power index share market esakal
प्रीमियम अर्थ

Share Market: जास्त भांडवलवृद्धी हवी असेल तर याचा अभ्यास हवाच..

‘पॉवर’ बाज! पॉवर सेक्टर इंडेक्स

सकाळ डिजिटल टीम

प्रमोद पुराणिक


मुख्य निर्देशांकापेक्षा जास्त भांडवलवृद्धी मिळवायची असेल, तर क्षेत्रीय निर्देशांकाचा अभ्यास करायलाच हवा. ऊर्जा अर्थात पॉवर क्षेत्राचा निर्देशांक आणि या निर्देशांकातील कंपन्यांवर लक्ष ठेवलेच पाहिजे. या हेतूने पॉवर सेक्टर इंडेक्स या निर्देशांकाचा थोडक्यात परिचय करून देत आहोत.


गेल्या २३ जानेवारी २०२४ रोजी शेअर बाजार जेव्हा बंद झाला, तेव्हा पॉवर सेक्टर निर्देशांक ५९३५ अंशांवर बंद झाला होता.

या निर्देशांकाने एका दिवसाची घट १०३ अंशांची दाखवलेली असली, तरी एक वर्षाची वाढ ३२ टक्के, दोन वर्षांची ५० टक्के, तर तीन वर्षांची १८४ टक्के वाढ आहे.

या निर्देशांकात एकूण १३ कंपन्या असून, या सर्व कंपन्यांचे बाजारमूल्यांकन १८ लाख कोटी रुपये, उपलब्ध मूल्यांकन ६.५० लाख कोटी रुपये, पीई रेशो २५, याचा अर्थ ७२ हजार कोटी रुपयांच्या अपेक्षित निव्वळ नफ्यासाठी १८ लाख कोटी रुपये मोजण्याची बाजाराची तयारी आहे.

तीन कंपन्या अदाणी उद्योगसमूहाच्या

निर्देशांकात चढ-उतार कसे झालेले आहेत, याचा धावता आढावा घेऊ या. सर्वाधिक निर्देशांक ६१६२ (२३/०१/२०२४), सर्वांत कमी निर्देशांक वर्षभरातील ३२३६ (२७/१२/२०२३) याचा अर्थ निर्देशांकाने वर्षभरात दुप्पट पैसे करून दिले आहेत.

एकूण १३ कंपन्यांपैकी तीन कंपन्या अदाणी उद्योगसमूहाच्या आहेत. एक टाटा उद्योगसमूहाची, चार सार्वजनिक क्षेत्रातील आणि राहिलेल्या इतर कंपन्या आहेत.

अलीकडच्या काळात सुझलॉन एनर्जीने जरी जबरदस्त भांडवलवृद्धी दिलेली असली, तरी हा शेअर बाजारातील सटोडियांच्या हातातील खेळणे आहे, की खरोखर कंपनीचा आर्थिक पाया भक्कम झालेला आहे, यांची अजून अनिश्चितता आहे.

‘भेल स्वस्त, भेळ महाग’
सार्वजनिक क्षेत्रातील चार कंपन्या गुंतवणूकदारांकडे असायला हव्यात. या कंपन्यांनी जबरदस्त भांडवलवृद्धी दिली आहे. तीन वर्षांपूर्वी हा शेअर २७ रुपयांस उपलब्ध होता.

म्हणून गंमतीने असे वाक्य लिहिले होते, की ‘भेल स्वस्त, भेळ महाग’, एनटीपीसी आणि एनएचपीसी हे दोन्ही शेअर गुंतवणूकदारांकडे असायला हवेत. याचे सोपे कारण असे आहे, की पाऊस पुरेसा पडला नाही, तर एनटीपीसी जोरात चालेल.

कारण थर्मल पॉवर तर पाऊस चांगला. म्हणून एनएचपीसी हायड्रो इलेक्ट्रिक, एनटीपीसी या शेअरचे भागभांडवल खूप मोठे आहे, अशी पूर्वी तक्रार असायची; तर एनएचपीसी २५-३० रुपयांस उपलब्ध होता. तो आता ७६ रुपये झाला. अलीकडेच सरकारने ६६ रुपये भावाने पुन्हा काही शेअरची विक्री केली.

आयुष्यभरासाठी गुंतवणूक
एबीबी आणि सिमेन्स या दोन बहुदेशीय कंपन्यांमध्ये तर आयुष्यभरासाठी गुंतवणूक असावी. याशिवाय काही कंपन्या आहेत.

सीजी पॉवर या कंपनीने खूप चढ-उतार पाहिले. टाटा पॉवर आज जरी एकच कंपनी असली तरी पूर्वी बाजारात टाटांच्या तीन कंपन्या अस्तित्वात होत्या.

१९८० मध्ये कंपन्या जुन्या असूनसुद्धा त्यांच्या शेअरची दर्शनी किंमतीलाच बाजारात आणखी शेअरविक्री झाली होती.
थोडक्यात, हे क्षेत्र, हा निर्देशांक आणि या निर्देशांकातील कंपन्या यांच्यावर लक्ष ठेवलेच पाहिजे.


ऊर्जा (पॉवर) क्षेत्रातील १३ कंपन्यांची नावे, बाजारभाव, दर्शनी किंमत, बाजार मूल्यांकन आणि उपलब्ध मूल्यांकन याची आकडेवारी प्रसिद्ध देत आहोत.

१) एबीबी - बाजारभावः ४७५५ रुपये
दर्शनी किंमतः २ रुपये
बाजार मूल्यांकनः १ लाख कोटी रुपये
उपलब्ध मूल्यांकनः २५ हजार कोटी रुपये

२) अदानी एनर्जी - बाजारभावः १०५६ रुपये
दर्शनी किंमतः १० रुपये
बाजार मूल्यांकनः १.१८ लाख कोटी रुपये
उपलब्ध मूल्यांकनः ३१ हजार कोटी रुपये

३) अदानी ग्रीन एनर्जी - बाजारभावः १६८१ रुपये
दर्शनी किंमतः १० रुपये
बाजार मूल्यांकनः २.७० लाख कोटी रुपये
उपलब्ध मूल्यांकनः ६१ हजार कोटी रुपये

४) अदानी पॉवर - बाजारभावः ५१८ रुपये
दर्शनी किंमतः १० रुपये
बाजार मूल्यांकनः २ लाख कोटी रुपये
उपलब्ध मूल्यांकनः ५० हजार कोटी रुपये

५) भेल - बाजारभावः २०३ रुपये
दर्शनी किंमतः २ रुपये
बाजार मूल्यांकनः ७१ हजार कोटी रुपये
उपलब्ध मूल्यांकनः २६ हजार कोटी रुपये

६) सीजी पॉवर - बाजारभावः ४४७ रुपये
दर्शनी किंमतः २ रुपये
बाजार मूल्यांकनः ८० हजार कोटी रुपये
उपलब्ध मूल्यांकनः २९ हजार कोटी रुपये

७) एनएचपीसी - बाजारभावः ७६ रुपये
दर्शनी किंमतः १० रुपये
बाजार मूल्यांकनः ७६ हजार कोटी रुपये
उपलब्ध मूल्यांकनः २१ हजार कोटी रुपये

८) एनटीपीसी - बाजारभावः ३०२ रुपये
दर्शनी किंमतः १० रुपये
बाजार मूल्यांकनः २.९३ लाख कोटी रुपये
उपलब्ध मूल्यांकनः १.४४ लाख कोटी रुपये

९) पॉवरग्रीड - बाजारभावः २३० रुपये
दर्शनी किंमतः १० रुपये
बाजार मूल्यांकनः २.२१ लाख कोटी रुपये
उपलब्ध मूल्यांकनः १ लाख कोटी रुपये

१०) जेएसडब्ल्यू एनर्जी - बाजारभावः ४८३ रुपये
दर्शनी किंमतः १० रुपये
बाजार मूल्यांकनः ८० हजार कोटी रुपये
उपलब्ध मूल्यांकनः २१ हजार कोटी रुपये

११) सिमेन्स - बाजारभावः ४०८८ रुपये
दर्शनी किंमतः २ रुपये
बाजार मूल्यांकनः १.४६ कोटी रुपये
उपलब्ध मूल्यांकनः ३६ हजार कोटी रुपये

१२) सुझलॉन एनर्जी - बाजारभावः ४१ रुपये
दर्शनी किंमतः २ रुपये
बाजार मूल्यांकनः ५६ हजार कोटी रुपये
उपलब्ध मूल्यांकनः ४३ हजार कोटी रुपये

१३) टाटा पॉवर - बाजारभावः ३४६ रुपये
दर्शनी किंमतः १ रुपया
बाजार मूल्यांकनः १.११ लाख कोटी रुपये
उपलब्ध मूल्यांकनः ५९ हजार कोटी रुपये

(लेखक भांडवली बाजाराचे अनुभवी अभ्यासक-विश्लेषक आहेत. मोबाईल ९८२२०७८८२९)
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT