इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी ७० तास काम करण्याचा सल्ला दिल्यानंतर आयटी कंपन्यामधील कामाच्या तासांवर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. काहींनी यावर टीका केली तर काहींनी याचे समर्थन केले.
पण काही अभ्यासातून कर्मचारी नियमित तासांपेक्षा जास्त काम करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खरोखरच आयटी क्षेत्राने नारायण मूर्ती यांच्या वक्तव्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे का? इतके तास काम करण्याची आयटी क्षेत्राला का गरज वाटते आणि तज्ज्ञ यांच्या कामाच्या वेळांचं गणित बसविणे अवघड आहे असे का म्हणतात?
आयटीमध्ये किती तास काम करणे अपेक्षित ?
देशातील आयटी क्षेत्रातील कर्मचारी आठवड्याला साधारण चाळीस ते पन्नास काम करतात. आयटी सेक्टरमध्ये पाच दिवसांचा आठवडा असतो, त्यामुळे दिवसाला साधारण दहा तास हे कर्मचारी काम करतात. परंतु आठवड्याला साधारण चाळीस तास काम करणेच अनेक आयटी कंपन्यांच्या नियमात आहे.
स्टफिंग फर्मच्या डेटानुसार डेडलाईन पाळण्यासाठी अनेक जण नियमित कामाच्या वेळेपेक्षा जास्त काम करतात करत असल्याचे 'इकॉनॉमिक टाइम्स' ने आपल्या वृत्तात म्हंटले आहे.
भारतातील आयटीमधील प्रत्येक कर्मचाऱ्यांची उत्पादकता ही त्या कंपनीला मिळणाऱ्या उत्पादनाच्या तुलनेत मोजली जाते. ही उत्पादकता जवळजवळ चार आर्थिक वर्षात स्थिर राहिली असून डिजिटायझेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ऑटोमेशन आणि गुंतवणूक असूनही उत्पादकतेमध्ये अपेक्षित वाढ झालेली नसल्याचेही अभ्यासातून समोर आले आहे.
९ ते १२ तासाच्या सुद्धा शिफ्ट
याबाबत इन्फोसिस या कंपनीत काम करणारे कर्मचारी म्हणाले, मला वेळेपेक्षा जास्त काम करावे लागत नाही. परंतु दुसऱ्या कंपनीत किंवा दुसऱ्या प्रोजेक्टवर काम करणारे माझे अनेक मित्र आहेत त्यांना अशा अडचणी येतात.
भारतातील आयटी कंपनीत साधारण ९ तास १५ मिनिटांची शिफ्ट असते त्यात जेवणासाठी एक तास वेळ दिलेला असतो. तर आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कामाची वेळ ही १० तास असते. तर हल्ली काही ठिकाणी १२ तासाची शिफ्ट असल्याचेही ऐकले.
'वर्क फ्रॉम होम' मुळे काय झाले?
आयटी क्षेत्राशी संबंधित कंपन्या या भारताबाहेरील असल्याने त्यांच्या वेळा या परदेशी वेळेनुसार ठरलेल्या असतात. त्यांचे गणित हे क्लाएंटचे समाधानावर अधिक अवलंबून असते.
कोरोनापुर्वी कोणालाही वर्क फ्रॉम होम नव्हते. मात्र कोरोना काळात साधारण दोन ते तीन वर्ष लोकांनी घरून कामं केली त्यामुळे कामाच्या वेळेपेक्षा जास्त वेळ, कंपनीच्या गरजेप्रमाणे काम करणे शक्य होते. त्यामुळे मधल्या काळात समोरच्या कंपनीला देखील ही सवय लागली की वेळेच्या पलीकडे जाऊन आपल्याला काम मिळू शकते. कर्मचाऱ्यांना देखील घर सांभाळून हे शक्य होत होते.
कामाचे तास यामुळे वाढतात?
ह्युमन रिसोर्स ग्रोथ होत नाही असे कारण देत कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम होत बंद केले. तर काहींनी अल्टरनेट दिवस सुरु ठेवले आहे. त्यामुळे आता जेव्हा पुन्हा ऑफिसेस सुरु झाले तरीही क्लाएंटच्या फ्लॅजिबल वेळेच्या अपेक्षा तश्याच राहिल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना जास्त वेळ काम करावे लागते आहे.
त्यातच ट्राफिक, जाण्या-येण्यासाठी लागणारा वेळ, कामाचे १० तास यात कर्मचारी त्रासला आहे. कंपनीला वाटते की क्लाएंटला त्रास होता कामा नये तर कर्मचाऱ्यांना ऑफिस अवर्सच्या पुढे जाऊन काम करणे नको वाटते आहे. त्यात चीन या देशात कामाच्या वेळा फ्लेक्सिबल असल्याने भारतातील कंपन्यांकडून तशीच अपेक्षा केली जाते.
आयटी कर्मचाऱ्यांसमोर पर्याय का नाही?
आयटी क्षेत्रातील रिसेशन हा मुद्दा फारसा समोर आला नसला तरी अनेक मोठ्या कंपन्यांनी नवीन भरती बंद केली आहे. तर अनेकांची पगारवाढ केलेली नाही. हा सर्व कोरोनाचा परिणाम असल्याचे दिसून येते.
त्यामुळे कर्मचाऱ्यांना नोकऱ्यांचे फारसे पर्याय न उरल्यामुळे दिलेले काम करणे भाग आहे. प्रोजेक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा जास्त प्रमाणात सामना करावा लागतो असेही आयटी मधील कर्मचारी यांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले.
आयटी कर्मचाऱ्यांची मागणी काय?
कंपन्यांनी जेव्हा आम्हाला अप्रत्यक्षपणे २४ तास 'ऑन कॉल' ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर कंपन्यांनी आम्हाला आमच्या सोयीने काम करण्याची मुभा द्यावी. काम हे एकतर वेळेच्या परिमाणात मोजावे किंवा ठरवून दिलेल्या कामाच्या किंवा क्लाएंटच्या समाधानावर वेळ आणि दिलेली कामे हे दोन्ही निकष एकाच वेळी लावू नयेत .
जेव्हा दोन्ही निकष लावले जातात त्यावेळी आमच्यावरचे प्रेशर वाढून त्याचा अर्थातच परिणाम हा उत्पादकतेवर होऊ शकतो असेही एका आयटी कर्मचाऱ्याने सांगितले.
आयटीमध्ये देखील प्रत्येकाचे वर्क कल्चर वेगळे
सरकारी कायदे आयटी क्षेत्राला लागू नसल्याने आयटी क्षेत्र सरकारी नियंत्रणाच्या बाहेर आहे. आयटी क्षेत्रात मोठे उद्योग, मध्यम उद्योग आणि स्टार्ट अप हे मुख्यतः तीन प्रकार आहेत. त्यात प्रत्येकाचे वर्क कल्चर वेगळे आहे.
या सगळ्यात सामान धागा हा ग्राहक संतोषावर चालतो. त्यामुळे कामाचे तास हा प्रत्येकासाठी 'रॅलेटिव्ह' मुद्दा आहे. त्यातही घरून काम करत असताना कामाच्या वेळा कश्या मोजणार? त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेचा मुद्दा एका ठराविक चौकटीत बसविणे अवघड आहे.
'स्टार्टअप' च्या वर्कलोडला कश्यात मोजायचे ?
स्टार्टअप मध्ये सुरुवातीचा काळ असल्यामुळे कर्मचारी कमी असतात. एकाच व्यक्तीला अनेक कामे करावी लागतात. पैसे कमी असतात आणि कामाच्या वेळा देखील फिक्स्ड नसतात. अशा वेळी कर्मचारी अनेकदा खूप जास्त काम करतात. मग याला वर्कलोड म्हणायचे का? तर नाही कारण ती सर्व मंडळी हे एका धेय्याने करत असतात. त्यामुळे वर्कलोडचा मुद्दा इथे कसा लागू होईल?
कर्मचाऱ्यांना 'राईट टू डिसएंगेज' लागू आहे का?
मी जर कामावर नसेल, किंवा माझे कामाचे तास संपले असतील तर काम करणार नाही असे म्हणण्याचा अधिकार कर्मचाऱ्यांना आहे का? हा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी संसदेत देखील विचारला होता.
मात्र अनेक कंपन्यांनी कंपनीला गरज पडेल तेव्हा काम करणे आवश्यक असल्याचे त्यांच्या धोरणात म्हणले आहे. त्यामुळे आता 'राईट टू डिसएंगेज' हा हक्क कर्मचाऱ्यांना नसेल तर त्यांच्या कामाच्या वेळा कश्या मोजायच्या असा प्रश्न निर्माण होतो.
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.