jui gadkari  sakal
Premier

Jui Gadkari: तुम्हाला ठाऊक आहे ना पुरुषांना नेमकं कुठे मारायचं... जुई गडकरीच्या विधानाने उंचावल्या चाहत्यांच्या भुवया

Jui gadkari Interview: अभिनेत्री जुई गडकरीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सेल्फ डिफेंस का महत्वाचा आहे या बद्दल सांगितलं आहे.

Payal Naik

Jui Gadkari On Self Defence: लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी ही 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र करिअरच्या सुरुवातीला जुईला खूप वाईट अनुभव आले. तिला तिच्या रंगावरून हिणवलं गेलं. त्याचप्रमाणे एका सर्वसामान्य मुलीला गर्दीच्या ठिकाणी येणारे अनुभवही तिला आले. कुणीतरी छेड काढली, गर्दीचा फायदा घेतला प्रसंगांना जुई कशा प्रकारे सामोरी गेली याबद्दल तिने एका मुलाखतीत सांगितलं आहे. प्रत्येक पुरुषाला कुठे मारायचं असतं हे तुम्हाला ठाऊक आहे असं जुई म्हणाली.

जुईने नुकतीच इन्सायडर्स या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना जुई म्हणाली, 'प्रत्येकीला स्वतःचं संरक्षण करता आलंच पाहिजे. मला सेल्फ डिफेन्स लहानपणापासून शाळेत शिकवण्यात आलं होतं. आणि आई बाबा मला नेहमी सांगायचे हा क्लास कधी मिस नाही करायचा. मला कराटे क्लासला वगरे घातलेलं पण मी खूप वीक होते. पण मी नेहमीच या गोष्टीच्या मागे असते की प्रत्येक मुलीने स्वतःचा सेल्फ डिफेन्स हा करायलाच हवा. आता असं राहिलं नाहीये की कुणीतरी मला वाचवायला येईल. नाही तुम्हाला स्वतःचा बचाव करता आला पाहिजे.'

मनातून खचलात ना तर

जुई पुढे म्हणाली, 'उद्या जर का एखादी व्यक्ती तुमच्या बाबतीत गैर काहीतरी करतेय तर तुम्ही ओरडणार आहेत का फक्त की त्याच्या दोन कानाखाली लागवणार आहेत? मान्य आहे मला मी ५ फुटाची आहे आणि समोरची व्यक्ती साडे सहा फुटाची आहे. मी त्याच्या कानाखाली नाही मारू शकत. माझ्याकडे बरेच टेक्निक आहेत. पुरुषांना कुठे मारायचं हे प्रत्येक स्त्रीला माहीत आहे. ते तुम्ही करूच शकता. तुमची नखं असतात. ताकद ही डोक्यात असते. तुमच्या शरीरात नसते. तुम्ही आधीच मनातून खचलात ना तर तुमचं शरीर काम नाही करणार.'

का सहन करतेय?

जुई म्हणाली, 'कुठेही प्रवास करताना तुम्ही स्वतःला अलर्ट ठेवलं पाहिजे. आता कुठून कधी काय होईल आपल्याला नाही माहीत. त्यामुळे स्वप्नात राहू नका. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात. ट्रेनमधून जाताना तुम्हाला कुणीतरी हात लावतं आणि तुम्ही ए क्या करता हैं म्हणत गप्प बसता? नाही वाजवा त्याच्या कानाखाली. त्याला कळलं पाहिजे हे चूक आहे. मी तर मारलेलं आहे. मी मारते. माझं डोकं या बाबतीत भयानक सटकतं. मलाच नाही समोरच्या मुलीला जरी त्रास दिला असेल तरी मी तिला पण दोन शिव्या घालेन की काय चाललंय? का सहन करतेय?' जुईची ही मुलाखत सध्या चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT