'वेदा' आणि 'पुष्पा 2'ची बॉक्स ऑफिसवर होणार टक्कर; जॉन अब्राहम की अल्लू अर्जुन, कोण मारणार बाजी?
Vedaa And Pushpa 2 sakal
Premier

Vedaa And Pushpa 2: 'वेदा' आणि 'पुष्पा 2'ची बॉक्स ऑफिसवर होणार टक्कर; जॉन अब्राहम की अल्लू अर्जुन, कोण मारणार बाजी?

priyanka kulkarni

Vedaa And Pushpa 2: 2024 हे सिनेप्रेमींसाठी खास ठरत आहे. विविध विषयांवर आधारित असणारे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशातच आता येत्या 15 ऑगस्ट रोजी दोन बिग बजेट चित्रपट रिलीज होत आहेत. या चित्रपटांपैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे? याकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे.

पुष्पा 2 आणि वेदा आमने-सामने

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा टीझर आणि या चित्रपटाची दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. या चित्रपटाच्या बजेटबद्दल देखील बरीच चर्चा सोशल मीडियावर होत आहे. अशातच आता जॉन अब्राहमच्या 'वेदा' या चित्रपटाची रिलीज डेट देखील समोर होणार आहे. वेदा आणि पुष्पा 2 हे दोन्हीही चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जॉन अब्राहमने ट्विटरवर (X) पोस्ट शेअर करुन वेदा या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं आहे, "या स्वातंत्र्य दिनी, तो येतोय...न्यायाची लढाई लढण्यासाठी. वेदा 15 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे."

'वेदा'ची स्टार कास्ट

'वेदा' चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल अडवाणी यांनी केले आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमसोबतच तमन्ना भाटिया आणि शर्वरी वाघ यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

पुष्पा-2ची स्टार कास्ट

'पुष्पा-2' या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबतच रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल हे कलाकार देखील महत्वाची भूमिका साकारणार आहेत. हिंदी व्यतिरिक्त हा तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' योजनेची वयोमर्यादा वाढली, आता ६५ वर्षांपर्यंतच्या महिलांना मिळणार लाभ

Stampede Hathras: उत्तर प्रदेशात भीषण घटना! सत्संग समारंभात चेंगराचेंगरीत 23 महिलांसह 3 बालक अन् एका पुरुषाचा मृत्यू

PM Modi: मोदी बोलायला उभे राहताच विरोधकांचा मोठा गोंधळ; लोकसभा अध्यक्ष विरोधकांवर प्रचंड संतापले

Ladki Bahin Yojana: पतीला सोडून पळून गेली पत्नी...'लाडकी बहीन योजने'च्या पैशांमुळे पकडली, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Updates : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी एकूण १४ उमेदवारांनी भरला अर्ज

SCROLL FOR NEXT