varsha usgaonkar  esakal
Premier

माश्यांच्या जाहिरातीवरून माफी ते सासऱ्यांची प्रॉपर्टी हडपण्याचा आरोप, वर्षा उसगावकर अनेकदा अडकल्यात वादाच्या भोवऱ्यात

Varsha Usgaonkar Controversy: लोकप्रिय मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर सध्या 'बिग बॉस मराठी ५' च्या घरात दिसत आहेत. मात्र त्यापूर्वी त्या अनेकदा वादात अडकल्या आहेत.

Payal Naik

मराठी सिनेसृष्टीच्या ड्रीम गर्ल म्हणवणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांनी अनेक चित्रपटातून प्रेक्षकांना भुरळ घातली. त्यांच्या अनोख्या स्टाइलचे लाखो दिवाने होते. आजही त्यांची जादू कमी झालेली नाही. साध्य त्या बिग बॉस मराठीमध्ये दिसत आहेत. त्यांना बिग बॉस मध्ये पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र सरळ साधं आयुष्य जगणाऱ्या वर्षा काही वेळा मोठ्या वादात अडकल्या होत्या हे तुम्हाला ठाऊक आहेत का? त्यांना आणि त्यांच्या पतीला तर सासऱ्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीमधून बेदखल केलं होतं. नेमकं काय घडलं होतं?

मागावी लागलेली कोळी बांधवांची माफी

मध्यंतरी वर्षा यांनी एक जाहिरात केली होती ती ऑनलाईन मासे विकत घेण्याबद्दलची होती. मात्र या जाहिरातींवरून मोठा वाद झाला होता. वर्षा यांनी जाहिरातीत 'बाजारात बऱ्याच वेळा कोळणींकडून माझी फसवणूक झाली आहे. बाजारातल्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की, त्यावेळी मी हे पापलेट का घेतले, असे वाटून निराश झाले' असं म्हटलं. त्यामुळे कोळी बांधव आक्रमक झाले. मच्छिमारांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केला. यानंतर वर्षा यांनी व्हिडिओ शेअर करून समस्त कोळी बांधवांची हात जोडून माफी मागितली. तसेच कोणाच्याही भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता असंही त्या म्हणाल्या.

सासऱ्यांच्या केलेला छळ

वर्षा उसगावकर यांनी रवीशंकर शर्मा अर्थात प्रसिद्ध संगीतकार रवी यांचा मुलगा अजय शर्मा यांच्याशी लग्न केलं. संगीतकार रवी यांनी वर्षा आणि अजय हे दोघं आपला छळ करत असल्याचं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. त्यानंतर एकच गदारोळ उठला होता. रवी यांनी वर्षा आणि त्यांच्या मुलाला आपल्या संपत्तीमधून बेदखल केलं होतं आणि त्यांच्या मृत्यूनंतर आपल्याला अग्नी देण्याचा हक्कही त्यांच्याकडून काढून घेतला होता. आपल्या मृत्यूनंतरही त्या दोघांना बोलावण्यात येऊ नये अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या इच्छेनुसार रवी यांचं २०१२ मध्ये निधन झाल्यानंतर त्याचं पार्थिव त्यांच्या मुलींकडे सोपवण्यात आलं.

सासऱ्यांच्या संपत्तीवरूनही झालेला मोठा वाद

सासऱ्यांच्या मृत्यूनंतर वर्षा यांनी त्यांची मुंबईतील संपत्ती हडपल्याचा आरोप त्यांच्या नणंदांनी केला होता. नणंदांनी वर्षा आणि अजय यांच्या विरोधात थेट कोर्टात केस दाखल केली होती. आपल्या वडिलांच्या घरावर आपला हक्क आहे मात्र वर्षा आणि अजय यांनी तो हडप केला असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर कोर्टाने तो बंगला चौघांमध्ये वाटून दिला होता. हे प्रकरण तेव्ह खूप गाजलं होतं. आता बिग बॉस मराठीच्या घरात त्या या प्रकरणी बोलणार का हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT