Rajesh Khanna & Dimple Kapadia Esakal
Premier

Rajesh Khanna & Dimple Kapadia : अंजुपासून लांब राहण्यासाठी डिंपल यांनी केली राजेश खन्नांची मदत ; लग्नासाठी राजेश खन्ना यांनी डिंपलला घातली 'ही' अट

When Rajesh Khanna took Dimple's help : अभिनेता राजेश खन्ना यांनी त्यांच्या आधीच्या गर्लफ्रेंडबरोबर ब्रेकअप करण्यासाठी डिंपल यांची मदत घेतली होती.

सकाळ डिजिटल टीम

Rajesh Khanna & Dimple Kapadia : भारतातील पहिले सुपरस्टार म्हणून ज्यांना ओळखलं जात ते म्हणजे राजेश खन्ना. वेगवेगळ्या भूमिका त्यांच्या उत्तम अभिनयाने साकारणाऱ्या काका उर्फ राजेश खन्नांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले असले तरीही त्यांचं वैयक्तिक आयुष्य मात्र कायमच चढउताराचं राहिलं आहे.

फिल्मी लाईफबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयीचे अनेक किस्सेही प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक गाजलेला किस्सा म्हणजे डिंपल यांच्याशी दुराव्यानंतर अंजु महेंद्रूशी त्यांचं जुळलेलं नातं आणि ब्रेकअप. जाणून घेऊया याविषयीचा खास किस्सा.

राजेश खन्ना कायमच त्यांच्या संयमित स्वभावासाठी प्रसिद्ध होते. कोणत्याही भावना व्यक्त न करण्याच्या त्यांच्या या स्वभावाचा जास्त वाईट प्रभाव पडला ते त्यांच्या लग्नावर. त्यांचं करिअर आणि संसार उत्तम सुरु होता पण काही काळानंतर त्यांच्या याच स्वभावाचा वाईट परिणाम त्यांच्या संसारावर दिसू लागला. याचदरम्यान त्यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल केलेल्या अनेक खुलास्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

डिंपल फक्त १६ वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांचं लग्न राजेश खन्ना यांच्याशी झालं. त्यावेळी राजेश खन्ना यांचं वय ३१ होतं. आपल्या वयाच्या जवळपास दुप्पट वय असलेल्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय डिंपल यांनी त्या काळी घेतला. काही काळाने त्यांनी स्टारडस्ट या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतीतील अनेक गोष्टींवर राजेश खन्ना यांनी भाष्य केलं.

मीडिया आणि लोकांच्या दबावामुळेच त्यांचं लग्न झालं असा खुलासा राजेश यांनी या मुलाखतीमध्ये केला होता. पण सुरुवातीला त्यांचा उत्तम सुरु असणारा संसार त्यांची इतर अभिनेत्रींबरोबर असणारी ऑनस्क्रीन केमिस्ट्री आणि नंतरच्या काळात त्यांना आलेलं अपयश याला दिलं.

यावेळी त्यांनी केलेल्या एका खुलास्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. डिंपल राजेश यांच्या आयुष्यात येण्यापूर्वी राजेश अभिनेत्री अंजु महेंद्रू यांना डेट करत होते. जवळपास ७ वर्ष ही जोडी एकमेकांच्या प्रेमात होती पण नंतर राजेश यांचा अंजु यांच्यातील रस कमी झाला. त्याचवेळी डिंपलची त्यांच्या आयुष्यात एंट्री झाली आणि अंजु पासून दूर राहण्यासाठी त्यांना डिंपल यांनी मदत केल्याचं त्यांनी स्टारडस्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं.

अंजु आणि त्यांचा ब्रेकअप झाला असला तरीही अंजु त्यांचं नातं पूर्ववत व्हावं म्हणून प्रयत्न करत होत्या पण राजेश यांच्या मनात असं काही नव्हतं आणि म्हणूनच त्यांनी डिंपल यांना जवळ करून त्यांच्यातील आणि अंजुमधील दुरावा वाढवला असं म्हंटलं जातं.

डिंपल फार लहान होत्या जेव्हा त्यांना बॉबी सिनेमातून ब्रेक मिळाला. या सिनेमामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली पण त्यापूर्वीच त्या राजेश कपूर यांच्या संपर्कात आल्या होत्या आणि त्यांचं रिलेशनशिप सुरु झालं होतं.

बॉबी सिनेमानंतर डिंपल कोणत्याही सिनेमात काम करणार नाहीत अशी अट राजेश यांनी त्यांना घातली होती. डिंपल यांनी त्यावेळी त्यांच्या या अटी मान्य केल्या होत्या पण जसजशी राजेश यांच्या करिअरला उतरती कळा लागली तसतसा डिंपल आणि त्यांच्यातील दुरावा वाढत गेला आणि काही काळाने डिंपल त्यांच्या दोन्ही मुलींना घेऊन वेगळ्या राहू लागल्या.

डिंपल आणि राजेश खन्ना वेगळे झाले असले तरीही त्यांनी कधी घटस्फोट घेतला नाही. "डिंपलने स्वतःचं घटस्फोट घ्यायला नकार दिला", असा खुलासा राजेश यांनी नंतर एका मुलाखतीमध्ये केला होता.

राजेश खन्ना यांच्या उतारवयातील आजारपणात पुन्हा एकदा डिंपल त्यांच्याबरोबर राहू लागल्या आणि त्यांची काळजी घेतली. २०१२ मध्ये राजेश यांचं निधन झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT