Legal Matters इच्छापत्राचे महत्त्व 
प्रीमियम अर्थ

Legal Matters उठा...जागे व्हा! आजच करा इच्छापत्र!

आपण अनेक वर्षे कष्ट करून मिळविलेल्या स्थावर आणि जंगम संपत्तीचा Property अमूल्य ठेवा आपल्या वारसांच्या हाती अलगद सोपविला जावा, अशी इच्छा सर्वच सुजाण आणि सजग नागरिकांची Citizens असते; परंतु, मनातील व्यर्थ शंका, आळस, चालढकल, हटवादीपणा, भीती हे शत्रू आडवे येतात आणि हे एक महत्त्वाचे काम मागे रेटले जाते

गौरी रास्ते

Legal Matters इच्छापत्र करण्याचे महत्त्व माहीत असूनही, अनेकदा ते करण्याबाबत चालढकल केली जाते. आपण कष्टाने मिळवलेली संपत्ती आपल्या वारसांना सहजपणे मिळावी अशी इच्छा असूनही, अनेकदा योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्याने त्यात अडचणी निर्माण होतात आणि वारसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी इच्छापत्र किंवा मृत्युपत्र करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. Legal Matters in Marathi Why it is important to make legal will

आपण अनेक वर्षे कष्ट करून मिळविलेल्या स्थावर आणि जंगम संपत्तीचा Property अमूल्य ठेवा आपल्या वारसांच्या हाती अलगद सोपविला जावा, अशी इच्छा सर्वच सुजाण आणि सजग नागरिकांची Citizens असते; परंतु, मनातील व्यर्थ शंका, आळस, चालढकल, हटवादीपणा, भीती हे शत्रू आडवे येतात आणि हे एक महत्त्वाचे काम मागे रेटले जाते.

आपण सर्वांनी कोविडच्या Covid 19 महासाथीला तोंड दिले, जीवनाची अनिश्चितता अनुभवली. त्यातून, आपल्या कुटुंबाचे कल्याण व आर्थिक व्यवस्थापन Management या गोष्टी आपल्या पश्चातही सुरळीत व्हाव्यात; आपल्या जोडीदाराला मानाचे, आर्थिक स्वातंत्र्याचे Financial Freedom जीवन जगता यावे, याचे महत्त्व आपल्याला चांगलेच जाणवले आहे. नोंदणीकृत इच्छापत्र करणे, त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे या गोष्टी म्हणूनच करायला हव्यात. त्या जितक्या तातडीने होतील, तितके बरे!

इच्छापत्र, म्हणजे मृत्युपत्र (विल) हे योग्य वेळी केले नाही, तर काय नुकसान होऊ शकते, आपल्या वारसांना किती मनस्ताप होऊ शकतो, त्यांचा किती वेळ व्यर्थ हेलपाटे घालण्यात जाऊ शकतो, आपल्याच आई-वडिलांची संपत्ती मिळविण्यासाठी त्यांना किती खटाटोप करावा लागतो, याची बोलकी उदाहरणे पुढे नमूद केली आहेत. ती वाचा, म्हणजे इच्छापत्राचे गांभीर्य कळेल.

हे देखिल वाचा -

१) शरद आणि शुभदा यांना एकच मुलगी होती. मोठा फ्लॅट, तसेच जंगम संपत्ती त्यांच्या मालकीची होती. मुलगी सुखाने सासरी नांदत होती. शरदराव निवृत्त झाले होते. आपले एकच अपत्य आहे, आपल्यानंतर हे सर्व तिच्याच मालकीचे होईल, याची त्यांना खात्रीच होती. त्यांनी इच्छापत्र केले नाही. दोघांच्या निधनानंतर त्यांच्या मुलीला सिद्ध करावे लागले, की ती त्यांची एकुलती एक मुलगी आहे. खूप कागदपत्रे, कोर्टाच्या चकरा, वारसापत्र मिळविण्याचा मनस्ताप, हेलपाटे आणि खर्च हा सगळा त्रास तिच्या वाट्याला आला.

