिकेत सुबोधच्या दोन व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहेत. अभिमन्यू आणि माही अशी नावं त्या भूमिकांची आहेत. चाळिशीतील असणारा अभिमन्यू हा एका कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. तर माही हा ऐन विशितला तरुण आहे. यामधील माही ही भूमिका AI च्या माध्यमातून दाखविला जाणार आहे. सुबोधच्या या मालिकेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. ही मालिका 8 जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT