sachin pilgaonkar  esakal
Premier

Sachin Pilgaonkar: श्रिया नाही तर 'ही' आहे सचिन-सुप्रिया यांची दत्तक घेतलेली मुलगी; वाचा तिचं पुढे काय झालं?

Payal Naik

लोकप्रिय मराठी अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर ही जोडी मराठी सिनेसृष्टीतील प्रचंड गाजलेली जोडी. त्यांनी आयुष्यातील चढ उतार एकत्रित पाहिले. परिस्थितीशी लढले. त्यांना एक मुलगीही आहे. श्रिया पिळगावकर सध्या बॉलिवूडमध्ये नाव कमावतेय. मात्र अनेकदा श्रिया त्यांची दत्तक मुलगी आहे का असा प्रश्न विचारण्यात येतो. असं का? तर लग्नाच्या दोन वर्षांनी त्यांनी करिश्मा नावाची एक मुलगी दत्तक घेतली होती. मात्र पुढे अशी काही परिस्थिती निर्माण झाली ज्यामुळे तिचे वडील तिला पुन्हा घेऊन गेले. त्या मुलीबद्दल अनेक गोष्टी सोशल मीडियावर बोलल्या जातात. आता ती मुलगी काय करते तुम्हाला ठाऊक आहे का?

करिश्मा मखानी ही कुलदीप मखानी या लंडनमधील एका रेस्टोरंट मालकाची मुलगी. कुलदीप आणि सचिन चांगले मित्र होते. करिश्मा अवघी ३वर्षांची होती. तेव्हा रेस्टोरंटमध्ये तिला पाहून सुप्रिया आणि सचिन तिच्या प्रेमात पडले. करीश्माची आई सतत आजारी असल्याने ती एकटी असायची. तिला हॉस्टेलमध्ये ठेवण्याचा कुलदीप यांचा बेत होता. मात्र सचिन आणि सुप्रिया यांना ते पाहावलं नाही. आणि यांनी तिला सोबत ठेवण्याचं ठरवलं. १९८८ पासून करिश्मा त्यांच्यासोबत राहू लागली. त्यांनी करिश्माला अजून कायदेशीररित्या दत्तक घेतलं नव्हतं. तिने सचिन यांच्या चित्रपटात लहानशी भूमिकाही केली होती. मात्र सगळं छान सुरू असल्याने अचानक काहीतरी बिनसलं.

karishma makhani

कुलदीप यांनी पैसे कमावण्यासाठी काही वाईट मार्ग वापरले होते. त्यानंतर ते एक दिवस अचानक करिश्माला घेऊन लंडनला निघून गेले. याबद्दल सचिन यांना त्यांनी कोणतीही कल्पना दिली नाही. त्यानंतर करिश्माने एक मुलाखत देत आपण स्वतः वडिलांसोबत गेलो होतो असं सांगितलं. १२ वर्षांनी जेव्हा करिश्माला सिनेसृष्टीत करिअर करायचं होतं तेव्ह ती परत सचिन यांच्याकडे आली. आणि सहा महिने त्यांच्यासोबत राहीली. तीच बॉलिवूडमध्ये काही झालं नाही त्यामुळे ती पुन्हा निघून गेली. आणि त्यानंतर ती गाशा गुंडाळून लंडनला निघून गेली.

करिश्मा सध्या काय करते?

करिश्मा सध्या लंडनमध्ये असून आपल्या परिवारासोबत राहते. मात्र तिने मुलाखतीत सचिन आणि सुप्रिया यांनी केवळ लोकप्रियतेसाठी आपला वापर केला असल्याचा आरोप केलेला. मात्र सचिन यांनी त्यांच्या बायोग्राफीमध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट सांगितल्या आहेत. या मुलीमुळे आपल्याला प्रचंड मानसिक त्रास झाला. सोबतच तिचे वडील आपले पैसे अडकवून पळून गेले. तर त्यांच्या एका सहीसाठी तिच्या आईने आपली अडवणूक केली. कायदेशीर लढाई लढावी लागल्याचंदेखील त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे. या सगळ्यामुळे उलट आमचंच नाव खराब झालं असा उल्लेख त्यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

Pitru Paksha 2024 : रक्षाविसर्जन, पिंडदान, पितृशांतीसाठी यमराजांनी कावळ्यालाच का दिला बहुमान?

Vivek Oberoi : "माझं पहिलं प्रेम कॅन्सरमुळे गमावलं" ; पूर्वायुष्यावर भरभरून बोलला विवेक, म्हणाला- "मी कधीच धोका..."

Latest Marathi News Updates : विनोद तावडेंच्या नेतृत्वात भाजपचा नवा विक्रम

MNS Amit Thackeray: अमित ठाकरेंसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधला; पण मुंबईतला नाही तर...

SCROLL FOR NEXT