urmila matondkar esakal
Premier

...म्हणून उर्मिलाने घेतलेला मूल जन्माला न घालण्याचा निर्णय; मोहसीन मीरशी निकाह केल्यावर ऐकावे लागलेले टोमणे

Payal Naik

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री 'रंगीला' गर्ल म्हणून ओळखली जाणारी उर्मिला मातोंडकर हिने पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. तिने आपला पती मोहसीन अख्तर मीर याच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. चाहतेदेखील ही बातमी ऐकून चकीत आहेत कारण आठ वर्षांपूर्वी उर्मिलाने मोहसीनशी प्रेमविवाह केला होता. धर्माच्या भिंती पार करत उर्मिलाने १० वर्ष लहान मोहसीनशी निकाह केला होता. त्या दोघांनाही या लग्नामुळे खूप ऐकून घ्यावं लागलं. मात्र आता ते वेगळे होणार आहेत. उर्मिलाने अचानक हा निर्णय का घेतला याबद्दल माहिती नसली तरी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात तिच्या आई न होण्याच्या निर्णयाबद्दलही चर्चा होतेय.

आई होण्याबद्दल काय म्हणालेली उर्मिला?

उर्मिला आणि मोहसीन यांनी २०१६ मध्ये आधी हिंदू आणि मग मुस्लिम पद्धतीने निकाह केला होता. मात्र लग्नानंतर उर्मिला चित्रपटात दिसली नाही. ती राजकारणात सक्रीय झाली. असं असलं तरी गेल्या आठ वर्षात तिला अनेकदा मुलांबद्दल विचारलं गेलं. याबद्दल इटाइम्सशी बोलताना उर्मिला म्हणालेली, 'मी आई होण्याबद्दल विचार करतेय देखील आणि नाही पण. जर मूल होतंय तर चांगलंच आहे. पण मी त्याची अपेक्षा नाही करत आहे. असं नाहीये की मी मुलांबद्दल विचार नाही करत. पण प्रत्येक स्त्रीसाठी आई होणं गरजेचं नाहीये. मातृत्व योग्या कारणामुळे आलं पाहिजे. मला मुलं आवडतात. पण अशी अनेक मुलं आहेत ज्यांना प्रेमाची आणि आपुलकीची गरज आहे. असं गरजेचं नाही की मुलं तुमच्या गर्भातूनच जन्माला यायला हवी.'

नेमकं काय बिनसलं

मोहसीन आणि उर्मिला यांच्यात नेमकं काय बिनसलं याबद्दल माहिती नसली तरी सूत्रांच्या माहितीनुसार ते दोघेही गेले काही महिने सोबत राहत नव्हते. ते वेगवेगळे राहत आहेत. त्यांचा घटस्फोटही सामंजस्याने होत नाहीये. त्यामुळे हा घटस्फोट नक्की का होतोय याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingare To Sharad Pawar: 'दिवटया आमदार' म्हणत शरद पवारांची बोचरी टीका; सुनील टिंगरे म्हणाले, मी त्यांना...

खासदार महाडिकांच्या सुपुत्राची राजकारणात होणार एन्ट्री? कृष्णराज म्हणाले, 'पक्षाने संधी दिली तर निवडणूक लढवणार'

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात आज पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस! 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री दालनाबाहेर तोडफोड करणारी 'ती' महिला आहे तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : केंद्रीय यंत्रणांकडून अलर्ट आल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क

SCROLL FOR NEXT