rashami desai  esakal
Premier

मेले असते तर... लग्न तुटलं, कोट्यवधींचं कर्ज, गंभीर आजाराने ग्रासलं; अभिनेत्रीने गाडीत काढलेले दिवस

Popular Tv Actress Recall Her Struggle: लोकप्रिय हिंदी अभिनेत्री रश्मी देसाई हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या कठीण दिवसांचा खुलासा केला

Payal Naik

इंडस्ट्रीमध्ये टिकून राहणं ही खूप अवघड गोष्ट आहे. एका कार्यक्रमामुळे आणि चित्रपटामुळे मिळालेली लोकप्रियता काही दिवस टिकते नंतर मात्र प्रत्येकाच्या वाट्याला स्ट्रगल येतो. अशाच एका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्या कठीण काळाबद्दल सांगितलं आहे. पाच वर्षात तुटलेलं लग्न, कोट्यवधींचं कर्ज, नैराश्य यामुळे अभिनेत्रीवर चक्क गाडीत राहायची वेळ आली होती. ती पूर्णपणे तुटली होती. ही अभिनेत्री आहे 'उतरन' मालिकेतून घराघरात पोहोचलेली रश्मी देसाई. तिने तपस्या बनून सगळ्यांची मनं जिंकली. मात्र तिने असा काळ पहिला जेव्हा तिला याच्यापेक्षा मरण बरं असं वाटू लागलं होतं.

रश्मीने नुकतीच पारस छाबडा याच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये बोलताना ती म्हणाली, ''उतरन' मालिकेतून मी लोकप्रिय झाले आणि याच मालिकेच्या सेटवर माझी भेट नंदिश संधू सोबत झाली. काही वर्ष डेट केल्यानंतर मी २०११ मध्ये त्याच्याशी लग्न केलं. पण हे नातं पाच वर्षात तुटलं. लग्नानंतर माझं आयुष्य एकदम बदललं. माझ्यात आणि नंदिशमध्ये भांडणं होऊ लागली. एकीकडे नातं खराब होत होतं आणि दुसरीकडे कोट्यवधींचं कर्ज होतं. मी घर घेतलेलं त्याचं ३ कोटींचं कर्ज होतं. मी सगळं काही गमावून बसले होते.'

रश्मी म्हणाली, 'मी जया कार्यक्रमात काम करत होते तो अचानक बंद झाला आणि मी रस्त्यावर आले. मी रोज २० रुपयांमध्ये जेवायचे. माझा घटस्फोट झाला होता पण माझ्या घरातल्यांना मी चुकीचा निर्णय घेतलाय असं वाटत होतं. माझी परिस्थिती इतकी वाईट होती की मला रस्त्यावर राहावं लागत होतं. मी माझ्याब गाडीत राहायचे. मला खूप चिंता वाटू लागलेली. मी नैराश्यात गेलेले. त्यामुळे मला सोरायसिस नावाचा आजारही झाला.'

रश्मी पुढे म्हणाली, 'माझं वजन वाढू लागलेलं. केस गळत होते. माझा पूर्ण लूक खराब झाला होता. त्यामुळे मला खूप वाईटसाईट बोललं जात होतं. मला वाटायला ;लागलेलं की असं जगण्यापेक्षा मरण बरं.' पण या सगळ्या परिस्थितीवर मात करून रश्मी पुन्हा उभी राहिली. आणि आता ती एक चांगलं आयुष्य जगत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT