पुणे - भारतातील नामांकित शिक्षण संस्थांमधून इंजिनिरिंग आणि बिजनेस विषयातील शिक्षण घेऊन २०२४ ला बाहेर पडणाऱ्या बॅचवर भारतातील मोठ्या बँका नजर ठेऊन आहेत. नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया आणून डिजिटल बँकिंग अधिक सक्षम करण्यासाठी या बँका तसेच फायनान्स कंपन्यांना नवीन पद्धतीने विचार करणाऱ्या पिढीची आवश्यता आहे.
६४ लाखांपर्यंत पगार
या विद्यार्थ्यांसाठी बँकांकडून मोठमोठ्या पगाराच्या ऑफर्स तयार असून या ७.५ लाखांपासून ते ६४ लाखांपर्यंत पगार या विद्यार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे. तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्यामध्ये पॅकेज याहूनही अधिक मिळण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात कॅम्पस इंटरव्हू
साधारण फेब्रुवारी ते मार्च २०२४ दरम्यान ही नव्यानं येणारी बॅच पास होऊन बाहेर पडणार असून नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यानच बँकांची आणि फायनान्स कंपन्यांची प्लेसमेंट प्रोसेस इन्स्टिट्यूट, महाविद्यालयांमध्ये सुरु झाली आहे.
'टायर वन' मधील विद्यार्थी कोण ?
या कंपन्यांची पहिली पसंती असणाऱ्यांमध्ये भारतातील सर्व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे (IIM, Nagpur) व काही नामांकित महाविद्यालयांचे विद्यार्थी असतात. यांना टायर वन मधील विद्यार्थी संबोधले जाते. कंपनीला यातून हवे तितके विद्यार्थी नाही मिळाले की मग कंपन्या याच्या खालोखाल असणाऱ्या महाविद्यालये आणि इन्स्टिटयूटची निवड करते.
IIM, Nagpur प्लेसमेंट रिपोर्ट
नागपूरच्या इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट (IIM, Nagpur) मध्ये २०२१ ते २०२३ बॅचच्या प्लेसमेंट अहवालात नमूद केल्याप्रमाणे सर्वाधिक पॅकेज हे ६४ लाखांचे मिळाले आहे. तर २३६ पैकी ५० टक्के विद्यार्थ्यांना ऍव्हरेज १८ लाख ९१ हजारांचे पॅकेज मिळाले आहे.
२३६ पैकी ३२ टक्के विद्यार्थी हे फ्रेशर्स होते. यातील ३३. टक्के विद्यार्थी आयटी मध्ये तर ३०.७० टक्के विद्यार्थी हे 'बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स' (BFSI) क्षेत्रात नोकरी मिळवलेले आहेत.
जमनालाल बजाज इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टेडीज (JBIMS) प्लेसमेंट रिपोर्ट
मुंबईच्या जमनालाल बजाज इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टेडीजने (JBIMS) संकेतस्थळावर जाहीर केलेल्या 'फायनल प्लेसमेंट रिपोर्ट २०२१-२०२३' या बॅचच्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे, हे विद्यार्थी साधारण २४ वर्ष वयाचे होते .
१५० जणांच्या बॅचमध्ये ८५ टक्के मुले तर केवळ १५ टक्केच मुली होत्या. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ८१ टक्के मुले ही इंजिनियरिंगची पार्शवभूमी असणारी मुले होती. तर त्यातील ६५ टक्के विद्यार्थ्यांना काही महिन्यांचा अनुभव होता. तर ३५ टक्के विद्यार्थी हे फ्रेशर होते.
यामध्ये सर्वाधिक पगार घेणाऱ्या विद्यार्थ्याला ३५ लाख ७५ हजाराचे पॅकेज मिळाले होते. यामध्ये ४३ टक्के प्लेसमेंट ही 'बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स' (BFSI) आणि इन्व्हेस्टमेंट बँकिंग (IB) या क्षेत्रात झाली आहे. तर त्याच्या खालोखाल ३१ टक्के प्लेसमेंट या कन्सल्टिंग क्षेत्रात झाल्या आहेत.
फ्रेशर्सना चांगली संधी
याबाबत 'सकाळ' शी बोलताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्सच्या (PUMBA) विभागप्रमुख डॉ.सुप्रिया पाटील म्हणाल्या, सध्या फायनान्स सेक्टरमध्ये विद्यार्थ्यांचा जाण्याचा कल अधिक आहे.
साधारण ४० ते ५० टक्के विद्यार्थी हे फायनान्स हा विषय घेऊन त्यात पुढे करियर करतात. प्लेसमेंट करत असताना कंपन्यांना नवीन टेक्नोसॅव्ही विद्यार्थी, ज्यांच्याकडे नवीन कल्पक विचार करण्याची क्षमता आहे. मुख्य म्हणजे हे विद्यार्थी फार पगाराची अपेक्षा करत नाहीत तसेच त्यांच्या जॉबसंदर्भात फार अटी नसतात. त्यामुळे फ्रेशर्सना अधिक चांगली संधी दिली जाते.
विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार केल्यास त्यांना सुरुवातीलाच चांगल्या नामांकित कंपनीत चांगले पॅकेज मिळतात. तसेच फायनान्स मुख्यतः बँकिंग सेक्टरमध्ये आयटीपेक्षा कामाच्या वेळा कमी, स्थिर काम, पगार चांगले, सुविधा अधिक त्यामुळे फ्रेशर्सना या जॉबची अधिक भुरळ पडते.
यंग टॅलेंट शोधणे सोपे
दरम्यान नाव न सांगण्याच्या अटीवर बँकिंग क्षेत्रातील प्लेसमेंट ऑफिसर म्हणाले, एकूण मार्केटमधून चांगल्या टॅलेंटची निवड अवघड असते. प्लेसमेंट आणि चांगल्या कॉलेजमधून आम्हाला यंग टॅलेंट शोधणे सोपे होते. तसेच विद्यार्थ्यांना देखील जॉबसाठी अर्ज करत बसण्यापेक्षा थेट जॉब मिळतो. आम्हाला या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून डिजिटल क्षेत्रात नवीन फळी उभी करता येते.
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.