२) वसंतरावांचे आकस्मिक निधन झाले. त्यांचे कोणतेही आर्थिक व्यवहार सुशीलाताईंना माहीत नव्हते. वसंतरावांनी त्यांचे मृत्युपत्र केले नव्हते. सुशीलाताईंना संपत्ती आपल्या नावावर करून घेताना खूप मनस्ताप झाला, अनेक अडचणीना तोंड द्यावे लागले. शिवाय वारेमाप खर्च झालाच. वसंतरावांनी वेळेवर इच्छापत्र करून ठेवले असते, तर ही कटकट वाचली असती.

३) माधव आणि वासंती यांचे सुखवस्तू कुटुंब. वासंती सर्वच बाबतीत माधवरावांवर अवलंबून. माधवरावांची एक खोड होती. ते सगळी कामे पुढे ढकलत राहायचे. आता काय घाई आहे, बघू सवडीने, आजपर्यंत कुठे अडले आहे, वेळ आली की बघू, असे म्हणायची त्यांची सवय होती. मृत्यू या विषयावर कोणी बोलू लागले, की ते काणाडोळा करायचे. अचानक एक दिवस त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मग मात्र, त्यांनी ताबडतोब इच्छापत्र करायचा निर्णय घेतला. पत्नीला सर्व व्यवहार समजावून सांगितले. इतकी निर्वाणीची वेळ येईपर्यंत आपण थांबलो, याचा त्यांना पश्चातापही झाला.

४) सर्वच आर्थिक व्यवहार अगदी गुप्त ठेवण्याची सवय निर्मलाताईंना होती. यजमानांच्या मागे त्यांनी सर्वच व्यवहार धोरणीपणे सांभाळले. त्यांची दोन्ही मुले हाताशी आली, तरीही त्यांनी आपल्या स्थावर, जंगम संपत्तीविषयी मुलांना अज्ञानात ठेवले. एके दिवशी निर्मलाताईंना पक्षाघाताचा झटका आला. आता मात्र मुलांना सारे सांगावे, असे त्यांना वाटले; पण शरीर साथ देईना. नीट बोलणेसुद्धा जमत नव्हते. बरेच उपचार घेतल्यानंतर त्या थोड्या सावरल्या, आजवरची चूक दुरुस्त केली आणि रीतसर नोंदणीकृत इच्छापत्र त्यांनी बनवले.

हे देखिल वाचा -

५) ‘‘आपण इच्छापत्र केले, तर मुले आताच भांडणे सुरू करतील, आपली सगळी आर्थिक बाजू त्यांच्यासमोर उघड होईल, आपण मुदत ठेवीच्या ज्या रकमांचा उल्लेख करणार, त्या रकमा आपल्याच वापरासाठी लागल्या तर? सोने-नाणे आपल्या आजारपणामध्ये मोडावे लागले तर?’’ अशी पोकळ भीती आणि शंका मनात बाळगून सुरेशकाकांनी मृत्युपत्र केले नाही. त्यांनी या शंका, भीती यांच्याविषयी वकिलांशी चर्चा करायला हवी होती. तज्ज्ञ व्यक्तींकडे सर्व शंकांना समाधानकारक उत्तरे असतात. या शंकांबाबत इच्छापत्रात योग्य ती कलमे घालता येतात, हे सुरेशकाकांना माहीत नव्हते. त्यांच्या मृत्यूपश्चात दोन्ही मुलांना संपत्ती नावावर करून घेताना खूप मनस्ताप झाला, वारसापत्र मिळविण्यासाठी खूप खर्च होऊन अनेक हेलपाटे घालावे लागले.

६) आनंदराव तसा अत्यंत हटवादी माणूस. ‘आमच्या वडिलांनी, आजोबांनी कुठे इच्छापत्र केले होते? आम्ही, आमच्या आधीच्या पिढ्यांनी, त्याकाळी सामोपचाराने वाटण्या केल्याच ना? आमची कुठे एवढी मोठी इस्टेट आहे, की इच्छापत्र करावे? मुले घेतील की आपसात वाटणी करून!’ आनंदराव आपल्या मतावर अगदी ठाम होते. स्थावर संपत्तीचे गगनाला भिडलेले भाव, जुन्या काळी पै-पैसा साठवून जमविलेले सोने-नाणे, शेअर, हा सारा ठेवा आपल्या वारसांच्या हाती योग्य वेळेस सोपविण्याचा इच्छापत्र हा एकच राजमार्ग आहे, हे त्यांनी मान्य केले नाही. साहजिकच, शहराच्या मध्यवर्ती भागात वाटणीस आलेला एका मोठ्या वाड्याचा हिस्सा मिळण्यात आनंदरावांच्या मुलांना पुढे खूप मोठा काळ घालवावा लागला. वारसापत्र मिळविण्यासाठीही खूप खर्च झाला.

७) शामलाकाकू आणि शंकरराव यांनी त्यांच्या वकिलांपाशी एक महत्त्वाची शंका बोलून दाखविली. ‘आमचा भाचा आणि मित्राची सून हे दोघे आमच्या इच्छापत्रावर साक्षीदार म्हणून सह्या करणार आहेत. आमच्या मुलीला आम्ही बंगल्याचा वरचा भाग देणार आहोत, ही गोष्ट आत्ताच आमच्या दोन्ही मुलांना सांगावी, असे वाटत नाही. अशा वेळी साक्षीदार इच्छापत्राचा मजकूर वाचणार नाहीत ना? गोपनीयता राहील का?’ वकिलांनी त्यांचे शंकानिरसन केले, ‘साक्षीदारांनी इच्छापत्र वाचण्याची काहीही गरज नसते. फक्त इच्छापत्र करणारी व्यक्ती समोर हयात आहे, याची साक्ष म्हणून ती व्यक्ती आणि साक्षीदार यांनी एकाचवेळी दस्तावर सह्या करायच्या असतात.’ हे ऐकून मनातील एवढी मोठी शंका दूर झाल्याने काका-काकू नोंदणी कचेरीत जाऊन इच्छापत्र करण्यास राजी झाले.

८) आज श्रीधर मामांच्या घरात जणू युद्धाचे वातावरण झाले होते. कलामामी एका व्याख्यानाला जाऊन आल्या होत्या. तेथे एका वकील महाशयांनी इच्छापत्राविषयी सर्व सभासदांचे उद्बोधन केले होते. कलामामींची खात्री पटली होती, ‘आपण दोघेजण आता ज्येष्ठ नागरिक झालो आहोत, आता शरीर, मन सक्षम आहे तोवर आपले इच्छापत्र केलेच पाहिजे.’ घरी आल्यावर त्यांनी हा विषय मामांसमोर मांडला. मामा संतापले. म्हणाले, ‘‘तू काय माझ्या मरणावर टपली आहेस का? मी एवढ्यात मरणार नाही.’’ परंतु नंतर आठच दिवसात मामांचा एक जिवलग मित्र अपघातात मरण पावला. मामांचे डोळे उघडले. काळाची पावले त्यांनी ओळखली. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यांनी रीतसर नोंदणीकृत इच्छापत्र बनवले.

इच्छापत्र केलेले नसले, तर आपल्या वैयक्तिक कायद्यानुसार संपत्तीची वाटणी होत असते (उदा. हिंदू वारसा कायदा). शिवाय, वारसांपैकी कोणाचे दरम्यानच्या काळात निधन झाले असले, तर त्या वारसाच्या वारसांचा हक्क निर्माण होतो. ही गुंतागुंत, कागदपत्रे वाढत जातात. सध्याच्या धकाधकीच्या काळात कोणाकडेच वेळ नसतो. त्यामुळे, सर्व वारस एकत्र येऊन कागदपत्रांची पूर्तता होणे कठीण होते.

आपल्या संपत्तीच्या वाटपासाठी इच्छापत्र केले नाही आणि नामांकनसुद्धा केलेले नाही, अशी स्थिती असेल, तर सदनिकेचा मासिक खर्च भरणे, विविध कर भरणे... सगळेच अवघड होते. अशावेळी स्थावर मालमत्ता धूळ खात पडून राहते. जंगम संपत्तीही काही काळानंतर बँकेच्या ‘निष्क्रिय’ खात्यात वर्ग होते.

वर दिलेल्या गोष्टी कानाआड करण्याएवढ्या क्षुल्लक नक्कीच नाहीत. म्हणूनच, उठा, जागे व्हा! आपल्या वारसांचा दुवा घ्या. त्यांना आपली संपत्ती विनासायास हस्तांतरित करण्याचा राजमार्ग निवडा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT