emotional breakdown  esakal
प्रीमियम हेल्थ

Emotional Breakdown : सततच्या 'इमोशनल ब्रेकडाऊन' मुळे 'फॅमिली टाइम' नकोसा झालाय..

मी तिला अनेकदा समजावलं, पण कधी कधी मलाही सहन होत नाही हा सततचा ताण..

Shraddha Kolekar

मुंबई : स्नेहाला अगदी छोट्या छोट्या कारणावरून सारखं रडू येतं.. कधी कधी तिला कारणही सांगता येत नाही की, ती का रडते आहे.. अशा वेळी फार 'हेल्पलेस' वाटत राहतं.

मी मुंबईला नोकरीला. ती पुण्याला. मी शनिवार रविवार जेव्हा पुण्यात येतो तेव्हा ही अपेक्षा करून आलेलो असतो की थोडा वेळ छान बाळासोबत घालवता येईल.. कुठेतरी छान फिरायला जाऊ.. पण असं काहीच होत नाही..

कुठल्याही छोटया गोष्टीवरून बायकोचा मूड खराब होतो आणि ती रडायला लागते.. अनेकदा त्या रडण्यात माझ्याबद्दलची नको एवढी काळजी असते, कधी नातेवाईकांच्या वागण्याचं वाईट वाटलेलं असतं, कधी बाळाला साधा ताप जरी आला तरी ती खूप जास्त मनाला लावून घेते..

मी तिला अनेकदा समजावलं पण कधी कधी मलाही सहन होत नाही हा सततचा ताण..

मला आता 'फॅमिली टाइम' (Family Time) नकोसा झाला आहे.. असे निलेश आपली पत्नी स्नेहाबाबत (नावे बदलली आहेत) सांगत होता.

तर फडके काकूंच्या (नाव बदललं आहे) कुटुंबातील सगळ्यांना त्यांचा खूप वैताग आलेला.. प्रत्येक गोष्टीत त्यांचा हस्तक्षेप असायचा. त्यांना खूप बडबड करायला आवडायचं. नको तितकं बोलणं, नको ती लुडबुड, नको तो सल्ला, नकारात्मक बोलणं.. याउलट घरातील मंडळी अत्यंत मितभाषी..

त्यांच्यातील संघर्षाने त्यांच्यावर अनेक मानसिक परिणाम झाले.. आपला रोल मुख्य भूमिकेत आता राहिला नाही हे त्यांना पटायला वेळ गेला..

त्यांच्यामध्ये त्यांच्या वागण्याची एवढी अपराधीपणाची भावना निर्माण झालेली की त्या ज्यावेळी त्या समुपदेशनासाठी गेल्या त्यावेळी त्या नजरेला नजर देऊन बोलू शकत नव्हत्या..

अनुजा (नाव बदललं आहे) म्हणाली.. माझा मुलगा दहा महिन्यांचा आहे. माझा नवरा मदत करतोही.. पण प्रत्येकाच्या वागण्यात असं असतं की तू 'आई' आहेस आणि या गोष्टी तूच करायला हव्यात.

तुझी प्रायोरिटी बाळ असायला हवं असं सतत जाणवून दिलं जातं. खरं तर घरातल्या प्रत्येकाची बाळ ही जबाबदारी आहे आणि प्रत्येकाने ती तितक्याच आत्मीयतेने जपायला हवी.

पण हीच जबाबदारी मदतीच्या किंवा उपकाराच्या भावनेतून घेतली जाते तेव्हा मात्र खूप त्रास होतो.. त्यावेळी असं वाटतं की हे सगळं सोडून निघून जावं का? फक्त माझा मुलगाच माझा आहे.. बाकी कोणीही नाही..

इमोशनल ब्रेकडाऊन म्हणजे काय?

'इमोशनल ब्रेकडाऊन' (emotional breakdown) ला 'नर्वस ब्रेकडाऊन' असेही म्हटले जाते. यामध्ये एखाद्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात भावनिक त्रास होत असतो.

भावनिकरीत्या ते 'पॅरालाईज' झाल्याप्रमाणे वाटत असते. रोजच्या जगण्यातील गोष्टीसुद्धा त्यांना पेलणे अवघड होते. यामुळे खूप स्ट्रेस येऊन ते हेल्पलेस वाटून घेतात. त्यांना गोष्टी कश्या हाताळायचा ते कळत नसल्याने ते शांत होतात, चिडतात, रडतातही..

का होते इमोशनल ब्रेकडाऊन?

क्षमतेपेक्षा जास्त कामाचा ताण, कौटुंबिक कलह, आर्थिक अडचणी, एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू यांसारखी असंख्य कारणे आहेत. तसेच शरीरात हार्मोनल चेंजेस झाल्यास देखील अशा प्रकारे इमोशनल ब्रेकडाऊन होते. ही एकप्रकारची मानसिक अवस्थाच असते. (mental health news)

इमोशनल ब्रेकडाऊनला कसं हाताळायचं?

याबाबत बोलताना समुपदेशक स्वाती गानू म्हणाल्या, महिला वयाच्या अनेक टप्प्यांवर वेगवेगळ्या फेजेसमधून जात असतात. प्रेग्नन्सी आणि बाळंतपणानंतर त्यांच्या हार्मोन्समध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असतात.

'पोस्ट पार्टम डिप्रेशन' (post partem depression) या प्रकारातूनही अनेक महिला जात असतात. तर मेनाॅपाॅज येताना देखील त्यांना मानसिक स्थित्यंतरातून जात असतात. वयाच्या अनेक टप्प्यांवर त्यांच्यात शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात.

बाळंतपणानंतर अचानक वाढलेली जबाबदारी, त्यातच 'वर्किंग वुमन' असतील तर कामाचे प्रेशर, घरच्या जबाबदाऱ्या यामुळे आणि इमोशनल इंबॅलन्स यामुळे खूप इमोशनल ब्रेकडाऊन होतात.

अशा स्थितीत घरच्या मंडळींना नेमकं आपलं काय आणि कसं चुकतं आणि कसं हॅन्डल करावे हे कळत नाही. नातेसंबंधात तणाव निर्माण होतो. अशा वेळी घरातील मंडळींनी त्या स्त्रीला समजून घेणे गरजेचे असते.

'रिऍक्ट' न होता 'रिस्पॉन्ड' करा..

'तू हे केलंसच कसं.?' असा जाब विचारण्याच्या भूमिकेत जाण्यापेक्षा मला कळतंय तुला या कारणामुळे त्रास होतोय ना? असं विचारावं किंवा काय वागायला हवं आपण याचा निर्णय मिळून घ्यायला हवा. नवरा बायकोच्या नात्यात एकमेकांच्या गोष्टींवर रिऍक्ट होण्यापेक्षा त्यांना ऐकून घ्या.

'जजमेंटल' होऊ नका

अशा परिस्थिती समोरच्याला मला ऐकून घ्यावं असं जेव्हा वाटतं तेव्हा जजमेंटल न होता समोरच्याला शांतपणे, संवेदनशीलतेने ऐकून घेणे गरजेचे असते. त्यातून दोघांनी मित्र होणे आवश्यक असते. तुम्ही जरी ऑफिसमधून थकून आला असेल तरी थोडा वेळ का असेना तुमच्या मांडीवर बाळाला पाहणे यात बायकोचं समाधान असू शकतं. त्यामुळे भावना काय आहेत या समजून घेऊन वागणे महत्वाचे आहे.

प्रश्नावर चर्चा करण्यापेक्षा उत्तर शोधा..

तुझा प्रश्नच कसा चुकीचा आहे, किंवा असा प्रश्न तुला कसा पडू शकतो असे विचारत बसण्यापेक्षा याच्यावर काय पर्याय असू शकतो, याचे उत्तर काय असू शकते यावर दोघांनी मिळून चर्चा करणे अपेक्षित आहे. जबाबदाऱ्या सांभाळताना वेळेचे नियोजन करा.

घरातल्या प्रश्नांबात स्टॅन्ड घेणे आवश्यकच

अनेकदा नवरा बायकोच्या नात्यात घरामधील निर्णयांबाबत स्टॅन्ड घेणे गरजेचे असते, घरातील राजकारण असो किंवा ऑफिसमधील राजकारण आपल्या जोडीदारासाठी आपण उभे राहायला हवे. कोणताही निर्णय हा चर्चा करून एकमताने घ्यायला हवा. अनेकदा केवळ स्टॅन्ड न घेतल्याने सुद्धा गोष्टी हाताबाहेर जाण्याइतपत ताणल्या जातात.

सीमारेषा ठरवून घ्यायला हव्यात

जास्त अपेक्षा पूर्ण करायच्या नादात अनेकदा ओढाताण होते आणि तणाव निर्माण होतात. नात्यांमध्ये अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्या जातात परंतु याबाबत आपल्या सीमारेषा ठरवून घ्यायला हव्यात. यापेक्षा जास्त अपेक्षा मी पूर्ण करू शकत नाही हे ठामपणे सांगता यायला हवे.

स्वतःला अपराधी समजणे बंद करायला हवं

विशेष करून बाळंतपणानंतर महिलांना अपराधीपणाची भावना निर्माण होते. त्यांना आपण बाळाला, नवऱ्याला वेळ देत नाही त्यांच्यावर अन्याय होतोय का, असे वाटू लागते. किंवा उलट मी हे सगळे एकटीच करतेय अशीही भावना त्यांच्यात निर्माण होऊ शकते.

अशा वेळी त्या स्वतःलाच दोष देऊ लागतात. कालांतराने यातून बाहेर पडतात पण यासाठी घरातल्या मंडळींनी हे पटवून देणे, जबाबदाऱ्यांचं वाटप करणे, समोरच्याला समजून घेणे या गोष्टी करणे गरजेचे असते.

समुपदेशन घेणे गरजेचे असते..

इमोशनल ब्रेकडाऊन हे एका काळापर्यंत आणि मर्यादित स्वरूपात असेल तर प्रयत्नांनी त्यावर मात करता येते. मात्र हे जास्त काळ राहिले आणि गंभीर स्वरूप धारण केले तर मात्र समुपदेशकांची गरज घेणे आवश्यक आहे.

--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT