Veteran actor Rajinikanth hospitalized in Chennai after complaining of severe stomach pain, condition now stable. esakal
Premier

Rajinikanth: मध्यरात्री ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Rajinikanth Admitted to Hospital Due to Severe Stomach Pain: रजनीकांत यांचे वय ७३ असून, त्यांना मंगळवारी एक महत्त्वपूर्ण वैद्यकीय प्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती मिळत आहे.

Sandip Kapde

चेन्नई, तामिळनाडू - ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्यामुळे काल रात्री उशिरा चेन्नईतील अपोलो ग्रीम्स रोड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेची कोणतीही गरज नसल्याची माहिती रुग्णालयातून मिळाली असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

रजनीकांत यांचे वय ७३ असून, त्यांना मंगळवारी एक महत्त्वपूर्ण वैद्यकीय प्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांकडून किंवा रुग्णालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तामिळनाडूतील चेन्नई पोलीस विभागानेही या घटनेची पुष्टी केली असून, त्यांनी सांगितले की, पोटात तीव्र वेदनांमुळे रजनीकांत यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले.

अभिनेते रजनीकांत यांची चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण कामगिरी

रजनीकांत हे तामिळ आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज नाव आहे. त्यांच्या अभिनयाने जगभरातील चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांना भारत सरकारने २००० साली पद्मभूषण आणि २०१६ साली पद्मविभूषण या राष्ट्रीय सन्मानांनी गौरविले आहे. शिवाय, त्यांना शेवेलियर शिवाजी गणेशन पुरस्कारासह इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

भारताच्या ४५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात २०१४ साली त्यांना भारतीय चित्रपटातील शतकातील व्यक्तिमत्त्व म्हणून गौरविण्यात आले. तसेच, २०१९ साली ५०व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना ‘आयकॉन ऑफ ग्लोबल जुबली’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. एम. जी. रामचंद्रन यांच्या पाठोपाठ रजनीकांत हे तमिळ सिनेमा इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारे दुसरे अभिनेते आहेत.

दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित-

रजनीकांत यांना ६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या या उल्लेखनीय कारकिर्दीमुळे त्यांना भारतीय सिनेमाचा एक महानायक म्हणून ओळखले जाते. त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच त्यांच्या चाहत्यांनी लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

आपापल्या उमेदवारांसाठी ‘हे’ १७ बडे नेते सोलापुरात! पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार, योगी, रेवंथ रेड्डी, सिद्धरामय्या, उद्धव व राज ठाकरे, ओवैसी यांच्या प्रचारसभा, वाचा...

कौटुंबिक वारसा जपताना...

SCROLL FOR NEXT