Vat Purnima 2024:  Sakal
Premier

Vat Purnima 2024: मालिकांमध्ये वटपौर्णिमा उत्सव

सकाळ वृत्तसेवा

Vat Purnima 2024: पती-पत्नीच्या नात्याला सर्वांगसुंदर मानून आणि आपल्या सौभाग्यवृद्धीसाठी वटपौर्णिमा साजरी होताना दिसते. या वटपौर्णिमेचे औचित्य साधून मराठी मालिकांमधूनही त्याचं आगळंवेगळं चित्रण होऊ लागले आहे. स्त्रियांच्या मनातील भाव-भावना आणि पती-पत्नीच्या नात्यातील गोडवा किती आल्हाददायी आणि किती आनंदी आहे, हे दाखवण्यासाठी आता ‘स्टार प्रवाह’ आणि ‘कलर्स’ वाहिनीवरील मालिकांमधूनही वटपौर्णिमा साजरी होताना दिसते आहे.

‘रमा-राघव’ या मालिकेतील रमा कुटुंब जोडताना मिळणारी राघवची अतूट साथ अशीच सात जन्म राहू देत, असं म्हणत वडाची पूजा करताना दिसत आहे. ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेत सावी अर्जुनसाठी वटपौर्णिमेची पूजा करत असून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना दिसत आहे. ‘सुख कळले’ या मालिकेतील मिथिलादेखील तिच्या सुखी संसारासाठी वटपौर्णिमेची पूजा करताना दिसत आहे. ‘इंद्रायणी’ या मालिकेतून शकुंतला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालत वडाची पूजा करताना दिसत आहे.

‘ठरलं तर मग’ या मालिकेमध्ये यंदाची वटपौर्णिमा सायली-अर्जुनसाठी खास ठरणार आहे. दोघांनीही एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिली नसली तरी मनात मात्र जन्मोजन्मी आम्हाला एकमेकांची साथ लाभू दे, अशी इच्छा व्यक्त करत यंदा वटपौर्णिमेची पूजा सायली-अर्जुनही दोघे एकत्र करणार आहेत.

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेमधील कला, ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील ऐश्वर्या आणि ‘साधी माणसं’ मालिकेतील मीरा हेदेखील लग्नानंतरची त्यांची पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहेत.

‘मुरांबा’ मालिकेतला अक्षयही रमासोबत वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे. तिच्या आईपणाच्या नव्या जबाबदारीमध्ये अक्षयही तिला मनापासून साथ देत वटपौर्णिमेच्या पूजेसाठी अक्षयने रमासाठी पूजेची सर्व तयारी केली असून, रमा आणि आपल्या लेकीसोबत वडाभोवती फेरे घेताना वटपौर्णिमा साजरी करताना दिसत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: 'मातोश्री'वरुन दिलेले एबी फॉर्म उमेदवारांनी नाकारले? आदित्य ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

Diwali 2024: दिवाळीत भेसळयुक्त खव्यापासून बनवलेली मिठाई खाल्ल्यास होऊ शकतो कॅन्सर, FSSAI ने सांगितले नकली खवा कसा ओळखाल

Sunny Deol : पर्वतांमध्ये रमला सनी देओल, पण चर्चा कॅप्शनचीच; नेटकरी कमेंट करत म्हणाले-

IND vs NZ, 1st Test: भारताला रचिन-साऊदी पडले भारी! न्यूझीलंडकडे तब्बल ३५६ धावांची विक्रमी आघाडी

SCROLL FOR NEXT