Marathi actor working in farm Esakal
Premier

Video : अभिनय सोडून 'हा' अभिनेता करतोय भरपावसात भाताची लावणी ; अनुभव शेअर करताना म्हणाला...

सकाळ डिजिटल टीम

Viral Video : पावसाळा जोरदार सुरु झालाय आणि याचा सगळ्यात जास्त आनंद शेतकरी राजाला झाला आहे. पुन्हा एकदा नव्याने धान्याची पेरणी करायला सुरुवात ठिकठिकाणी झाली आहे. तर कोकणात भाताची लावणीही जोरदार सुरु आहे. नुकतंच एका मराठी अभिनेत्याने कामातून ब्रेक घेत शेतात भाताची लावणी करण्याचा आनंद लुटला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेत आहे.

अभिनेता अभिजीत केळकरने यंदा कामातून ब्रेक घेत मित्राच्या शेतात भाताची लावणी केली. याची छोटीशी झलक त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली. अभिजीत मूळचा कोकणातील असून त्याला कधी पावसात कोकणात येता आलं नाही त्यामुळे यंदा त्याने ठरवून अलिबागमध्ये त्याच्या मित्राच्या गावी जात भाताची लावणी केली आणि त्याचा हा अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केला.

पहा व्हिडीओ

काळी माती त्याची शान, राबतो तिच्यात विसरूनी भान. असं या व्हिडिओला कॅप्शन देत अभिनेत्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीचं कौतुक केलंय. त्याच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत त्याच्या या कृतीची तारीफ केली आहे. अनेकांनी त्याला त्यांची शेती बघायला यायचं आमंत्रणही दिलं आहे. सोशल मीडियावर त्याने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आहे.

वेगवेगळ्या भूमिका आजवर साकारत अभिजीतने प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिजीत 'बिग बॉस मराठीच्या सीजन २' मध्येही सहभागी झाला होता. पण काही काळाने तो या स्पर्धेतून एलिमिनेट झाला. या व्यतिरिक्त त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'जय जय स्वामी समर्थ','तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत त्याने भूमिका साकारल्या होत्या. याबरोबरच रंगभूमीवर त्याची काही नाटकेही सुरु आहेत.

अभिजीत त्याच्या दोन्ही मुलांबरोबरचे व्हिडिओही कायम सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यांचं बॉण्डिंग अनेकजण एन्जॉय करतात. अभिजीतची दोन्ही मुलं राधा आणि मल्हार इंटरनेटवर लोकप्रिय आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT