मराठी मालिकाविश्वातून एक मोठी बातमी समोर येते आहे. स्टार प्रवाहावरील मालिका 'ठरलं तर मग' आणि सोनी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'कारण गुन्ह्याला माफी नाही' चा सहाय्यक दिग्दर्शक गौरव काशिदे याचं निधन झालं आहे. अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती मनवा नाईक आणि अभिनेत्री जुई गडकरी यांनी पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. वाढदिवशीच त्याचा अपघात झाला होता. गेले १० दिवस तो कोमात होता. मात्र आता अखेर त्याची मृत्यूची झुंज संपली आहे. त्यामुळे मालिकाविश्वात शोककळा पसरली आहे.
गौरव 'ठरलं तर मग' आणि 'कारण गुन्ह्याला माफी नाही' या दोन्ही मालिकांचं सहाय्यक दिग्दर्शन करत होता. ‘सोनी मराठी’ वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडियावर पेजवरून गौरव काशिदेला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. जुई गडकरींच्या एक पोस्ट करत लिहिलं, 'ताई मला कोणी ऊठवलंच नाही, म्हणुन लेट झाला यायला! हे त्याचं पहिलं वाक्य होतं आमचं युनिट जॅाईन केल्यावर! पहिल्याच दिवशी लेट आला होता तो! मग रुळत गेला हळुहळु. गुणी मुलगा होता.
रात्री घरी जाताना आमच्या दुसर्या एका महिला सहाय्यक दिग्दर्शिकेला आणि हेअर ड्रेसरला घरी सोडुन जायचा. त्या ही रात्री तो त्या दोघींना चारकोपला सोडुन पुढे गेला. त्या दिवशी नेमकी आमची हेअर ड्रेसर चारकोपलाच ऊतरली. नाहीतर ती रोज त्याच्याबरोबर माहिम पर्यंत जायची आणि तो तिला न्यायचं म्हणुन गाडी सांभाळुन चालवायचा. त्याचा २६ वा वाढदिवस होता १०जुनला. ९तारखेला त्याच्या बाईकचा बांद्रामध्ये भीषण अपघात झाला. त्याच्या ब्रेनला जबरदस्त मार लागला होता. त्याला आमच्या सेटवर येऊन जेमतेम महिनाभरच झाला होता. गेले अनेक दिवस तो Coma मध्ये होता.
आणि काल त्याची मृत्युशी असलेली झुंज अखेर संपली. सेटवर सगळे अजुनही सुन्न आहेत. सगळ्यांना वाटत होतं गैरव परत येईल. गौरव, काल पण तुला कोणीतरी ऊठवायला हवं होतं रे. तु लेट आला असतास. पण आला तरी असतास. तुझ्या आतम्याला शांती मिळो हे तरी कसं लिहायचं? त्या आई बाबांचं आज काय झालं असेल याचा विचारही करुशकत नाही. देव त्यांना बळ देवो.' त्याच्या जाण्याने सगळ्या क्रूवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.