the signature  esakal
Premier

The Signature Release: सामान्य माणसाची असामान्य गोष्ट; गजेंद्र अहिरेंच्या ‘द सिग्नेचर’चा ट्रेलर प्रदर्शित

Payal Naik

Latest Entertainment News Updates: झी५ वर प्रदर्शित होणाऱ्या ‘द सिग्नेचर’ या नव्या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात अनुपम खेर, महिमा चौधरी, नीना कुलकर्मी, अन्नू कपूर आणि रणवीर शौरी असे दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत. ‘द सिग्नेचर’मध्ये आपल्या पत्नीवर मनापासून प्रेम करणाऱ्या आणि अचानक उद्भवलेल्या आरोग्याच्या संकटात तिला वाचवण्यासाठी अविरत लढणाऱ्या पतीची भावनिक गोष्ट पाहायला मिळणार आहे. पण हृदय पिळवटून टाकणाऱ्या एका अनपेक्षित घटनेमुळे त्यानं केलेला सर्व त्याग पणाला लागतो. के. सी. बोकाडिया आणि अनुपम खेर यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात प्रेम, त्याग, आशा, संघर्ष आणि मानवी ताकद अशा वेगवेगळ्या भावनांचं चित्रण पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना 4 ऑक्टोबरपासून ZEE5 वर हा सिनेमा स्ट्रीम करता येणार आहे.

ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे अरविंद (अनुपम खेर) आणि त्यांची पत्नी बऱ्याच काळापासून वाट पाहात असलेल्या परदेशात सहलीला निघालेले असतात. मात्र, अचानक विमानतळावर त्यांची पत्नी कोसळते. मध्यमवर्गीय उत्पन्नातून वाचवलेला सगळा पैसा तिला वाचवण्यासाठी खर्च करण्याचं ठरवतात. दुरावलेली मुलं आर्थिक मदत देण्याचं नाकारत त्यांच्या सह- मालकीचं घर विकायलाही नकार देतात. ते आपले जवळचे मित्र, जुन्या परिचितांकडे पैसे मागतात आणि ते ही अशा कठीण काळात त्यांची मदत करायला येतात. अशातच डीएनआर फॉर्म (Do Not Resuscitate) भरायची वेळ आल्यामुळे हा भावनिक संघर्ष आणखी तीव्र होतो. वेळ आल्यानंतर तिला जाऊ द्यायचं की आशेवर कायम राहायचं अशा विचित्र कात्रीत ते अडकतात. ते कशाची निवड करतील? आणि त्यासाठी काय किंमत द्यावी लागेल?

याबद्दल बोलताना निर्माते आणि प्रमुख अभिनेते अनुपम खेर म्हणाले, ‘अनुपम खेर स्टुडिओने व्यक्तीरेखांवर आधारित सिनेमे दर्जेदार कथाकथन व अनोख्या सिनेमॅटिक अनुभवासह सादर करण्याचे व त्याद्वारे जगभरातील प्रेक्षकांना आपलेसे करण्याचे ध्येय ठेवले आहे. द सिग्नेचर सिनेमात एक मध्यमवर्गीय माणूस साकारला आहे. सारांश सिनेमा असो, खोसला का घोसला असो, संसार असो किंवा सलाखे, मी कायमच प्रत्येक भूमिकेला काहीतरी वेगळेपण देण्याचा प्रयत्न केला आहे. या सिनेमातील माझ्या व्यक्तीरेखेचे वेगळेपण म्हणजे तो आपल्या पत्नीवर समर्पित वृत्तीने प्रेम करतो. इतक्या वर्षांत त्यांचे नाते जोडीदाराच्या पलीकडे गेले आहे. ते एकमेकांचे मित्र झाले आहेत. हेच या व्यक्तीरेखेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.'

ही कथा सर्वांना आपलीशी वाटेल, कारण त्यामध्ये असंख्य लोकांना आपल्या आयुष्याचे प्रतिबिंब दिसेल. मी सामान्य माणसाच्या आयुष्यावर आधारित दर्जेदार कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बांधील असून हा सिनेमा त्याला अपवाद नाही. ही भावस्पर्शी आणि आपलीशी वाटणारी कथा जगभरातील प्रेक्षकांना ZEE5 च्या माध्यमातून पाहाता येईल. मला आशा आहे, की या सिनेमाला सर्व प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळेल.’ 4 ऑक्टोबर रोजी एका सामान्य माणसाचा असामान्य प्रवास ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs New Zealand: भारतीय फिरकीपटूंसमोर किवी फलंदाजांचा कस लागणार, न्यूझीलंडच्या खेळाडूनंच दिला सावधानतेचा इशारा

Manoj Jarange: ''फडणवीस साहेब, तुमचं विधानसभेचं गणित बिघडणार..'' मनोज जरांगेंचा इशारा; सरकारला नवा अल्टिमेटम

Chandrasekhar Bawankule: मंत्रिमंडळात चर्चा न करताच संस्थेला भूखंड दिल्याने वाद; चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली प्रतिक्रिया

Latest Maharashtra News Updates : मुंबई-पुण्यात जोरदार पावसाची हजेरी! नागरिकांची तारांबळ

Ishan Kishan घेणार ऋषभ पंतची जागा, IND vs BAN मालिकेसाठी टीम इंडियात होणार पुनरागमन?

SCROLL FOR NEXT