Noor Malabika SAKAL
Premier

The Trial Fame Actress: सडलेल्या अवस्थेत आढळला 37 वर्षीय अभिनेत्रीचा मृतदेह; शेजाऱ्यांनी फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची केली होती तक्रार

Noor Malabika: नूर मलाबिकाचा मृतदेह पोलिसांनी तिच्या लोखंडवालामधील फ्लॅटमधून 6 जून रोजी ताब्यात घेतला.

priyanka kulkarni

Noor Malabika: अभिनेत्री आणि म्युझिक व्हिडीओ मॉडेल नूर मलाबिकाचा (Noor Malabika) काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. नूरनं राहत्या घरात गळफास लावून घेतला होता, अशी माहिती मिळत आहे. पोलिसांनी नूर मलाबिकाचा मृतदेह तिच्या लोखंडवालामधील फ्लॅटमधून 6 जून रोजी ताब्यात घेतला. नूर मलाबिकाच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार तिच्या शेजाऱ्यांनी पोलिसांकडे केली. त्यानंतर ओशिवरा पोलिसांनी नूरचा सडलेला मृतदेह ताब्यात घेतला.

नूरच्या शेजाऱ्यांनी केली फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार

रिपोर्टनुसार, नूर मालबिकाच्या फ्लॅटमधून सतत दुर्गंधी येत असल्याची माहिती, तिच्या शेजारी राहणाऱ्यांनी पोलिसांना दिली. ओशिवरा पोलिसांनी नूरच्या फ्लॅटचा दरवाजा तोडला. त्यावेळी पोलिसांना नूरचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसला. त्यानंतर पोलिसांनी नूरच्या घराची झडती घेतली. काही औषधे, मोबाईल आणि डायरी पोलिसांनी नूरच्या घरातून जप्त केली आहेत.

संस्थेकडून मृतदेहावर अंतिम संस्कार

नूरच्या मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर तो शवविच्छेदनासाठी गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी नूरच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र नूरचा मृतदेह कोणीही ताब्यात घेतला नाही. त्यानंतर रविवारी बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पोलीस ममदानी हेल्थ अँड एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेच्या मदतीने नूरच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले.

नूरनं 'या' शोमध्ये केलं काम

नूरनं 'सिसकियां', 'वॉकमन', 'तिखी चटनी', 'जगन्या उपया', 'चार्म सुख', 'देखी उंडेखी', 'बॅकरोड हॉस्टेल' यांसारख्या अनेक शोमध्ये काम केले. तसेच तिनं अभिनेत्री काजोलसोबत द ट्रायल या वेब सीरिजमध्ये देखील काम केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT