Why dream comes? what is the scientific reason  Esakal
प्रीमियम ग्लोबल

Sleep Stages : झोपेत तुमचे शरीर, मेंदू आणि मन कोणत्या अवस्थेतून जाते?

डुलकी घ्यावी की नाही? संशोधन काय सांगते?, स्वप्न का पडतात?

Shraddha Kolekar

मुंबई : झोप लागते तेव्हा आपल्या शरीरात आणि मेंदूत नेमके काय बदल होतात? आपल्याला गाढ झोप कधी लागते? झोपेत शरीर आणि मेंदू कोणत्या अवस्थेत असतो?

लहान बाळांपासून मोठ्यांपर्यंत कोणी किती वेळ झोपावे? स्त्री आणि पुरुष यांच्या झोपेत काही फरक असतो का?

झोपेच्या याबाबतीत आपल्याला अनेक प्रश्न पडलेले असतात. झोपणे आणि उठणे या क्रियांमध्ये शरीर अनेक अवस्थेतून जात असते. याविषयाबाबत अनेक संशोधने प्रसिद्ध करण्यात आली आहे. झोप साधारण चार ते पाच अवस्थांमधून जाते.

नॉन रॅपिड आय मोमेन्ट (N1): तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यात तुमचे जेव्हा डोळे बंद करता त्यावेळची तुमची ही पहिली अवस्था असते. ही फक्त झोपेच्या अवस्थेत जाणारी तुमची पहिली पायरी असते. यात तुमच्या मेंदूतील विचारचक्र, शरीर हे पूर्णपणे झोपेच्या अवस्थेत गेलेले नसते. श्वासोच्छवास नियमितपणे होत असतो. झोपेची ही अवस्था साधारण एक ते सात मिनिटांची असते.

(sleep stages N1, N2, N3 and N4 )

stages of sleep

नॉन रॅपिड आय मोमेन्ट (N2) : डोळे झाकल्यानंतर हळूहळू तुमचे शरीर आणि मेंदू, मन रिलॅक्स होत जातात. ही झोपेच्या प्रकारातील दुसरी अवस्था आहे. ही अवस्था दीर्घकाळासाठी असते. पहिल्या आणि दुसऱ्या प्रकारात तुम्हाला झोपेतून जाग येणे सहज शक्य असते. शरीरातील प्रत्येक स्नायू, तुमचा मेंदू या काळात शांत किंवा पूर्वावस्थेत येत असतो.

या अवस्थेत जसजसे तुम्ही गाढ झोपेच्या दिशेने जाता तसतसे हार्ट रेट आणि शरीराचे तापमान जे वाढलेले असते ते स्थिर होत जाते. ही अवस्था हलक्या झोपेच्या प्रकारात येतो. ही अवस्था जास्त काळ चालणारी असते. गाढ झोपेच्या दिशेने प्रवास करण्यासाठीच्या अवस्थेत तुलनेने जास्त वेळ लागतो.

गाढ झोपेची अवस्था (N3) : या तिसऱ्या अवस्थेत झोपेचा प्रवास हा गाढ झोपेकडे जातो. तुमचे शरीर यामध्ये रिकव्हरी मोडमध्ये असून मेंदूच्या क्रिया या मंदावलेल्या असतात. यामध्ये तुम्हाला झोपेतून सहजपणे जागे करणे शक्य होत नाही. ही अशी अवस्था असते ज्यामध्ये तुम्ही ना जागे असता ना स्वप्नावस्थेत असता. तुम्ही काहीही न कळण्याच्या अवस्थेत असता.

स्वप्नकाळ (N4) : साधारण आपण ज्याला मराठीत साखरझोप म्हणतो. ही अवस्था तुम्हाला स्वप्न पडण्यासाठीची सर्वाधिक शक्यता असणारी अवस्था आहे. यामध्ये तुमचा मेंदू पुन्हा जागृतावस्थेकडे येत असतो पण शरीर मात्र शांत अवस्थेत असते. या अशा क्रियेमुळेच स्वप्नावस्था तयार होते.

या झाल्या झोपेच्या अवस्था. मात्र लहान मुलांना जास्त झोप का लागते पासून स्वप्न का पडतात पर्यंत आपल्याला झोपेविषयी अनेक प्रश्न पडतात. जसे की,

(rapid eye moment, non rapid eye moment)

sleep stages

डुलकी घ्यावी की नाही? संशोधन काय सांगते?

डुलकी म्हणजेच दुपारची झोप. दुपारी झोप घ्यावी का? या विषयी अनेकांची मतमतांतरे आहेत. दुपारच्या झोपेवरून अनेक पुणेकर मंडळी हा चेष्टेचा विषय देखील ठरली आहेत. मात्र खरोखरच दुपारी घेतली जाणारी डुलकी ही खरोखरच गरजेची आहे की ही झोप चांगली हा फक्त समज आहे.

याबाबत 'एल्सवेअर' या सायन्स विषयक जर्नलमध्ये एक संशोधन प्रसिद्ध झाले आहे. त्यामध्ये दुपारच्या झोपेचे अनेक चांगले परिणाम समोर आले आहेत. ताजेतवाने वाटणे, उत्साही वाटते तसेच मूडही फ्रेश होतो. यामुळे तुमची मानसिक कार्यक्षमता वाढायला सुरुवात होते.

अनेक वयाच्या टप्प्यात हा अभ्यास करण्यात आला असून याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. दुपारची झोप ही साधारण १० मिनिटांपासून ४५ मिनिटापर्यंत असते. ही डुलकी किती वेळाची असावी यावरून देखील मतमतांतरे आहेत.

मात्र तज्ज्ञांच्या मते ही डुलकी ४५ मिनिटापेक्षा जास्त असू नये. याबाबत पुण्याच्या केईएम हॉस्पिटलच्या झोप तज्ज्ञ डॉ.स्मिता धाडगे म्हणाल्या, (KEM hospital sleep expert Dr.Smita Dhadge) तुमच्या मेंदूचा जो वापर झालेला असतो, म्हणजे 'जे वेअर आणि टेअर' होते ते या डुलकीच्या ब्रेकने भरून निघते आणि मेंदू पुन्हा फ्रेश होतो.

(what are the positive impact of nap time)

लहान मुलांना जास्त झोप का असते?

(Why do children sleep more?)

मोठ्यांमध्ये झोपेची सुरुवात नॉन रेम ने सुरुवात होते तर लहान मुलांमध्ये उलट रेम ने सुरुवात होते. लहान मुलांचा मेंदू हा वाढीच्या प्रक्रियेत असतो. वाढीसाठी आवश्यक जे ग्रोथ हार्मोन सिक्रेट होतं ते मेंदू झोपेत असताना होतं. त्यामुळेच मेंदूच्या वाढीत मुलांना जास्त झोप आवश्यक असते. मात्र जसजसा हा मेंदू परिपक्व होत जातो तसतशी ही झोप कमी होत जाते. त्यामुळेच लहान बालके १८ ते २० तास तर १८ ते ६५ वयाची माणसं ७ ते ९ तासाची झोप घेत असल्याचे डॉ.स्मिता धाडगे यांनी सांगितले.

(agewise sleep hours)

agewise sleep hours

स्त्री आणि पुरुष यांच्या झोपेत काही फरक असतो का?

अमेरिकेच्या नॅशनल लायब्ररी मेडिसिननुसार सुरुवातीच्या टप्प्यात झोपेत पुरुष जास्त वेळ घालवतात आणि रात्रीचे जागतात त्याउलट स्त्रिया पुरूषांपेक्षा मंद गतीने झोप घेतात.

गर्भधारनेदरम्यान आणि प्रसूतीनंतरचे पहिले काही महिने महिलांना दिवसा जास्त झोप लागते. याबाबत डॉ.धाडगे म्हणतात की, स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळी झोपेत बदल होतात. तसेच असेही दिसून आले आहे की स्त्रियांमध्ये झोपेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे.

स्वप्न का पडतात? (why dream comes? know the logical reason)

बऱ्याचदा स्वप्न ही रॅपिड आय मोमेन्टमध्ये पडतात. मेंदूच्या मागच्या भागात मेमरी, सेन्सेशन, इमोशन कंट्रोल करणारे जे सेंटर असतात. जसे की हिप्पोकॅम्पस आणि अमीकडेला म्हणजे लहान मेंदूचा भागात काही बदल होतात.

काही सर्किट तयार होतात ज्यावर आल्या मनातील इमोशन आणि विचारांचा प्रभाव असतो. आणि त्यातून स्वप्न दिसतात. म्हणजे अनेकदा आपण म्हणतो की 'मनी वसे ते स्वप्नी दिसे' म्हणजे आपल्या डोक्यात जे विचार असतात ते व्हिज्युअलाईज करण्याचा प्रयत्न या दरम्यान होतो. यासाठी मेंदूतज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ वेगवेगळ्या थेअरी मांडून याची कारणं स्पष्ट करतात. त्यामुळे अमुक एक कारणच कारणीभूत आहे असे म्हणता येत नाही.

(latest marathi news of sleep stages)

----------------

संदर्भ : https://www.sleepfoundation.org/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT