suraj chavan  
Premier

सुरज चव्हाणचं ठरलं! बिग बॉसमधून बाहेर गेल्यावर सगळ्यात आधी 'ही' गोष्ट करणार; म्हणाला- लोकांनी नावं ठेवली पण...

Payal Naik

'बिग बॉस मराठी ५' चा प्रवास आता संपल्यात जमा आहे. या कार्यक्रमाचे शेवटचे काही दिवस उरले आहेत. या आठवड्यात मिडवीक एव्हिक्शन होणार आहे. त्यात आता घरातून बाहेर कोण जाणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ६ ऑक्टोबर रोजीया कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमिअर सोहळा पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी घरात एक मोठं सेलिब्रेशन पार पडलं. त्यात घरातल्या स्पर्धकांचा इथवरचा प्रवास दाखवण्यात आला. या सेलिब्रेशनदरम्यान स्वतःचा प्रवास पाहून प्रत्येकाला भरून आलं. प्रेक्षकांचा लाडका गुलिगत धोकादेखील स्वतःचा प्रवास पाहून भावुक झाला होता. त्या दरम्यान त्याने एक गोष्ट बोलून दाखवली. ते म्हणजे घरातून बाहेर गेल्यावर सगळ्यात आधी तो काय करणार हे त्याने सांगितलं.

सुरजने केला निर्धार

सूरजने सुरुवातीला ‘बिग बॉस’च्या घरात येण्यास नकार दिला होता. मात्र, कालांतराने शोच्या प्रोजेक्ट हेडने त्यांची समजून काढून सूरजला बऱ्याच गोष्टी प्रत्यक्ष भेटून सांगितल्या. त्यानंतर त्याने कार्यक्रमात येण्यास होकार दिला. सूरजला पॅडी, अंकिता, डीपी, अभिजीत या संपूर्ण ‘बी टीम’ने सुरुवातीपासून खंबीर साथ दिली. त्याच्याकडे स्वत:चं राहतं घर नाहीये. त्यामुळे त्याच्या प्रवासाचा व्हिडिओ त्याने पाहिला तो सुरज म्हणाला, 'आपले आई-बाप असेल, तर जीवन आहे नाहीतर काहीच नाही…कोण कोणाला विचारत नाही. मी कोणत्या परिस्थितीतून वर आलोय माझं मला माहिती आहे. देवीच्या जत्रेला गेल्यावर लोक नावं ठेवायचे, काही बोलायचे पण, आता सगळं बदललं आहे. मला खूप मोठी संधी मिळाली याचं मी नक्की सोनं करणार आहे.'

स्वतःचं घर बांधणार आणि...

सुरज पुढे म्हणाला, 'मला हा माझा प्रवास पाहून खूपच भारी वाटलं. मी ‘बिग बॉस’ला कधीच विसरणार नाही. आता हा शो संपल्यावर मी बाहेर जाऊन घर बांधणार…त्या घराला मी ‘बिग बॉस’चं नाव देणार आहे. झापुक झुपूक ‘बिग बॉस’ गुलीगत…बुक्कीत टेंगूळ आणि मी ही ट्रॉफी नक्की जिंकणार.' सुरजने हा निर्धार बिग बॉसच्या घरात केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: कोर्टामध्ये नराधम ढसाढसा रडला; वानवडी अत्याचार प्रकरणी आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी

Video Viral : समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो अन् Rohit Sharma ची मनं जिंकणारी कृती

Pune: एक कॉल अन् विषय संपणार! बारामती हत्या प्रकरणानंतर अजितदादांचं मोठं पाऊल, नव्या उपक्रमाची घोषणा

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेचे नऊ महिन्यांचे पैसे मिळणार; बारामतीमध्ये अजित पवारांची माहिती

Jawan Found After 56 Years: 56 वर्षांनंतर मिळाला जवानाचा मृतदेह! 1968 मध्ये कोसळलं होतं हवाई दलाचं विमान

SCROLL FOR NEXT