पुणे - माझा लहान मुलगा सकाळी जेव्हा ब्रश करतो तेव्हा अनेकदा न कळत तो टूथपेस्ट गिळून टाकतो.. सुरुवातीला मी याकडे फारसे लक्ष दिले नाही पण जेव्हा समजले की, अनेक टूथपेथमध्ये अस्पारटिम (Aspartame) नावाचा घटक असतो. जो साखरेसारखाच रासायनिक पदार्थ असतो ज्यामुळे पदार्थात गोडवा येतो. पण तो कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. ही गोष्ट कळल्यावर मला मुलाची फारच काळजी वाटायला लागली... अशी खंत एका भारतीय आईने व्यक्त केली.
'फायनान्शियल एक्सप्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राने एका लेखात दिलेल्या माहितीनुसार..
WHO नुसार 'अस्पारटिम' कोणत्या पदार्थांमध्ये?
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जून २०२३ ला 'अस्पारटिम' संभाव्य 'कार्सिनोजेन' म्हणून घोषित केल्याच्या बातम्या आल्या; मात्र जुलै महिन्यात याबाबत अधिक संशोधन होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हंटले.
'अस्पारटिम' हा घटक काही शीतपेये, चघळून खाण्याच्या गोळ्या (chewing gum), आईसक्रीम, दुधाचे पदार्थ, योगर्ट, खोकल्याचे औषध, नाश्त्याचे पदार्थ यांमध्ये हा पदार्थ आढळून येत असल्याचेही संघटनेने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
ग्लोबल फूड सिक्युरिटी इंडेक्स काय सांगते?
ग्लोबल फूड सिक्युरिटी इंडेक्स २०२२ नुसार, अन्न सुरक्षेच्या बाबतीत ११३ राष्ट्रांमध्ये चांगली कामगिरी करणारे सर्व विकसनशील देश होते. पण २०१९ पासून यादीतील वर क्रमांकाचे देश आणि खालच्या क्रमांकाचे देश यांच्यातील दरी ज्या पद्धतीने वाढते आहे हो चिंतेची बाब असून ग्राहकांना परवडण्याजोगी किंमत आणि उत्पादनाची गुणवत्ता या घटकावर परिणाम झाल्याचे आढळून आहे. भारत देश या इंडेक्स मध्ये ६८ व्या क्रमांकावर होता.
शीतपेयांमध्ये हेल्दी पर्याय भारतात कमीच..
भारतात १९८० सालापासून वेगवेगळे फास्ट फूड (food and beverage (F&B) products) मिळणे सुरु झाले. यामध्ये शीतपेये, चघळून खाण्याच्या गोळ्या (chewing gum), आईसक्रीम, दुधाचे पदार्थ, योगर्ट हे पदार्थांचा समावेश आहे.
एका प्रसिद्ध शीतपेयाच्या ब्रँडने अनेक देशांमध्ये हेल्दी, नैसर्गिक पद्धतीने साखरेचा उपयोग करून तयार केलेले आपले शीतपेय लाँच केले होते पण भारत यात पहिल्या ४० मध्ये देखील नव्हता.
जागतिक हॉटेल साखळीत भारतात मर्यादित आरोग्यदायी पदार्थ
१९९६ साली भारतात एक प्रसिद्ध ब्रँडची हॉटेल साखळी सुरु केली. यावेळी त्यांनी भारतीयांना आवडणारे काही पदार्थ त्यांच्या मेनू मध्ये नव्याने घेतले. पण त्यांनी त्यांच्या युके च्या संकेतस्थळावर असंही जाहीर केलेलं की,
आमच्या मेनूमधील अनेक पदार्थ ग्लूटेन असलेल्या घटकांपासून मुक्त आहेत. पण, आमच्या किचन सेटअपमुळे, आम्ही गॅरंटी देऊ शकत नाही की पदार्थांचे एकमेंकांवर उलट परिणाम होणार नाही,"
त्यामुळे ऍलर्जी असणाऱ्या भारतीयांचे काय? असा प्रश्न आहे. तर भारतात अनेक व्हेगन पदार्थ खाणारे लोक आहेत मात्र त्यांना खूप कमी चॉइस खाण्यासाठी उपलब्ध आहेत. त्या तुलनेत यूएस, यूके, जर्मनी, फ्रान्स, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांत सॅलड, ओट्स आणि दलिया ते फळांचे प्रकार, दही असे अनेक पदार्थ उपलब्ध आहेत.
हॉटेलमधील मेन्यूमध्ये पण पर्याय कमीच
विकसित आणि विकसनशील देशांमध्ये आपल्या ऑफरमध्ये स्पष्ट फरक दाखवणारी ही एकमेव फास्ट फूड साखळी नाही तर अशा अनेक मोठ्या ब्रॅण्डच्या हॉटेल साखळ्या आहेत. पिझ्झा बनविणाऱ्या दोन प्रसिद्ध कंपन्यांच्या चेनमध्ये 'व्हेगन' ग्राहकांचा विचार यूएस, यूके, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशात केला आहे त्यांना व्हेगन पदार्थांचे नवीन पर्याय दिले आहेत.
मात्र भारतात तेवढे पर्याय मिळताना दिसत नाहीत. तर बर्गर आणि चिकन यांसारख्या पदार्थांसाठी फेमस असणाऱ्या हॉटेल साखळीत देखील स्वीट कॉर्न, मॅश केलेले बटाटे, बीन्स असे पदार्थ अनेक देशात मिळतात पण भारतात साधे फ्रुट सॅलड सुद्धा मिळत नाही. ज्यांची भारतात ३०० पेक्षा जास्त हॉटेल्स आहेत अशा हॉटेलमध्ये पौष्टिक पदार्थांचा अभाव दिसतो.
त्याउलट युनायटेड स्टेट्समध्ये स्मूदी आणि सॅलड्स, यूके आणि ऑस्ट्रेलियामधील अनेक शाकाहारी पदार्थ उपलब्ध आहेत. जपानमध्ये चहा आणि कोल्ड टी सारखे पर्याय उपलब्ध आहेत.
क्रोनिक डिसीज कश्यामुळे?
उत्पन्नवाढीमुळे भारतात खर्च करण्याची सवय लागली. बाहेर खाणेपिणे वाढले. त्यात बाहेरचे अन्न आणि शीतपेयांचे प्रमाण अधिक आहे. एका अहवालानुसार, देशातील QSR (Quick Service Restaurant) बाजार हा २०२० ते २०२५ च्या दरम्यान २३% वाढण्याची शकता आहे. ज्यामध्ये मीठ, साखर आणि चरबी जास्त प्रमाणात असते, ते आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने म्हटले आहे की हृदयविकार, मधुमेह आणि यकृत रोगांसारख्या क्रोनिक डिसीज होण्याला अनेक घटक जबाबदार आहेत. त्यात जंक आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाचा वापर हा एक घटक आहे. तसेच, असे अनेक अभ्यास आहेत ज्यात सांगितले आहे की, चरबी, साखर किंवा मीठ जास्त असलेले अन्न खाल्ल्याने लठ्ठपणा आणि असंसर्गजन्य रोगांचा धोका वाढू शकतो.
भारतात लठ्ठपणा वाढला
२०१७ च्या एका अभ्यासानुसार १९९० ते २०१६ दरम्यान भारतामध्ये जुनाट आजारांचे प्रमाण ३०.५ टक्क्यांवरून वरून ५५.४ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. लठ्ठपणा ही आणखी एक वाढणारी समस्या आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला प्रकाशित झालेल्या ताज्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे डेटानुसार, भारतातील २५ पैकी जवळपास १ पुरुष आणि १६ पैकी १ महिला लठ्ठ आहे. तसेच, गेल्या १५ वर्षांत भारतीय अधिक जाड होत आहेत, असे आकडेवारीवरून दिसून आले आहे.
आरोग्यदायी पदार्थ देण्याशिवाय या जागतिक 'फास्ट फूड हॉटेल चेन' ला पर्याय नाही
भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी आरोग्य खाद्यपदार्थांची बाजारपेठ आहे हे या जागतिक ब्रॅण्ड्सने लक्षात ठेवणे आवश्यक आहे. गुंतवणूक बँकिंग सेवा फर्म एव्हेंडस कॅपिटलच्या अहवालात दर्शविलेल्या अंदाजानुसार देशातील आरोग्याबाबत जागरूक ग्राहकांची संख्या २०२६ मध्ये १०८ वरून १७६ दशलक्ष होईल.
तसेच भारतातील देशांतर्गत ब्रँड्स पहिले तर व्हेगन, ऑरगॅनिक, बाजरी, मल्टीग्रेन, नॅचरल हे शब्द जवळपास प्रत्येक मेन्यूवर आहेत त्यामुळे जर दीर्घकाळ इथे पाय रोवून उभे राहायचे असेल तर मात्र चांगले आरोग्यदायी पदार्थ उपलब्ध करून देण्याशिवाय या जागतिक फास्ट फूड हॉटेल चेन ला पर्याय नाही.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.