२७ वर्षानंतर सनी देओल मेजरच्या भूमिकेत दिसणार; 'बॉर्डर २'ची घोषणा
Border 2 sakal
Premier

Border 2: २७ वर्षानंतर सनी देओल मेजरच्या भूमिकेत दिसणार; 'बॉर्डर २'ची घोषणा

सकाळ डिजिटल टीम

भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील कल्ट चित्रपट मानला जाणारा 'बॉर्डर' १९९७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाने प्रचंड कमाई केली. या चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनाला भावलं होतं. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी देशभक्ती जागवली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच 'बॉर्डर २'ची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेता सनी देओल याने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.

आपलं २७ वर्षांपूर्वीचं वचन पूर्ण करण्यासाठी एक भारतीय सैन्यातील जवान पुन्हा परतणार आहे. सनी देओलने या चित्रपटाच्या घोषणेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. चित्रपटाबद्दलची एक झलक शेअर करत सनीने लिहिलं, 'एक सैनिक आपलं २७ वर्षांपूर्वीचं वचन पूर्ण करायला परत येतो आहे. भारताची सगळ्यात मोठी वॉर फिल्म 'बॉर्डर २' येतेय.' यानंतर व्हिडिओमध्ये 'बॉर्डर' चित्रपटातील 'संदेसे आते है' हे गाणं बॅकग्राउंडला ऐकू येतं. जेपी दत्ता , निधी दत्ता आणि भूषण कुमार 'बॉर्डर २' प्रोड्युस करत आहेत. तर अनुराग सिंह याचं दिग्दर्शन करत आहेत.

या चित्रपटाची शूटिंग ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे. तर निर्माते हे या चित्रपटासाठी कोणतीही कमी ठेवणार नसल्याचं सांगत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनी देओलने या चित्रपटाबद्दल सांगितलं होतं. तो म्हणाला, या चित्रपटाची चर्चा २०१५ पासून सुरू होती. मात्र माझे चित्रपट फ्लॉप होत असल्याने मेकर्स हा चित्रपट बनवायला घाबरत होते. मात्र आता 'गदर २'च्या यशानंतर प्रत्येकाला हा चित्रपट बनवायचा आहे. या चित्रपटात कोणकोणते कलाकार असणार याबद्दल अजूनही शंका आहे. मात्र हा चित्रपट २०२६ मध्ये येण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Wari : उरुळी कांचनमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा नगारा रोखला; घटनास्थळी पुणे पोलिस अधीक्षक दाखल

Amol Kolhe: कधी कल्पनाही केली नव्हती, साहेबांमुळे शक्य झालं; पक्षाने मोठी जबाबदारी दिल्याने कोल्हे भावूक

Ashadhi Wari Toll Free : राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या महिला विरोधी विधानांचे पडसाद, पुण्यात 'जोडे मारो' आंदोलन

Kolhapur Rain : धरणांतील पाणी साठा वाढला, कोल्हापुरातील 14 बंधारे पाण्याखाली; शहर परिसरात पावसाचा जोर कायम

SCROLL FOR NEXT