YashraJ Mukhate Interview Esakal
Premier

Yashraj Mukhate : "पहिला व्हिडीओ पोस्ट करताना...", नव्याने क्रिएटर्स म्हणून सुरुवात करणाऱ्यांसाठी यशराजचा मोलाचा सल्ला

सकाळ डिजिटल टीम

Yashraj Mukhate : 'रसोडे में कौन था...' हा डायलॉग एका व्हिडीओमुळे प्रचंड चर्चेत आला होता. मालिकेतील या सीनचा हटके व्हिडीओ करण्यात आला आणि तो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाला. असेच विविध हटके डायलॉग आणि सीन्सला म्युझीक देऊन त्याला वेगळं स्वरुप देऊन गाणी रुपात सादर करण्याचा ट्ट्रेंड सुरु केला तो यशराज मुखाटेने. 'रसोडे में' या डायलॉगला तर त्याने हटके चाल आणि संगीत देऊन लक्षवेधी बनवलच शिवाय त्यानंतरही त्याने केलेले विविध व्हिडीओ व्हायरल झाले. याच व्हिडीओंनी यशराजला एक वेगळी ओळख दिली.

म्युझिक कम्पोजर आणि कॉन्टेंट क्रिएटर असलेला यशराज मुखाटे आता मराठी चित्रपटातून संगीतकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. 'एक दोन तीन चार' या चित्रपटातील 'लव्ह चुंबक' हे गाणं त्याने केलय. या निमित्ताने सकाळ समुहाला दिलेल्या मुलाखतीत त्याने अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

सध्याच्या सोशल मिडीया, रिल्स आणि इन्फ्लुएन्सर्सच्या जगात नेमकं काय पोस्ट करावं असा प्रश्न तरुणाईला असतो. आपण बनवलेला व्हिडीओ लोकं बघतील का ही शंका देखील असते. या शंकांचं निरसण यशराजने केलय.यशराज म्हणतो की, "आता खूप लोकं क्रिएटर्स झालीत, कॉन्टेन्ट क्रिएटर्स मोठ्या प्रमाणात आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे उत्तम दर्जाचे रील्स बनवली जातात.सध्या प्रेक्षकवर्ग पण वाढलाय आणि क्रिएटर्स पण वाढलेत. काहींना वाटतं की आपल्यासाठी प्रेक्षक नाहीत. पण व्ह्यूज तर येणारच कारण बघणारी लोकं देखील वाढली आहेत. पहिला व्हिडीओ टाकण्याच्या आधी घाबरु नका, बिनधास्त टाका. जर नाही जमलं तर डिलीट करता येतं. व्हिडीओ टाकायचा आणि नाही आवडलं तर नंतर काढून टाकता येण्याचा पर्याय देखील आहेच. पहिला व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर आपल्याला अंदाज येतो. पहिला आणि दहाव्या व्हिडीओमध्ये जो फरक आहे याचा अंदाज घेता येतो आणि नंतर ते दुरुस्त करु शकतो. व्हिडीओ बघणारा प्रेक्षकवर्ग खूप आहे आणि ते वाढत जाणार आहे."

ज्यांना व्हिडीओ पोस्ट करुन सोशल मिडीया किंवा युट्युब सारख्या ठिकाणी कॉन्टेन्ट क्रिएटर म्हणून नवी सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी यशराजने हा मोलाचा सल्ला दिला आहे. शिवाय तो पुढे म्हणतो की, "शिवाय जास्तीत जास्त व्हिडीओ बघण्याचा देखील मी सल्ला देईल. त्याच्यामुळे तुम्हाला विविध कल्पना आणि दर्जा यांचा अंदाज येतो. जेवढं तुम्ही कन्झ्युम करता तेवढा जास्त अंदाजही येतो."

एक दोन तीन चार या चित्रपटासाठी गाणं करण्याचा अनुभवही त्याने सकाळ समुहाशी बोलताना सांगितला. तो म्हणतो की, "चित्रपटासाठी गाणं करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती जिथे मी चित्रपटातील एका सीन संदर्भात गाणं केलय. यानिमित्ताने पहिल्यांदाच माझं गाणं सिनेमागृहात पाहता येणार आहे."

पहा संपूर्ण मुलाखत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT