Gurucharan Singh esakal
Premier

Gurucharan Singh: गुरुचरण सिंह बेपत्ता प्रकरणात मोठी अपडेट; सीसीटीव्ही फुटेज लागलं पोलिसांच्या हाती

Gurucharan Singh: पोलिसांच्या हाती पालम परिसरातील परशुराम चौकातील सीसीटीव्ही फुटेज लागलं आहे.

priyanka kulkarni

Gurucharan Singh: छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) फेम सोढी म्हणजेच अभिनेता गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) गेल्या चार दिवसापासून म्हणजेच 22 एप्रिलपासून बेपत्ता आहे. पोलीस यासंदर्भांत तपास करत असून त्यांच्या हाती आता महत्त्वाची माहिती लागल्याचं समोर आलंय. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागलं असून आता हे अपहरणाचं प्रकरण असू शकतं असा पोलिसांचा अंदाज आहे.

पोलिसांच्या हाती पालम परिसरातील परशुराम चौकातील सीसीटीव्ही फुटेज लागलं असून रात्री 9:14 वाजता गुरुचरण बॅग घेऊन त्या रस्त्याने जात असलेला या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळतोय पण यानंतर तो कुठे गेला याचा आता पोलीस तपास करत आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासूनचे त्याचे आर्थिक व्यवहारही संशयास्पद असल्याचं पोलिसांचं म्हणणं असल्याचं इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात सांगितलं आहे. गुरुचरणने गेल्या काही काळात अनेक आर्थिक व्यवहार केले असून याबाबतची माहिती जाणून घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. तसंच त्याचा फोनही बंद येत असून 24 एप्रिलपर्यंत त्याचा फोन सुरु असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

गुरुचरण काही कामानिमित्त मुंबईला जाणार होता. त्याने याबाबत त्याच्या मित्रांना कळवलं होतं. 22 एप्रिलला सकाळी तो घरातून फ्लाईट पकडण्यासाठी निघाला. रात्री साडेआठ वाजता त्याची फ्लाईट होती पण तो विमानात बसलाच नाही हे आता पोलीस तपासात समजलं. त्याची मैत्रीण भारती सोनी त्याला घ्यायला एअरपोर्टवर पोहोचली पण पोहोचलाच नसल्याचं तिच्या लक्षात आलं. गुरुचरणचे वडील हरगीत सिंह यांनी पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुरुचरण यांना शोधण्याचं आश्वासन त्यांना दिलं आहे.

गुरुचरण यांच्या आई -वडिलांचं वय जास्त असून ते गेल्या बराच काळापासून आजारी असतात. गुरुचरणची आई खूप आजारी असतात, त्या रुग्णालयात दाखल होत्या, पण आता ठीक आहे. पण अचानक तो बेपत्ता झाल्याने घरचे चिंतेत आहेत. पोलिसांवर पूर्ण विश्वास असून ते त्याला शोधून काढतील, असा विश्वास कुटुंबाला आहे. तर मुंबईतील त्याच्या मित्रांना सुद्धा याबाबत माहिती देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. २०२० मध्ये आई-वडिलांची सेवा करण्यासाठी गुरुचरण यांनी 'तारक मेहता...' शो ला रामराम केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT