Vicky Kaushal Esakal
Premier

Tauba Tauba Song : "मला तर ऑस्कर जिंकल्यासारखं वाटतंय" ; 'तौबा तौबा' डान्स बायकोला आवडल्यावर विकी झाला खुश

सकाळ डिजिटल टीम

Vicky Kaushal & Katrina Kaif : अभिनेता विकी कौशलचा बॅड न्यूज हा सिनेमा १९ जुलैला प्रदर्शित होतोय. या सिनेमातील त्याच्यावर चित्रित झालेल्या 'बॅड न्यूज ' या गाण्याची सध्या सगळीकडे क्रेझ आहे. सोशल मीडियावर हे गाणं चांगलंच गाजत असून विकीने केलेल्या हूकस्टेपवरून प्रेरित होऊन अनेकांनी रील्स बनवल्या आहेत. सगळीकडे त्याचा हा डान्स गाजत असतानाच त्याची बायको कतरीनानेही त्याचं भरभरून कौतुक केलं. याबाबत विकीने एका मुलाखतीमध्ये त्याच्या भावना व्यक्त केल्या.

विकीची बायको आणि अभिनेत्री कतरिना स्वतः एक उत्तम डान्सर आहे. मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत विकीने सांगितलं कि, तो आणि कतरिना यांच्यात स्पर्धा आहे असं त्याला वाटत नाही कारण कतरिना त्याच्यापेक्षा खूप चांगली कलाकार आहे आणि तो तिच्याशी स्पर्धा करू शकत नाही. "ती एका वेगळ्या लीगमध्ये आहे आणि ती जे काही करते ते चांगलं करते" असं तो यावेळी म्हणाला.

तौबा तौबा या गाण्यावरील त्याचा डान्स बघितल्यावर कतरिनाची प्रतिक्रिया काय होती असं विचारल्यावर तो म्हणाला कि,"तिच्या मते मी गणपती विसर्जनात नाचणारा किंवा वरातीत नाचणारा डान्सर आहे. मी डान्स शिकलेलो नाहीये. पण तौबा तौबा या गाण्यातील माझा डान्स तिला आवडला. मी चांगला नाचलोय असं ती म्हणाली आणि तिच्या या कौतुकामुळे मला ऑस्कर जिंकल्यासारखं वाटलं."

कतरिनाने ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन डान्स स्किल , डान्स करताना लागणारी एनर्जी आणि मॉडरेशन याविषयी बरेच सल्ले दिल्याचं फिल्म कंप्यानीयनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. "ज्यावेळी तिने डान्स आवडल्याची प्रतिक्रिया दिली त्यावेळी फक्त मनात 'शुकर है' हीच भावना आली" असं या मुलाखतीत तो म्हणाला होता.

विकीचा बॅड न्यूज हा सिनेमा १९ जुलै २०२४ ला रिलीज होतोय. तृप्ती डिमरी आणि अमी विर्क यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. बहुपालकत्व या संकल्पनेवर हा सिनेमा आधारित आहे. आनंद तिवारी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT