Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya ESAKAL
Premier

OTT Movie Releases: घरबसल्या पाहा शाहिद आणि क्रितीचा 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'; कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता चित्रपट? जाणून घ्या

OTT Movie Releases: 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक पाहू शकतात? हे जाणून घेऊयात...

priyanka kulkarni

OTT Movie Releases: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) यांच्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या सायन्स फिक्शन रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. अशातच आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक पाहू शकतात? हे जाणून घेऊयात...

'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया'

अनेक सिनेप्रेमींनी ओटीटीवर विविध चित्रपट बघण्याची आवड असते. काही प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघण्याऐवजी ओटीटीवर सिनेमा बघतात. अशातच आता ज्यांनी , शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांचा 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन नाही पाहिला ते आता हा चित्रपट ओटीटीवर पाहू शकतात. प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज झाला आहे.

'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत नुकतीच शाहिद कपूरनं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, "एक प्रेमकथा जी तुमच्या लव्ह स्टोरीची व्याख्या रीबूट करेल!"

'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' चित्रपटाची स्टार कास्ट

'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटात क्रिती आणि शाहिद यांच्यासोबतच डिंपल कपाडिया आणि धर्मेंद्र यांनी देखील महत्वाची भूमिका साकारली आहे.या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साह यांनी केले आहे. दिनेश विजन, ज्योती देशपांडे आणि लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली.

‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात एका रोबोटची आणि एका माणसाची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात क्रितीनं रोबोटची भूमिका साकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

Sakal Podcast: युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

Marathwada: जातीयवाद , प्रांतवाद सोडून द्या अन हिंदूत्वासाठी एकत्र या; कालीचरण महाराजांचे आवाहन...

Mumbai Election: मुंबईत मतदारांची संख्या किती? आकडा वाचुन तुम्हालाही बसेल धक्का

SCROLL FOR NEXT