'तारक मेहता का उलटा चष्मा' फेम अभिनेता गुरुचरण सिंह उर्फ सोढी गेल्या काही दिवसापासूनच बेपत्ता असल्याची बातमी चर्चेत आहे. हे पन्नास वर्षीय कलाकार २२ एप्रिलपासून बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. यासंदर्भात पोलिसांनी केलेल्या तपासात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार गुरुचरण लवकरच लग्न करणार होते आणि आर्थिक अडचणींचाही सामना करत होते.
दिल्ली पोलिसांनी केलेल्या खुलाश्यानुसार, गुरुचरण यांनी एटीएममधून ७००० रुपये काढले होते आणि त्यांचं अखेरचं लोकेशन दिल्लीतील पालम हे ठिकाण दाखवत आहेत. हे ठिकाण त्यांच्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर आहे. २४ एप्रिलला ते या ठिकाणी गेले होते त्यानंतर त्यांचा फोन स्विच ऑफ झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.
रात्री ८:३० वाजता ते दिल्ली एअरपोर्टवरून मुंबईला जाणाऱ्या विमानातून ते प्रवास करणार होते पण त्या दिवशी रात्री ९:१४वाजता पालम भागातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रस्त्याने चालत असल्याचं दिसून आलं. ते कुठे गेले आहेत याचा अद्याप पोलीस तपास करत आहेत.
मुंबईलाही ते पोचले नाहीत आणि दिल्लीमधील त्यांच्या घरीही ते न परतल्यामुळे अखेर त्यांच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या बँक अकाउंटवरील संशयास्पद व्यवहारामुळे पोलिसांनी त्यांची तक्रार बेपत्ता म्हणून न नोंदवता अपहरणाच्या गुन्ह्यांतर्गत नोंदवली असल्याचं समोर आलंय.
गुरुचरण यांनी सोनी सब टेलिव्हिजनवरील 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेत काम केलं होतं. या मालिकेत त्यांनी रोशन सिंह सोढी ही मेकॅनिक असलेल्या गृहस्थाची भूमिका साकारली होती. पार्टी करण्यासाठी काय धडपडत असणारा आणि बायकोला घाबरणारा सोढी प्रेक्षकांना खूप पसंत पडला होता. बराच काळ त्यांनी या मालिकेत काम केलं पण अखेर २०२० मध्ये त्यांनी या मालिकेला रामराम केला. त्यांचे वृद्ध आई-वडील दिल्लीला राहतात. त्यांची काळजी घेण्यासाठी गुरुचरण यांनी मालिका सोडली आणि ते कायमचे दिल्लीला स्थायिक झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.