Wari pandharichi Esakal
Premier

Wari Pandharichi New Song : आषाढी एकादशीनिमित्त विठूनामाचा गजर ; वारकऱ्यांची भक्तीमय साद पोहोचणार 'वारी पंढरीची' या गाण्यातून

सकाळ डिजिटल टीम

Wari Pandharichi : वारकऱ्यांचा कैवारी असलेल्या विठूरायाची भेट घेण्यासाठी लाखो वारकरी पायी प्रवास करत पंढरपूरला आषाढी एकादशीला जातात आणि चंद्रभागेत स्नान करून विठुरायाचं दर्शन घेतात. याच विठुरायाला साद घालणारं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलंय. वारीतील अनुभव आणि त्यात येणारी विठ्ठलाची प्रचिती, वारकऱ्यांची विठ्ठलाला घातलेली भक्तिमय साद याचं सुरांतून दर्शन घडवणारा 'वारी पंढरीची' हा म्युझिक व्हिडीओ युट्युबवर रिलीज करण्यात आला.

झी म्युझिकच्या युट्युब चॅनेलवर हा म्युझिक व्हिडीओ रिलीज करण्यात आला असून हे गाणं विठ्ठलाच्या भक्तांच्या भक्तिनिमित्त त्यांच्या पांडुरंगाला समर्पित आहे आणि यातून आपल्या संगीतसंस्कृतीचा एक आगळावेगळा प्रयोग दिसून येत आहे. वारी मधल्या वारकऱ्यांचे नैसर्गिक हावभाव टिपून आणि त्यांचे वारी मधले वेगवेगळे भक्तिमय उपक्रम टिपून ह्या गाण्याची निर्मिती केली आहे. या गाण्याचे बोल प्रचिती भागवत आणि श्रेयस देशपांडे यांनी लिहिले आहे.

या गाण्याचा मुख्य कोरस गायिका अंजली जोशी, सुचेता गोसावी आणि मनाली दीक्षित यांनी गायला आहे. या गाण्यात रिदम आणि पखवाजची साथ गणेश शेडगे आणि कृष्णकांत राऊत यांनी दिली आहे. हे उत्तम गाणं नवोदित गायक आणि संगीतकार श्रेयस देशपांडे यांनी गायलं आहे.

पहा गाण्याचा व्हिडीओ

'वारी पंढरीची' गाण्याचा प्रदर्शन सोहळा पुण्यातील विठेश्वर मंदिरात पार पडला. यावेळी नगरसेविका सौ. लक्ष्मी दुधाने, अभिनेता अमित दुधाने, संगीतकार गायक श्रेयस देशपांडे तसेच समस्त कलाकार आणि प्रेक्षक उपस्थित होते. सोशल मीडियावरही या गाण्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. अनेकांनी या गाण्यावर कमेंट करत गायक श्रेयस देशपांडे यांचं कौतुक केलं.

'वारी पंढरीची' असा हा उत्कृष्ट म्युझिक व्हिडीओ पारंपरिक वारीच्या संस्कृतीच दर्शन घडवणारा आहे. श्रेयस यांच्या संगीताने आणि मधुर आवाजाने वारी पंढरीची हे गाणे समस्त पंढरीच्या भक्तांना अद्वितीयता वाटणारे आहे आणि झी म्युझिक मराठी च्या युट्युब चॅनेलवर सगळ्यांना अनुभव घेता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT