winter depression  esakal
प्रीमियम ग्लोबल

Winter Depression : वातावरणातील मळभ आणि मनातील मळभ हे एकाच वेळी दाटून येत असतात..

उत्साह वाटत नाही असे वाटू लागते याचे कारण हे सीझनल ऍफेक्टिव्ह डिसऑर्डर (एसएडी) शी संबंधित असू शकते.

Shraddha Kolekar

पुणे : 'पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने.. हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुरांनी' ही कवी ग्रेसांची कविता.. वातावरण आणि मनाची अवस्था सांगणाऱ्या मराठीत अशा असंख्य कविता आहेत. वातावरणातील मळभ आणि मनातील मळभ हे एकाच वेळी दाटून येत असतात..

कधी निराश वाटतं.. कधी आळस येतो तर कधी विनाकारणच रडू देखील येतं..पण ही मनाची अवस्था अनेकदा कुंद वातावरशी जोडलेली असते. वातावरणातील बदल हे तुमच्याही आयुष्यात निराशेचे ढग घेऊन येतात का? तुम्हालाही या कुंद वातावरणात निराश वाटत राहतं का? याचा ठाव घ्यायला हवा..

हिवाळ्याच्या दिवसांत अनेक व्यक्तींच्या मूडमध्ये बदल होतात. त्यांच्यातील ऊर्जा कमी झालीये, काम करायचा उत्साह वाटत नाही असे वाटू लागते याचे कारण हे सीझनल ऍफेक्टिव्ह डिसऑर्डर (एसएडी) Seasonal affective disorder (SAD) शी संबंधित असू शकते.

'एसएडी' ला हिवाळी उदासीनता देखील म्हटले जाते. हे एक प्रकारचे नैराश्य आहे, जे हिवाळ्यात विशेषत: शरद ऋतूत जेव्हा नैसर्गिक सूर्यप्रकाश कमी असतो तेव्हा अनुभवायला मिळते.

हिवाळ्यात दिवस लहान आणि रात्र मोठी असते. तसेच नैसर्गिक सूर्यप्रकाश देखील कमी असतो. सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे त्याचा परिणाम शरीरातील उर्जेवरही होताना दिसतो. यामुळे शरीरातील सेरोटोनिन आणि मेलाटोनिन सारख्या विशिष्ट हार्मोनच्या निर्मितीवर परिणाम होतो.

सेरोटोनिन एक न्यूरोट्रांसमीटर आहे ज्यामुळे मूडवर परिणाम होतो तर मेलाटोनिन झोपेचे नियमन करणारा असतो. तसेच शरीरात सूर्यप्रश नसल्यामुळे व्हिटॅमिन डी (Vitamin D) ची कमतरता निर्माण झाल्यामुळे देखील शरिराच्या छोट्या मोठ्या कुरबुरी दिसून येतात. शरीरात झालेल्या बदलांचा परिणाम मनावरही पाहायला मिळतो.

हिवाळ्यात सर्वसाधारणपणे दिसणारी लक्षणे

  • मूड जाणे (Mood)

  • इच्छाशक्ती कमी होणे

  • झोपेच्या पद्धतींमध्ये बदल (Sleep pattern change)

  • चिडचिड

  • नेहमीच्या कामांमध्ये रस किंवा आनंद कमी होणे

  • उगाचच रडू येणे

  • अंथरुणातून उठावेसे न वाटणे

  • एकटे वाटणे (Alone)

  • नकारात्मक विचार येणे (negative thoughts)

  • नैराश्य येणे (Feeling depressed)

याबाबत 'युएस' मधील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ' ने त्यांच्या संकेतस्थळावर याबाबत माहिती दिली आहे. ज्यांच्यामध्ये दरवर्षी जास्त प्रमाणात अशी लक्षणे दिसतात त्यांना या संबंधी चार पद्धतीने ट्रेटमेन्ट देण्यात येते.

लाईट थेरपी (Light Therapy)

साधारण १९८० च्या दशकापासून SAD प्रकरणात लाईट थेरीपीची ट्रीटमेंट देण्यात येते आहे. या ट्रीट्मेंटमध्ये संबंधित व्यक्तीला साधारण ३० ते ४० मिनिट जास्त प्रकाशाच्या खोलीत बसविण्यात येते.

एखाद्या खोलीतल्या नेहमीच्या सूर्यप्रकाशापेक्षा २० पटीने जास्त हा प्रकाश असतो. मात्र ही ट्रीटमेंट तज्ज्ञ प्रत्येक व्यतीवर होणाऱ्या परिणामानुसार ठरवितात.

सायकोथेरपी (psychotherapy)

सायकोथेरीपी या प्रकारात संबंधित व्यक्तीचे कौन्सिलिंग केले जाते. यामध्ये व्यक्तीला वेगळ्या पद्धतीने विचार करायची सवय लावणे, सवयी बदलणे या गोष्टी सांगितल्या जातात.

साधारण सहा आठवडे नकारात्मक विचार कमी करत सकारात्मक विचारांची पेरणी संबंधित व्यतीच्या मनात केली जाते. निराशेचे विचार येणार नाही यासाठी समुपदेशक वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करायला देतात.

अँटी डिप्रेसंट मेडिसिन (Anti depressant medications)

उदासीनतेवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे (अँटीडिप्रेसेंट्स) 'एसएडी' साठी वापरण्यात येतात. समुपदेशन आणि औषधे अशी एकत्रित ट्रीटमेंट देखील देण्यात येते.

या औषधांमुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा देणारे हार्मोन्स तयार होतात. ज्यांना झोपेच्या समस्या असतात त्यांना अशा प्रकारच्या औषधांची ट्रीटमेंट दिली जाते.

व्हिटॅमिन डी

हिवाळ्यात सूर्यप्रकाशाची कमतरता लोकांमध्य व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण करते. SAD साठी उपचार म्हणून 'व्हिटॅमिन डी' ची चाचणी करणार्‍या अभ्यासांमध्ये संमिश्र परिणाम दिसले आहेत.

काहींना प्रकाश थेरीपीइतकेच व्हिटॅमिन डी हे देखील तितकेच प्रभावी वाटले आहे. त्यामुळे अनेकजण 'व्हिटॅमिन डी' चा डोसही घेणे पसंत करतात.

-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT