अभिनेता गिरीश कुलकर्णी आणि शशांक शेंडे हे दोघेही वेगळ्या जातकुळीतील अभिनेते. त्यांनी मराठीबरोबरच हिंदीमध्येही आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजविले आहे. त्यांचे चित्रपट काहीसे वेगळ्या धाटणीचे आणि निराळ्या पठडीतील असतात. आता हे दोघे एकत्र आले आहेत ‘गारुड’ या चित्रपटासाठी.
स्वप्नांच्या दुनियेत वावरत असताना एका शोधात गुरफटत गेलेली एक रहस्यमय कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. ‘किमयागार फिल्म्स’, ‘एलएलपी’ आणि ‘ड्रीमव्हीवर’ निर्मित आणि ‘सनशाईन स्टुडिओ’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती ध्रुव दास, तृप्ती संजय राऊत, श्वेता देवेंद्र गुजर-शाह यांनी केली आहे. गिरीश कुलकर्णी, शशांक शेंडे यांच्यासह पायल पांडे, सचिन वळंजू, धनंजय सरदेशपांडे ही कलाकारांची फौज कथेमागील रहस्य गडद करताना दिसणार आहेत
तर तृप्ती राऊत, संतोष आबाळे, उमा नामजोशी, पंडित ढवळे, वैष्णवी जाधव, सार्थक शिंदे हे सहकलाकार चित्रपटात झळकणार आहेत. प्रताप विठ्ठलराव सोनाळे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, तर चित्रपटाची कथा डॉ. प्रमोद खाडिलकर यांची असून संगीताची जबाबदारी ओंकार संगोराम यांनी सांभाळली आहे.
दिग्दर्शक प्रताप सोनाळे म्हणाले की, “हा एक काल्पनिक चित्रपट आहे. यातील प्रत्येक गूढ पात्र इतर पात्रांसोबत होणाऱ्या देवाणघेवाणीतून उलगडत जातं. त्यातूनच त्यांच्या कथेच्या, त्यांचे वेगवेगळे शोध सादर होतात, पण ते शोध प्रेक्षकांच्या समोर येतात एका रंजक, गूढ, रहस्यमयी वेशातच.”
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.