Varsha Usgaonkar  sakal
Premier

वर्षा उसगावकर यांनी का सोडली 'सुख म्हणजे...' मालिका? स्वतः सांगितलं कारण; बिग बॉसमध्ये जाण्याच्या अफवांवरही सोडलं मौन

Payal Naik

लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर ९०चं शतक गाजवलं. त्यांच्या अभिनयासोबत त्यांच्या सौंदर्याचेही लाखो दिवाने होते. त्यांच्या लोकप्रियतेची जादू आजही कमी झालेली नाही. त्या गेले ४ वर्ष 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत दिसत होत्या. ही मालिका टीआरपी लिस्टमधील टॉप १० मालिकांपैकी एक होती. मात्र मालिकेत लीप दाखवण्यात आला आणि वर्षा उसगावकर यांनी मालिकेचा निरोप घेतला. त्यानंतर त्या बिग बॉस मराठी सीझन ५ मध्ये दिसणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी यावर उत्तर दिलं आहे.

'बिग बॉस मराठी ५' ची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. तर अभिनेता रितेश देशमुख या कार्यक्रमाचा होस्ट असणार आहे. या कार्यक्रमात कोणकोणते कलाकार दिसणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तर मालिकेचा निरोप घेतल्यानंतर त्यांनी बिग बॉसमध्ये येण्यासाठी मालिकेचा निरोप घेतला असं म्हटलं जात होतं. मात्र आता वर्षा यांनी मुलाखतीत मालिका सोडण्याचं खरं कारण सांगितलं आहे. मुंबई टाइम्सशी बोलताना त्यानं म्हणाल्या, ''सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत मी नंदिनी पाटील या व्यक्तिरेखेत दिसत होते. मी साकारत असलेल्या व्यक्तिरेखेला पुढे वाव नाही हे मला आणि निर्मात्यांना ठाऊक होतं.'

त्या पुढे म्हणाल्या, 'त्यामुळे मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय सामंजस्याने घेण्यात आला. मालिकेत सुरू असलेल्या कथानकात दुसऱ्या नायिका आणि नायक व दोन खलनायिका यांना वाव होता. त्यामुळे माझ्या व्यक्तिरेखेला पुढे भवितव्य नव्हतं.' तर मालिकेतून बाहेर पडल्यावर बिग बॉसमध्ये जाण्याबद्दलही त्यांनी भाष्य केलं. त्या म्हणाल्या, 'मी बिग बॉसच्या घरात जाणार नाही. ही कल्पना नक्की कुणाच्या डोक्यात आली ठाऊक नाही पण ही अफवा आहे. मी बिग बॉसच्या घरात जाणार नाहीये.' वर्षा या लवकरच दोन वेबसीरिज मध्ये झळकणार आहेत. सोबतच त्या लवकरच चित्रपटात दिसणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

Arjun Tendulkar ची भेदक गोलंदाजी; एकाच सामन्यात ९ विकेट्स घेत संघाला डावाने जिंकवलं; पाहा Video

SCROLL FOR NEXT