Premier

Zee Marathi: गुढीपाडवा विशेष: निशी-नीरजचा साखरपुडा आणि पारूसमोर नवीन आव्हान, मालिकांमध्ये येणार नवीन ट्विस्ट

सकाळ वृत्तसेवा

Zee Marathi | नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सगळेचजण उत्सुक आहेत. उद्या म्हणजे ९ एप्रिल २०२४ ला गुढीपाडवा आहे आणि सगळेचजण दारावर गुढी उभारून नवीन वर्षाची नवी सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत. मराठी मालिकांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. झी मराठीवरील सगळ्या मालिकांमध्ये यंदा गुढीपाडवा खास पद्धतीने साजरा होणार आहे.

नुकत्याच सुरु झालेल्या ‘शिवा’ या नवया मालिकेला प्रेक्षकांचा सुंदर प्रतिसाद मिळतोय आणि या गुढीपाडव्याला शिवा आणि आशूची अनपेक्षित भेट होणार आहे. एका लहान मुलाला वाचवताना शिवाच्या हाताला लागत, हाताला लागल्यामुळे रामभाऊ तिला घरी यायला सांगतात. शिवाला घरी पाहून आशु शॉक होतो. तर दुसरीकडे आशु गुढी उभारत असताना त्याच्या हातून गुढी सुटते आणि नेमकी त्याचवेळेस शिवा ती सांभाळते. त्यामुळे योगायोगाने आशु आणि शिवाच्या हातून गुढी उभारली जाणार असून हीच त्यांच्या नव्या नात्याची सुरूवात असेल असं म्हणायला हरकत नाही.

तर 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मध्ये फॅक्टरी मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी कामगार आग्रह करतात की गुढी अक्षराच्या हातून उभारली जावी. हे कळल्यावर भुवनेश्वरीला राग येतो. ह्या वर्षी अक्षरा गुढी उभारून कामगारांना भेट म्हणून पुस्तकं देणार आहे.(Tula Shikvin Changlach Dhada


)

आणि 'पारू' ह्या मालिकेत नेमकं पारू बाहेर गेली असताना क्लायंट ब्रँड अम्बॅसॅडर बरोबरच्या फोटोजची फोटोसची मागणी होते. अखेर पारूला शोधून आणला जातं. पारू घाबरलेल्या अवस्थेत फोटो शूटसाठी तयार होते. नेमका हा दिवस आहे पाडव्याचा. पारूचं अहिल्यादेवीच्या वेशात फोटोशूट होतं आणि त्याचवेळी तिच्या हातून गुढीची पूजा पण पार पडते.

तर अप्पी आमची कलेक्टर मालिकेतही अप्पी तिच्या मुलासोबत गुढीपाडवा साजरा करणार आहे. मालिकेत अप्पीला विश्वास बसतो की, रुपालीपेक्षा अमोलची व्यवस्थित काळजी आणि संभाळ कोणीच करू शकत नाही. तेव्हा ती रूपालीला अमोल हा तुमचा पण मुलगा असल्याचे म्हणते. अमोलला आपण दोघी मिळून सांभाळू असे सांगते. हे बघून घरचे खुश होतात आणि अर्जुन-अप्पी व स्वप्निल-रुपाली अमोलचे आईबाबा आणि मोठ्ठे आईबाबा म्हणून अमोलला सांभाळायचे ठरवतात आणि पूर्ण परिवार मिळून गुढी पाडव्याचा सण साजरा करतात. अप्पी आणि रुपाली दोघी मिळून अमोलची काळजी घेतात. त्याला अंघोळ वगेरे घालून तयार करतात आणि मग अर्जुन आणि अप्पी, स्वप्निल-रुपाली व सुजय पियु गुढी उभारतात असं पाहायला मिळेल.

तर 'सारं काही तिच्यासाठी' मध्ये निशी- नीरजचा साकारपुडा शुभ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होणार आहे. पण या साखरपुड्यात विघ्न आणण्यासाठी लाली प्रयत्न करतेय.

यंदाचा गुढीपाडवा प्रेक्षकांसाठीही मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका तुमच्या आवडत्या गुढीपाडवा विशेष भाग संध्याकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत फक्त झी मराठीवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT