CRISPR Genes editing esakal
प्रीमियम हेल्थ

DNA मधील बिघाड सुधारता येणार! अमेरिकेत नवीन तंत्रज्ञानाला मान्यता (CRISPR Genes Editing)

सिकलसेल, थॅलेसेमिया यासारखे जनुकीय आजार काय आहेत?

Shraddha Kolekar

पुणे - "त्याच्या रक्तातच आहे ते, सुधारता नाही येणार" असे वाक्य जे आपल्याकडे सर्रास बोललं जातं ते आता आपल्याला बदलावं लागणार आहे. जनुकातील म्हणजेच DNA मधील दोष आता तंत्रज्ञानाच्या मदतीने सुधारता येणार आहे. जैवरसायनशास्त्रातील झालेला हा महत्वाचा शोध असून नुकतीच त्याला अमेरिकेने मान्यता दिली आहे.

'CRISPR/Cas9 gene editing system' हे संशोधन करणाऱ्या प्राध्यापिका 'जेनिफर दाउडना' यांना २०२० मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. त्यांच्या या संशोधनाने जैवरसायनशास्त्रात मोठी क्रांती केली आहे.

काय आहे क्रिस्पर तंत्रज्ञान?

क्रिस्पर (CRISPR: short for “clustered regularly interspaced short palindromic repeats”) तंत्रज्ञान याचा सिकलसेल, थॅलेसेमिया तसेच अन्य असे आजार जे अनेकांना वारशाने म्हणजेच सदोष जनुकांतून मिळतात अशा जनुकांना तंत्रज्ञान वापरून सुधारणे किंवा काढून टाकण्याच्या प्रक्रियेला क्रिस्पर तंत्रज्ञान असे म्हंटले जाते.

या तंत्रज्ञानाला युनायटेड स्टेट्सच्या अन्न व औषध प्रशासनाने ८ डिसेंबर २०२३ रोजी मान्यता दिली आहे.

या तंत्रज्ञानाला क्रांतिकारी का म्हंटलं जातं आहे?

जगभरात ६ हजार प्रकारचे जनुकीय आजार आहेत. त्यातील ५० मागे एका व्यक्तीला 'सिंगल जीन डिसऑर्डर' आहे तर २६३ जणांपैकी एका व्यक्तीला 'क्रोनिकल डिसऑर्डर' आहे. भारतातही जनुकीय आजारांचे प्रमाण अधिक आहे.

जनुकीय आजारांचा पुढच्या पिढ्यांना देखील याचा धोका आहे. म्हणूनच यावर यशस्वी संशोधन हे जगाच्या पटलावरील महत्वाचे संशोधन मानले जाते आहे.

आजवर या आजारांवर औषधे मोठ्या प्रमाणात बाजारात आली आहेत मात्र हे आजार मुळापासून कुठून टाकणे आता यामुळे शक्य होणार आहे.

सिकलसेल, थॅलेसेमिया यासारखे जनुकीय आजार काय आहेत?

सिकलसेल हा आजार एक रक्तातील दोष आहे. रक्तपेशींमधील हिमोग्लोबिनची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी करते. सिकल सेल्स या एकत्र येऊन रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतात यामुळे रक्तप्रवाह थांबल्याने वेदना होतात, थकवा येतो, काही वेळा श्वास घेण्यास त्रास होतो.

तर थॅलेसेमियामध्ये रक्तदोषमुळे पुरेसे हिमोग्लोबिन तयार होत नाही त्यामुळे थकवा, अशक्तपणा अशा प्रकारची लक्षणे दिसतात. यामुळे जीवाला धोकाही असतो.

हे तंत्रज्ञान कश्या पद्धतीने काम करणार?

नवीन तंत्रज्ञानात डॉक्टर एखाद्या व्यक्तीच्या Bone Marrow Stem Cells म्हणजे हाडातील सदोष पेशी काढून टाकतात, त्यांना त्याजागी दुसऱ्या पेशी घालतात किंवा सदोष पेशी नष्ट करतात आणि त्या ठिकाणी नवीन पेशी भरतात. हे तंत्रज्ञान थेरीपीप्रमाणे काम करते.

नवीन पेशी जे पुनरुत्पादन करतात त्यातून चांगल्या पेशींची निर्मिती होते. ही उपचारात्मक पद्धती असून यामध्ये रुग्णाला साधारण महिनाभर हॉस्पिटलमध्ये राहावे लागते.

या दरम्यान मळमळ, थकवा आणि इन्फेक्शन सारखे प्रकार होऊ शकतात मात्र यांनी 'साईड इफेक्ट' म्हणता येणार नाही.

संशोधनादरम्यान साधारण शंभर जणांवर चाचणी करण्यात आली. त्यापैकी सिकल सेल ऍनिमिया असलेल्या ३० पैकी २९ रुग्णांना त्यांच्या सेल्स बदलल्यानंतर १८ महिन्यांतील निरीक्षणात एक वर्ष वेदना झाल्या नाहीत.

तसेच बीटा-थॅलेसेमिया यावर उपचार केलेल्या ४२ पैकी ३९ रूग्णांना यापुढे रक्त किंवा Bone Marrow ची वर्षभर पुन्हा आवश्यता वाटली नाही.

दूरगामी परिणाम अद्याप समोर नाही..

साधारण दहा वर्षे या तंत्रज्ञानावर काम सुरु असले तरीही ज्या रुग्णांवर याचे प्रयोग झाले ते साधारण दोन वर्षापर्यंतच अभ्यासले गेले आहे.

याच्या दीर्घ परिणामांवर अभ्यास करणे सुरु आहे. अनेकदा एक दोष काढत असताना असे काही बदल शरीरात घडतात ज्याने भविष्यात याचे वेगळे परिणाम देखील बघायला लागू शकतात अशी भीतीही डॉक्टर व्यक्त करतात. त्यामुळेच हे तंत्रज्ञान अद्याप प्राथमिक अवस्थेत असून यात पुढे अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.

याबाबत सिकलसेल अनेमियावर 'हिमआधार' या आयुर्वेदिक औषधाचा शोध लावणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील रसायनशात्राच्या प्राध्यापिका डॉ.पूजा दोशी म्हणाल्या, मी स्वतः सिकलसेल अनेमियाची रुग्ण आहे.

अशा प्रकारचा शोध नक्कीच भविष्यासाठी खूप चांगला आहे. भारतातही याबाबत संशोधन सुरु आहे. भारतात १५ ते २० लाख रुग्ण हे सिकलसेलने ग्रस्त आहेत पण तरीही अज्ञात त्यांची सर्व ठिकाणी गणना झाली नाही त्यामुळे हा आकडा प्रत्यक्षात जास्त आहे.

फक्त मी स्वतः रुग्ण म्हणून याचा लाभ कदाचित घेऊ शकणार नाही कारण यावर जे उपचार झालेत ते साधारण ३५ वर्षांपर्यंतच्या व्यक्तीवर झालेत. Bone Barrow ४० वयाच्या पुढच्या रुग्णांना करता येत नाही. पण जी तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी हे चित्र आशादायी आहे.

क्रिस्पर तंत्रज्ञान प्रचंड महागडी उपचार पद्धती...

क्रिस्पर तंत्रज्ञान ही प्रचंड महागडी उपचार पद्धती असून यावर अधिकृत भाष्य झाले नसले तरी साधारण २ मिलियन डॉलर एवढा खर्च या उपचारासाठी येतो.

भारतीय रुपयांमध्ये ही किंमत साधारण १६ कोटी ५० लाखांच्या घरात आहे. भारतात जिथे सिकलसेलच्या रुग्णांना औषधासाठी निधीची आवश्यता आहे असा ठिकाणी एवढी महागडी उपचारपद्धती घेणे शक्य आहे का, असा प्रश्न डॉ. दोशी यांनी उपस्थित केला आहे.

तर भारतीयांमध्ये लोकप्रिय असणारे डॉ. रवी गोडसे आपल्या 'एक्स' (Twitter) वर बोलताना म्हणाले की, "भारतीय शास्त्रज्ञ जर चांद्रयान इतक्या कमी पैशात तयार करत असतील तर त्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान कमी पैशात बनविणे अवघड नाही..!!"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT