Premier

Akshay Kumar : म्हणून ऐनवेळेस अक्षय ऐवजी बरसात सिनेमात दिसला बॉबी देओल, दिग्दर्शक म्हणाला,"प्रियंकामुळे..."

सकाळ डिजिटल टीम

Bollywood Entertainment News : 2005 साली रिलीज झालेला 'बरसात' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि रातोरात हा सिनेमा सुपरहिट ठरला. बॉबी देओल, प्रियांका चोप्रा आणि बिपाशा बसू यांची या सिनेमात मुख्य भूमिका होती. या सिनेमाचे दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या सिनेमाविषयी महत्त्वपूर्ण खुलासा केला.

सुनील दर्शन यांनी 'बरसात' या सिनेमात मुख्य भूमिका अक्षय कुमार साकारणार होता हे उघड केलं आणि अक्षयने हा सिनेमा ऐनवेळेस सोडल्याचा आरोप केला. याबरोबरच अक्षयच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खुलासा केला.

सुनील म्हणाले,"मी जेव्हा बरसात या सिनेमाची सुरुवात केली तेव्हा त्यात कतरीना कैफ, अक्षय कुमार, नदीम श्रवण, प्रियांका चोप्रा यांना घेतलं. बरसात के दिन आये या गाण्याच्या शुटिंगने सिनेमाच्या शूटला सुरुवात झाली. हे गाणं अक्षय आणि प्रियांकावर शूट होणार होतं. पण काही वाईट गोष्टी घडल्या त्यामुळे अक्षयची भूमिका बॉबी देओलने साकारली आणि कतरीनाच्या जागी बिपाशा बासूने काम केलं. सिनेमात बरेच अडथळे आले तरीही हा सिनेमा सुपरहिट ठरला. "

"या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अक्षयच्या वैयक्तिक आयुष्यात खूप प्रॉब्लेम सुरु होते. अक्षय आणि प्रियांकावरील गाण्याचं शूटिंग झालं आणि त्यानंतर अक्षय त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी सोडवण्यात गुंतला. त्याच्यासाठी मी बराच काळ थांबलो पण त्याने ऐनवेळेस सिनेमा सोडल्याचा जाहीर केलं. पण त्यावेळी बॉबी हा सिनेमा करण्यासाठी तयार झाला आणि मी वाचलो. जे घडलं त्यासाठी मी अक्षयला दोष देत नाही कारण आपलं वैयक्तिक आयुष्य कामापेक्षा महत्त्वाचं आहे. " असं पुढे ते म्हणाले.

या दरम्यान अक्षय आणि प्रियांकाचं प्रेमप्रकरण सुरु असल्याच्या चर्चा होत्या आणि त्यामुळे डिंपल त्याच्यावर नाराज होती असं म्हंटल जातं. पण या अफवा खऱ्या होत्या कि खोट्या ते अजून समजलं नाहीये. या सिनेमानंतर अक्षय आणि प्रियांकाने कोणत्याच सिनेमात एकत्र काम केलं नाही. प्रियांका आणि शाहरुख खानचाही प्रेमप्रकरणाच्या अफवा बऱ्याच गाजल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Disqualification Case: शिवसेना- राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी अखेर मिळाला मुहूर्त; या तारखेला होणार सुनावणी

Latest Marathi News Updates : धारावीमध्ये शेकडो नागरिक रस्त्यावर; तणावाची स्थिती

Cha.Sambhajinagar: मराठवाड्यात काँग्रेस असणार मोठा भाऊ? या जागांवर केला दावा

Tirumala Tirupati Laddu: 'तिरुपती'च्या लाडूमध्ये आढळले जनावराची चरबी अन् माशांचं तेल; 'या' पद्धतीने ओळखा तूपाची शुद्धता

Bigg Boss Marathi 5 Voting Trends: सुरजला जान्हवीने दिली टक्कर तर 'या सदस्याला मिळालेत सगळ्यात कमी वोट्स; कोण होणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT