marathi actress
marathi actress  sakal
Premier

एकटा जीव..! नवऱ्याला सोडून एकटीच डोंगरात फिरतेय लोकप्रिय मराठी अभिनेत्री, ओळखलंत का?

सकाळ डिजिटल टीम

कलाकार म्हटलं की ते सतत शूटिंगमध्ये व्यग्र असतात. त्यांच्या शूटिंगच्या वेळा ठरलेली नसतात. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करावा लागतो. काही कलाकार तर चित्रपटाच्या शुटिंगसोबतच नाटकातही भूमिका साकारताना दिसतात. या धावपळीच्या आयुष्यात त्यांनाही ब्रेकची गरज असते. अशीच एक अभिनेत्री कामाला डच्चू देत आता मस्त निसर्गाच्या सानिध्यात फिरायला गेली आहे. तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत जे पाहून चाहतेही तिच्या लोकेशनबद्दल विचारणा करताना दिसतायत. ही अभिनेत्री आहे प्रिया बापट.

प्रिया सध्या अनेक प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसते. त्यामुळे यासगळ्यातुन वेळ काढून ती फिरायला पोहोचली आहे. तिने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती भल्यामोठ्या दगडांमधून वाहणाऱ्या झऱ्याच्या पाण्यात मजा करताना दिसतेय. एका फोटोत ती पालथी झोपली आहे तर दोन फोटोंमध्ये ती झऱ्यात बसून पाण्याचा आनंद घेतेय. तिला पाहून चाहतेही खुश झाले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिलं, 'काल मी एक धबधबा पाहण्यासाठी एका डोंगरावर ट्रेक केला. जंगलातून शांत चालत, पक्ष्यांचं निरीक्षण करत, क्रिकेट ऐकत, प्रत्येक पाऊल नीट टाकत मी तिथे पोहोचले.'

तिने पुढे लिहिलं, 'धबधब्याच्या पाण्याच्या डुंबणं ही कल्पनाच मी कधी केली नव्हती. ते थंड होतं पण एकदा मी त्यात स्वतःला झोकून दिलं आणि मग अगदी लहान मुलासारखी मजा करायला लागले. माझ्या मनाला आराम दिला. आणि हा माझा एकटीचा वेळ खूप महत्वाचा होता.' प्रियाच्या फोटोंवर चाहते या लोकेशनची विचारणा करत आहेत. सध्या प्रिया हिमाचल प्रदेश येथे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली आहे. तिच्या इतर फोटोंवरुनही ती तिथे खूप मजा करत असल्याचा अंदाज येतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: शेअर बाजाराने रचला नवा इतिहास, सेन्सेक्सने प्रथमच पार केला 80 हजारांचा टप्पा

Aditya-L1 :इस्रोच्या Aditya-L1 ने केली सूर्यप्रदक्षिणा पूर्ण; सूर्याबद्दल जगाला कळणार ही आश्चर्यकारक माहिती

Electricity Theft : अबब...मराठवाड्यामध्ये वर्षभरात ३२ कोटी रुपयांची वीजचोरी उघड!

VIDEO: भारतीय लष्कर नसतं तर भाविकांची बस दरीत कोसळली असती; पाहा थरारक व्हिडिओ

NEET Exam : नीट परीक्षेतील गैरव्यवहारप्रकरणी दोघे सीबीआयच्या ताब्यात; लातूरमधल्या 'त्या' तिघांचं काय आहे कनेक्शन?

SCROLL FOR NEXT