Zee Marathi Serial Esakal
Premier

Zee Marathi : विठ्ठलाच्या परमभक्ताची गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीस ! आषाढी एकादशीनिमित्त झी मराठीने केली नवी घोषणा

सकाळ डिजिटल टीम

New Serial Update : सध्या टेलिव्हिजनवर अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांचा भेटीस येत आहेत. टीआरपीच्या रेसमध्ये न टिकणाऱ्या मालिका फार काळ टिकत नसून लगेचच त्याची जागा नवीन मालिका घेत असल्याचं गेल्या काही काळापासून पाहायला मिळतंय. झी मराठी वाहिनीवर सुद्धा आता एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने मालिकेचं पहिलं मोशन पोस्टर शेअर करण्यात आलं.

आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत झी मराठीवर नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली. 'सावळ्याची जणू सावली' असं या मालिकेचं नाव असून सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये मालिकेचं सुंदर मोशन पोस्टर पाहायला मिळतंय. विठ्ठलाची मूर्ती आणि त्याच्यासमोर त्याच्यासाठी हार विणणाऱ्या तरुणीची सावली असं या मोशन पोस्टरमध्ये दिसत असून या पोस्टरला 'पांडुरंगाची परमभक्त ती,सुरेल तिचा गळा,तुम्हालाही लागेल तिच्या गोड आवाजाचा लळा असं कॅप्शन देण्यात आलं आहे. '

या मालिकेत कोण मुख्य कलाकार असणार ? पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेल्या तरुणीची भूमिका कोण साकारणार हे अजून रिव्हील करण्यात आलं नाहीये. अनेकांना हे पोस्टर आवडलं असून प्रेक्षकांनी कमेंट करत या पोस्टरचं कौतुक केलं.

प्रेक्षकांनी केलेल्या कमेंट्सवरून ही मालिका झी बांगला वरील 'क्रिष्णाकोली' या मालिकेचा रिमेक असल्याचं समजतंय. कृष्णाची परमभक्त असलेल्या एका सावळ्या तरुणीच्या गायिका बनण्याची प्रवासाची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली होती. त्यामुळे आता या मराठी मालिकेत नेमकं काय कथानक पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. ही मालिका कधी प्रसारित होणार हे अजून उघड करण्यात आलं नाहीये.

दरम्यान नुकतीच झी मराठीवर 'लाखात एक आमचा दादा' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेत नितीश चव्हाण आणि दिशा परदेशी यांची मुख्य भूमिका असून बहिणींसाठी झटणाऱ्या भावाची गोष्ट या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 73 लाखांची रक्कम, सोने चांदीही दान, 8व्या दिवशी Lalbaug Cha Raja ला किती देणगी मिळाली?

IND vs BAN: विराटची तयारी जोरदार सुरू! शॉट खेळताना डायरेक्ट चेपॉकच्या मैदानाच्या भिंतीला भोकच पडलं

Shivaji Maharaj Statue Collapse ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे हे कारस्थान’ - डॉ. बाबा आढाव

ST Bus Travel : लगेच फोन करा.... ‘एसटी’तून प्रवास करताना प्रवाशांना येणाऱ्या अडचणींवर महामंडळाचा तोडगा

Ahmednagar Accident : प्रशिक्षण शिबिराचा शेवटचा दिवस अटोपून निघालेल्या दोघांचा पांढरीपुलावरील अपघातात मृत्यू

SCROLL FOR NEXT