Guna Caves  esakal
Premier

Guna Caves: आतापर्यंत 16 जण गायब..डेव्हिल्स किचन उर्फ गुणा गुहेचा इतिहास काय? 'मंजुम्मल बॉईज'मुळे चर्चेत

Guna Caves aka The Devils Kitchen: सुरुवातील याला डेव्हिल्स किचन म्हणून ओळखलं जायचं. पण, १९९२ मध्ये कमल हसन याच्या गुणा चित्रपटाचे शुटिंग याठिकाणी झालं होतं.

कार्तिक पुजारी

Guna Caves- सध्या केरळच्या एका चित्रपटाची चर्चा आहे. मंजुम्मल बॉईज (Manjummel Boys) हा चित्रपट लोकांचा पसंतीस पडत असून कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने चांगली कामगिरी केली आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटात अनेक उत्तम अभिनेते आहेत. तमिळनाडूतील कोडाईकनालमध्ये असलेल्या 'गुणा गुहे'वर (Guna Caves) आधारित हा चित्रपट आहे. गुणा गुहा ही डेव्हिल्स किचन (Devil's Kitchen) म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. (The Guna Caves aka The Devils Kitchen)

गुणा गुहा पाहण्यासाठी गेलेल्या कोचीच्या मंजुम्मलमधील काही मित्रांची ही कथा आहे. प्रवेश निषिद्ध असलेल्या भागात हे मित्र जातात आणि तेथे हुल्लडबाजी सुरु करतात. अचानक त्यांच्यातील एक मित्र जमिनीमध्ये गडप होतो. इतकावेळ मित्रांची सुरु असलेली दंगामस्ती अचानक थांबते. आपला एक मित्र कुप्रसिद्ध असलेल्या एका खड्ड्यात पडल्यांची त्यांना जाणीव झालेली असते. खड्डा किती खोल आहे याची कल्पना त्यांना नसते.(famous Manjummel Boys movie)

डेव्हिल्स किचन उर्फ गुणा गुहा

मित्राला बाहेर काढण्यासाठी मित्रांची धावपळ सुरु होते. स्थानिकांना त्या खड्ड्याठिकाणी आणलं जातं. स्थानिक जेव्हा या खड्ड्याचा इतिहास सांगतात तेव्हा त्यांना धक्काच बसतो. कारण, हा काही साधासुधा खड्डा नसतो. डेव्हिल्स किचन म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणच्या खड्ड्यात आतापर्यंत १६ जण गायब झाल्याची त्यांनी माहिती मिळते. आतापर्यंत एकाचाही पत्ता लागलेला नसतो. पोलीस, स्थानिक नागरिक यांनी तर केव्हाच आशा सोडून दिलेली असते.

सर्व मित्रांसाठी हा मोठ्ठा धक्का असतो. आपला मित्र आपल्याला कधीच भेटणार याची कल्पना देखील त्यांना करवत नाही. अशावेळी त्यांच्यातील एक मित्र समोर येतो आणि मित्र पडलेल्या खड्ड्यात जाण्याचा निर्णय घेतो. मित्रासाठी घेतलेला हा निर्णय खरंतर दुसरा एक जीव धोक्यात घालण्यासारखा असतो. पण, 'मी त्याच्या आईला घरी जाऊन काय उत्तर देऊ' असं म्हणत मित्र खड्ड्यात जाण्याचा निर्धार करतो. पुढची कथा जाणून घेण्याआधी या गुणा गुहेचा उर्फ डेव्हिल्स किचनचा इतिहास आपण जाणून घेऊया.

गुणा गुहेचा काय आहे इतिहास?

गुणा गुहेचा पहिल्यांदा शोध १८२१ मध्ये ब्रिटिश अधिकारी बीएस वार्ड (B.S. Ward) याने लावला होता. पण, पुन्हा अनेक वर्ष ही जागा लोकांसाठी अज्ञात राहिली. १९९० मध्ये पुन्हा एकदा या जागेचा शोध लावण्यात आला. नैसर्गिक सौदर्याच्या बाबतीत हा संपन्न भाग आहे.

कमल हसनचा आहे संबंध

सुरुवातील याला डेव्हिल्स किचन म्हणून ओळखलं जायचं. पण, १९९२ मध्ये कमल हसन याच्या गुणा चित्रपटाचे शुटिंग याठिकाणी झालं होतं. चित्रपटाच्या नावावरुन गुणा गुहा असं त्यांचं नाव पडलं. स्थानिक असा दावा करतात की, याठिकाणी पांडवांनी कधीकाळी स्वंयपाक केला होता. त्यावरुन याला किचन असं म्हटलं जाऊ लागलं. पण, डेव्हिल्स किचन असं नाव कुठून पडलं याबाबत रहस्य कायम आहे. काहीजण याचा संबंध गुहेतील वटवाघळांशी लावतात. तर काहीजण बीएस वार्ड यांना हे नाव सुचल्याचं सांगतात.

गुणा गुहा या अत्यंत धोकादायक आहेत.समुद्रसपाटीपासून २२३० मीटरवर असलेल्या या गुहा झाडं आणि गवतांनी आच्छादलेल्या आहेत. शिवाय गुहांना तीन मोठ्या खडकाच्या खाबांनी वेढलेलं आहे. त्यामुळे या भागातून चालत असताना कोणत्या ठिकाणी खड्डा असेल सांगता येत नाही. दाव्यानुसार, येथील काही खड्डे १५०० ते २००० मीटरपर्यंत खोल आहेत. त्यामुळे एखादा अशा खड्ड्यात पडला तर त्याची वाचण्याची शक्यता पूर्ण मावळते.

अॅडवेंचर म्हणून पर्यटकांचा ओघ

अनेक पर्यटक अॅडवेंचर म्हणून याठिकाणी येत असतात. विशेषत: कमल हसनच्या गुणा चित्रपटानंतर पर्यटकांचा ओघ वाढला. पण, हे अॅडवेंचर अनेकांच्या जिवावर बेतलं आहे. अनेक पर्यटकांचा याठिकाणी जीव गेला आहे. अनेकांचा मृतदेह देखील सापडू शकलेला नाही. गुहेची रचना ही खोल आहेच, पण ती एका सरळ रेषेसारखी नाही. त्यामुळेच जगातील सर्वात धोकादायक गुहांपैकी ही एक मानली जाते. पोलीस रिकॉर्डनुसार, गुहेशी संबंधीत प्रकरणात आतापर्यंत १६ लोकांचा जीव गेलाय. त्यांचा मृतदेह आढळून आला नाही.

गुहेमध्ये गेलेले अनेक लोक परत आले नाहीत. अनेकजण रहस्यमयरित्या गायब झाले. काही प्रकरणामध्ये आत्महत्या देखील झाल्याचे समोर आले. शिवाय काही पर्यटक आणि स्थानिक लोक गुहेच्या शोधात गेले आणि खड्ड्यात पडले. खड्डात पडलेलं कोणीही पुन्हा मिळू शकलेलं नाही. गुहेच्या ठिकाणी जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. पण, अनेकजण बंदी झुगारुन धोकादायक भागात जात असतात. पोलिसांच्या रिकॉर्डनुसार, गुहेमध्ये असलेल्या एका खड्ड्याने २०१६ पर्यंत १६ लोकांचा जीव घेतला आहे.

आतापर्यंत एकजण आला जिवंत बाहेर

२००८ मधील एका प्रकरणामध्ये पहिल्यांदाच एखादा व्यक्ती या खड्ड्यातून जिवंत बाहेर येऊ शकला होता. कोचीच्या मंजुम्मलमधील मित्रांचा ग्रुप याठिकाणी आला होता. त्यातील सुभाष या खड्ड्यात पडला. पोलीस, स्थानिकांचा मदतीने विशेषत: सिजू डेव्हिड या मित्राच्या धाडसामुळे सुभाषला वाचवणे शक्य झाले. सिजू दोरीच्या माध्यमातून स्वत: खड्ड्यात उतरला आणि त्याने सुभाषला आपल्यासोबत वर आणले. सुभाष जवळपास ९०० मीटर खोल खड्ड्यात पडल्याचं सांगितलं जातं. या मंजुम्मल बॉईजमुळे गुणा गुहा अधिक प्रसिद्ध झाली. पण, हा धोकादायक भाग अद्यापही पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तुम्हाला आजू-बाजूच्या परिसरात फिरता येऊ शकते. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: मुल्ला मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढताहेत, राज ठाकरेंचा आरोप! पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काढला फतवा

Aditya Thackeray: सत्तेत आल्यास पहिला निर्णय शेतक-यांच्या कर्जमाफीचा! आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

Raj Thackeray: “….तर तोंड दाखवणार नाही”; राज ठाकरेंचं मशिदीवरील भोंगे, रस्त्यावरील नमाजबाबत मोठं विधान

MP Priyanka Chaturvedi : त्यांचे विचार हे, त्यांची घाणेरडी नियत आहे, त्यांच्या शब्दाने समोर येत आहे... त्यांना माहितीये ते हरणार आहेत..

Sports Bulletin 7th November: रणजी ट्रॉफीचा दुसरा दिवस श्रेयस अय्यरने गाजवला ते महिला प्रीमिअर लिगची रिटेन लिस्ट जाहीर

SCROLL FOR NEXT