Premier

Swapnil Joshi: स्टारडम टिकविण्यासाठी स्वप्नीलने नक्की काय केले? वाचा Exclusive मुलाखत

महिलाप्रधान चित्रपट आणि महिलांभोवती फिरणारी ही कथा असून नामवंत महिला कलाकारांनी यामध्ये काम केले आहे|

सकाळ वृत्तसेवा

संतोष भिंगार्डे

अभिनेता स्वप्नील जोशीने आतापर्यंत एकापेक्षा एक यशस्वी चित्रपट दिले आहेत. अनेक दिग्दर्शक आणि अभिनेत्रींबरोबर त्याने काम केले आहे. आता ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाची निर्मित तो करीत आहे. त्याच्याबरोबरच मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, तेजस देसाई, शर्मिष्ठा राऊत आणि तृप्ती पाटील ही मंडळीदेखील निर्माती आहेत. परेश मोकाशी या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.

महिलाप्रधान चित्रपट आणि महिलांभोवती फिरणारी ही कथा असून नामवंत महिला कलाकारांनी यामध्ये काम केले आहे. १ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यानिमित्त अभिनेता आणि निर्माता स्वप्नील जोशीबरोबर साधलेला संवाद...

- एक अभिनेता म्हणून तुझे स्टारडम टिकविण्यासाठी तू नेमके काय केलेस?

: मला असं वाटतं की एखाद्या अभिनेत्याच्या नशिबात स्टारडम येणं हा एक नशिबाचा भाग आहे. स्टारडम हे एक वेगळं वलय आहे आणि तो वाट्याला येणं म्हणजे एक नशिबाचा भाग , लोकांच्या प्रेमाचा भाग आहे. मला मनापासून असं वाटतं की जे काही स्टारडम असेल छोटं- मोठ ते टिकवण्यासाठी मी काही वेगळं करत नाही. मी नेहमीच चांगला अभिनय करण्याचा आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न करीत असतो. मी व्यावसायिक यशाला जास्त महत्व देतो आणि मला असं वाटतं की मी व्यावसायिक क्षेत्रात काम करतो. माझ्या मते मला जे काही यश मिळतं ते माझ्यासाठी व्यावसायिक असणं गरजेचं आहे. त्यामुळे माझ्या यशाचा मापदंड हा व्यावसायिक यश आहे. कदाचित त्यामुळ ही स्टारडम मला भेटत असेल किंवा भेटत आहे. बाकी स्टारडम टिकवण्यासाठी मी खूप मेहनत करतो. याव्यतिरिक्त काही वेगळं करतो असं मला वाटत नाही.

- चित्रपटसृष्टीत यश- अपयश हे असतेच तर या यशा - अपयशाच्या खेळाबद्दल तू काय सांगशील ?

: यश- अपयश या नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि असं कुठलंच क्षेत्र नाही जिथे आपल्याला अपयशाला सामोरं जावं लागत नाही. इतकंच नाही तर आपल्या वैयक्तिक आयुष्यात देखील आपण अपयश हे बघतच असतो. तसंच चित्रपटसृष्टीत पण असतं. काही जणांच्या वाट्याला यश येत तर काहींच्या वाट्याला अपयश येतं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात यश- अपयश हे असतं आणि मला असं वाटतं की अपयश पचवण्यापेक्षा यश पचवणं जास्त कठीण असतं. कारण ज्या वेळेस तुम्ही अपयशी होता तेव्हा तुमचे पाय जमिनीवर टिकून राहतात पण जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा तुमचे पाय जमिनीवर नसतात आणि त्यावेळेस तुमचे पाय जमिनीवर टिकून ठेवणं जास्त कठीण असतं.

-सध्या चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदललेला आहे तर या बदललेल्या चित्रपटसृष्टीकडे तू कोणत्या दृष्टिकोनातून पाहतोस?

: मी गेली चार दशकं चित्रपटसृष्टीत काम करत आहे. आणि या दरम्यान अनेक गोष्टी बदलल्या. अनेक नवनवीन टेक्नोलॉजी आल्या आणि या काळात मी चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलताना अगदी जवळून पाहिलं आहे.आजच्या घडीला सातत्य ही मोठी ताकद वाटते मला कुठल्याही क्षेत्राच्या बाबतीत आणि तेच सातत्य टिकवणं ही फार कठीण गोष्ट आहे. ज्यांनी ज्यांनी मला माझ्या या चार दशकांच्या प्रवासात साथ दिली ते निर्माते , दिग्दर्शक , माझे सहकलाकार आणि रसिक- प्रेक्षकांच्या आशीर्वादाने ही कला मी आजही टिकवून ठेवू शकलो आणि आजही प्रेक्षकांच्या मनात माझ्या

कलेला स्थान आहे आणि ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.

- एक उत्तम अभिनेता आहेस आणि आता एक नवोदित निर्माता म्हणून तुला नाच गं घुमा हा चित्रपट करीत आहेस. या चित्रपटातील नेमकी कोणती गोष्ट आवडली?

: नाच गं घुमा या चित्रपटात आवडण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. सर्वप्रथम तर हा परेश मोकाशी यांचा चित्रपट आहे. आणि माझ्या लेखी ते या देशातील सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक आहेत. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक घरातला आणि सर्वसामान्य माणसाच्या मनाला हात घालणारा हा चित्रपट आहे. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या चित्रपटाची संपूर्ण टीम खूप छान प्रकारे बांधली गेली आहे आणि प्रत्येक स्त्रीच्या कार्याला सलाम करणारा हा चित्रपट आहे. अशा अनेक गोष्टी यात आवडणाऱ्या आहेत.

: तू एक तद्दन व्यावसायिक अभिनेता आहेस. त्यात परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी ही मंडळी वेगळ्या शैलीतील आहेत. तर त्यांच्यासोबत सुत जमविताना तुला काही त्रास झाला का?

- परेश आणि मधुगंधा हे दोघे हि खूप चांगल्या पद्धतीने चित्रपट बनवतात. खूप वेगवेगळे विषय त्यांच्या चित्रपटातून मांडले जातात. आणि‘नाच गं घुमा' या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाचा विषयच इतका सुंदर आहे की प्रत्येक स्त्रीची मनातली गोष्ट यात मांडली गेली आहे. आणि त्यांना कदाचित माझी व्यावसायिक बाजू आवडली असेल म्हणून ते माझ्या सोबत जोडले गेले असतील. पण खरं सांगायचं तर त्यांच्यासोबत काम करताना मला कसलीही अडचण आली नाही. उलट या गोष्टीचा मला खूप आनंद आहे की मी या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्याशी जोडलो गेलो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh Attack: अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांनी व्यक्त केली 'ही' भीती, म्हणाले- राज्यातील कायदा सुव्यवस्थाच...

Nashik Traffic Route: मतमोजणीसाठी शहरातील वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेचे नियोजन

Google Crome Sell : क्रोम ब्राऊजर विकून टाका! US मधून गुगलच्या मालकांना आला फोन, नेमकं प्रकरण काय?

Eye Care Tips : दुषित हवेचा डोळ्यांवर होतोय थेट परिणाम, डोळ्यांची काळजी कशी घ्यायची, तज्ज्ञांकडून जाणून घ्या

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : छ. संभाजीनगरमध्ये विधानसभा निवडणुक प्रचार, उमेदवारांच्या दुचाकी फेरीमुळे मार्ग खोळंबले

SCROLL FOR NEXT