Maldives vs Lakshadweep  esakal
प्रीमियम ग्लोबल

Explained: 'मालदीव' भारी की भारताचे 'लक्षद्वीप' असं युद्ध सोशल मीडियावर का रंगलं?

मालदीव प्रकारात सेलिब्रिटींसह अनेकांचा नरेंद्र मोदींना पाठिंबा

Shraddha Kolekar

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या लक्षद्वीप बेटावर काय जाऊन आले, त्यानंतर एक मोठं वादळ मालदीव आणि भारत देशात आले आहे.

या वादळामुळे मालदीवच्या तीन मंत्र्यांना पदावरून हटविले तर अनेक सेलिब्रिटींनी देखील या सगळ्या प्रकारावर आपले मत व्यक्त केले. त्यानंतर आता बायकॉट मालदीव, एक्स्प्लोअर इंडियन इजलॅंड, मालदीव हे शब्द सध्या ट्रेंडिंग आहेत.

तर लक्षद्वीप सध्या गुगलवर सर्वाधिक शोधला गेलेली जागा आहे. नेमका हा सगळं प्रकार काय आहे? आणि त्याची सुरुवात कुठून झाली आणि त्यातले राजकीय अर्थ काय? हे जाणून घेऊया

(#exploreindianisland)

नरेंद्र मोदींनी लक्षद्वीपची पोस्ट केली आणि मालदीवमध्ये ते 'ट्रोल' झाले..

नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीप या बेटाला भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी 'एक्स' वर पोस्ट करत तेथील फोटोही शेअर केले होते. या पोस्टमध्ये ते म्हणाले होते,

" नुकतीच मला लक्षद्वीपच्या लोकांना भेटण्याची संधी मिळाली. येथील बेटांचे सौंदर्य पाहून मी चकित झालो आहे तर इथल्या लोकांच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. या निमित्ताने मला आगत्ती, बंगाराम आणि कावरत्ती येथील लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. येथील लोकांच्या स्वागताने मी भारावून गेलो आहे. लक्षद्वीपमधील ही काही खास क्षणचित्रे.. "

(Narendra Modi posts Lakshadweep and gets 'trolled' in Maldives..)

मालदीवमधील मंत्र्यांनी केले मोदींविरोधी चुकीचे विधान

नरेंद्र मोदींचे बीचवर फिरतानाचे, स्कुबा डायव्हिंग करतानाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले. भारतात आणि मालदीवमध्ये त्यांच्या या पोस्टमधील फोटो मोठ्या प्रमाणात पाहिले गेले. त्यानंतर मालदीव देशातील सोशल मीडियावरील काही ट्रॉलर्सने या पोस्टला ट्रोल केले.

यामध्ये भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध ताणले जाऊ शकतात अशा पद्धतीने काही कमेंट करण्यात आल्या. मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला उपमंत्री मरियम शिउना यांनी " (Maldivian minister made wrong statement against Modi)

“What a clown. The puppet of Israel Mr. Narendra diver with life jacket. #VisitMaldives #SunnySideOfLife”

अशी पोस्ट केली. तसेच त्यांनी गाईचे शेण आणि भारत या संदर्भातही पोस्ट केली होती जी त्यांनी नंतर काढून टाकली.

मरियम यांच्यासोबतच मंत्री असणाऱ्या मलशा शरीफ यांनी देखील अशाच आशयाची पोस्ट करत भारत आणि लक्षद्वीपच्या कॅम्पेनवर टीका केली.

मालदीवच्या सत्ताधारी प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या सदस्यानेही फ्रेंच पॉलिनेशियातील बोरा बोरा बेटांचा एक फोटो शेअर केला आणि तो फोटो मालदीवचा आहे असे सांगत 'मालदीवमध्ये सनसेट झाला, तुम्हाला हे लक्षद्वीपमध्ये दिसणार नाही. #मालदीव ला भेट द्या' अशा आशयाची पोस्ट केली.

सोशल मिडीयावर भारत मालदीव वॉर रंगले

नेत्यांनी कमेंट केल्यानंतर भारताची मालदीव विरोधी भूमिका अशा प्रकारच्या बातम्या देखील तेथील काही वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्या. त्यामुळे स्थानिकांमध्ये भारताच्या विषयी राग निर्माण होईल असे वातावरण निर्माण झाले. (India-Maldives war raged on social media)

त्यातून देशात एक प्रकारे सोशल मीडिया वॉर सुरु झाले. यावेळी मालदीवमध्ये 'visitmaldiv' असा हॅशटॅग वापरून पोस्ट केल्या गेल्या तर भारतातील सोशल मीडियानाने याला प्रतिसाद देत boycottmaldiv हा हॅशटॅग वापरून ट्रोलिंग सुरु झाले.

मालदीवच्या मंत्र्यांकडून लक्षद्वीप बेटाबाबत वक्तव्य

त्यातच मालदीवच्या प्रोग्रेसिव्ह पार्टीचे सदस्य आणि सिनेट सदस्य झाहिद रमीझ यांनी पोस्ट करत आणखी आगीत तेल ओतले. ते म्हणाले,

“उपक्रम चांगला आहे पण, आमच्याशी स्पर्धा करण्याची कल्पना भ्रामक आहे. आम्ही देत असलेली सेवा ते कशी देऊ शकतात? ते इतके स्वच्छ कसे असू शकतात? खोल्यांमध्ये असलेला कायमस्वरूपी वास ही त्यांना अधोगतीकडे नेईन.”

या पोस्ट्समुळे दोन देशांमधील हे सोशल मीडिया वॉर अधिकच वाढण्यास सुरुवात झाली.

(Lakshadweep tourism)

मालदीव सरकार नरमले

मालदीवमधील तीन मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचे भारतात मोठ्या प्रमाणात पडसाद उमटू लागल्यावर मात्र मालदीव सरकारने समोर येत आपली भूमिका जाहीर केली. त्यांनी सांगितले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग लोकशाही पद्धतीने आणि जबाबदारीने केला पाहिजे. द्वेष पसरवणारे, नकारात्मक वक्तव्य करण्यात येऊ नये.

तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या सहयोगी देशांशी संबंध बिघडू नयेत अशी काळजी घ्यावी. आपत्तीजनक वक्तव्य करणाऱ्या अधिकारी किंवा मंत्री याच्यावर कारवाई करण्यासाठी सरकार मागेपुढे पाहणार नाही. (The Maldivian government relented)

मालदीव पर्यटनात भारतीय महत्वाचा घटक

मालदीव बेटाचा २८ टक्के जीडीपी हा पर्यटनाशी जोडलेला आहे. त्यामुळेच भारतासह जगभरातील पर्यटक या देशासाठी महत्वाचे आहेत. दरवर्षी भारतातून दोन ते अडीच लाख नागरिक मालदीवमध्ये पर्यटनासाठी जातात.

त्या खालोखाल रशिया आणि चीन येथूनही लाखो नागरिक पर्यटनासाठी जातात. त्यामुळेच मालदीववरचा बहिष्कार हा या सरकारच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा आहे याची जाणीव मालदीव सरकारला होती.

(Maldives tourism)

सेलिब्रिटींचा लक्षद्वीपला पाठिंबा

बॉलिवूड अभिनेता सलमान खान, अक्षय कुमार, श्रद्धा कपूर, जॉन अब्राहम, आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकर या नामांकित व्यक्तींनी लक्षद्वीपला पाठींबा देत मालदीव विरोधी भूमिका घेतल्यानंतर या विषयाची व्याप्ती वाढली.

(Celebrity boycott Maldives )

मालदीवच्या तीन मंत्र्यांचे निलंबन

या विषयावर मालदीवमधील काही मंत्र्यांनीही आक्षेप घेत भारताविषयी वापरलेली ही भाषा चुकीचे असल्याचे सुनावले होते.

या एकूणच विषयाला आलेले वलय आणि त्यामुळे पर्यटनावर होणारा परिणाम या बाबींचा विचार करत मालदीव सरकारने मालदीव सरकारने मरियम शिऊना, मालशा आणि हसन जिहान या तीनही मंत्र्यांना निलंबित केलं आहे.

‘‘परदेशातील नेत्यांबद्दल आमच्या सरकारमधील मंत्र्यांनी समाजमाध्यमांनी केलेली वक्तव्ये ही आमच्या सरकारची अधिकृत वक्तव्ये नाहीत,’’ असे मालदीवच्या परराष्ट्रमंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आले. (Suspension of three Maldivian ministers)

मालदीवमध्ये आधीपासूनच भारताविषयी नाराजीची भावना

मालदीवचे माजी अध्यक्ष अब्दुल्ला यामिन अब्दुल गयुब यांनी 'इंडिया आऊट' या मोहिमेला उघड पाठिंबा दिला होता. तर सध्या सत्तेत असणारे मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह हे यांचे चीन देशाशी चांगले संबंध असल्याने या देशातील संबंध आधीपासूनच फारसे बरे नव्हते.

२०२० मध्ये मालदीवमध्ये मोठ्या प्रमाणात 'इंडिया आऊट' ही मोहीम राबविण्यात आली होती. तसेच भारताने इस्राईल आणि पॅलेस्टाईन या विषयात घेतलेल्या भूमिकेविषयी देखील तेथील काही नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते.

(There is already resentment towards India in the Maldives)

मालदीवमधील ८ हजार हॉटेल बुकिंग आणि २५०० विमान तिकिटे रद्द

दोन तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या या दोन्ही देशांमधील 'कोल्ड वॉर' चे आता थेट मालदीवच्या पर्यटनावर परिणाम होताना दिसत आहे.

याबाबत नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार मालदीवमधील ८ जाहीर हॉटेल्सचे बुकिंग आणि अडीच हजार विमानाची तिकिटे रद्द झाली आहे. पुढील महिनाभर या वॉर चा परिणाम दिसून येईल असे जाणकारांचे मत आहे. (8,000 hotel bookings and 2,500 flight tickets cancelled in Maldives)

------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivajinagar Assembly Election 2024 Result: सिद्धार्थ शिरोळे 36 हजार मतांनी विजयी; सलग दुसऱ्यांदा आले निवडून

Assembly Election Result Viral Memes : महायुतीचा एकतर्फी विजय अन् महाविकास आघाडीचा सपशेल पराभव; सोशल मीडियावर आली Memes ची लाट

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: बेलापूरमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT