smart sleep esakal
प्रीमियम हेल्थ

झोप उडवणारी टेक्नॉलॉजीच मिळवून देणार 'स्मार्ट झोप'..!!

Shraddha Kolekar

सध्या बाजारात असे अनेक मोबाइल अँप्लिकेशन आले आहेत जे फक्त सुरु करायचे आणि मॉर्निंग वॉकला सुरुवात करायची...

तुमचा मोबाईल तुमची पावलं मोजतो. अंतर सांगतो. चालल्यामुळे तुमचे काय फायदे झाले तेही सांगतो. तुमचे रोजचे चालायचे टार्गेट ठरवतो. तुमच्या मित्रांचा डेटा तुम्हाला दाखवून तुमच्यात स्पर्धा पण घडवून आणतो... आणि तुमचा चालायचा एक पॅटर्न तयार करतो... हे झालं चालायचं..! पण झोपायचे काय? त्याचेही तंत्रज्ञान आलंय? ते कसं..?

एका अभ्यासानुसार...

अमेरिकेतील लोकांच्या जीवनशैलीवर झालेल्या एका अभ्यासानुसार, एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यातील साधारण तीस वर्ष ही झोपण्यासाठी जातात. झोप नीट न झाल्याचे परिणाम आरोग्यावर होतात आणि त्यातून लठ्ठपणा, मधुमेह, मानसिक आरोग्य आणि अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

त्यातून तुमची काम करण्याची क्षमता कमी होऊन तुमची उत्पादन क्षमता घटते आणि त्यामुळे तुमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होतो. झोप ही तुमच्या आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा अत्यंत महत्वाचा घटक आहे याचा अभ्यास करून एका मोबाईल बनविणाऱ्या कंपनीने सध्या बाजारात एक स्मार्ट वॉचमधील नवीन फीचर बाजारात आणले आहे.

तुमच्या झोपेचा पॅटर्न काय?

झोपतात तर सगळेच.. पण कोणी घुबडाप्रमाणे रात्रभर जागून सकाळी झोपतं, तर कोणी रात्री लवकर झोपून कोंबड्यांप्रमाणे सकाळी लवकर उठतं.. या कंपनीने आठ प्रकारच्या प्राण्यांच्या झोपण्याच्या पॅटर्नप्रमाणे घड्याळाचे झोपण्याचे पॅटर्न तयार केले आहेत.

यात तुम्ही कोणत्या प्राण्यांमध्ये बसता? ही गंमतीची गोष्ट असली तरी निसर्गात अनेकांच्या झोपण्याच्या वेळा वेगवेगळ्या असल्याचा अभ्यास या कंपनीने केला असून त्यातून हे पॅटर्न तयार केले आहेत.

घड्याळ घेणार आईची जागा

" उन्हं डोक्यावर आली की झोपू नये".. "रात्री लवकर झोपावं.. सकाळी लवकर उठावं".. अशा चांगल्या सवयी लावणाऱ्या आईची जागा आता तंत्रज्ञानाने घेतली आहे. हे तंत्रज्ञान तुमच्या आईप्रमाणे तुमच्या उठण्याच्या वेळा, झोपण्याच्या वेळा, तुमच्या झोपण्याचा पॅटर्न लक्षात ठेवतं, त्याचा अभ्यास करतं. त्यानुसार तुम्हाला चांगल्या वाईट झोपण्याचा सल्ला देखील देतं..

तुमच्या झोपण्याच्या सवयी सुधारण्यासाठी तसेच रात्री झोपताना ध्यान करणे, सकाळचा प्रकाश घेणे अशा चांगल्या सवयी लावण्याचा या वॉचचा प्रयत्न असणार आहे. तुमच्या छोट्या छोट्या चुकीच्या सवयी सुधारून नव्या सवयी लावण्यासाठी प्रवृत्त करणार आहे. छोट्या गोष्टी सुधारून त्याचे चांगले परिणाम आरोग्यावर होत असल्याचे दाखले देखील या कंपनीने दिले आहेत.

घरातल्या वस्तुशीही होणार स्मार्ट कनेक्शन

झोपेचे हे स्मार्ट वॉच फक्त झोप आणि वेळ सांगणार नाही तर घरातल्या अनेक स्मार्ट वस्तूंशी कनेक्शन जोडून ऑटोमॅटिक काम करणार. म्हणजे तुमच्या घरातलं वातावरण किती थंड झाले आहे याचे डेटा अनालिसिस करून त्याप्रमाणे तुमच्या एसी किंवा पंख्याचे ऑटोमॅटिक वातावरण सेट करणार. तुमच्या झोपेच्या वेळेला प्रकाश मंद करणार, तुमच्या सवयींप्रमाणे तुमच्याशी कनेक्टेड वस्तूंचा पॅटर्न ठरविणार.

आरोग्यपूर्ण झोपेच्या भविष्यासाठी

केवळ एका व्यक्तीच्या झोपेच्या अभ्यासावर न थांबता या कंपनीने जगातील जवळपास साडेसहा कोटी व्यक्तींचा डेटा गोळा केला आहे. तसेच या झोपेबाबत आणखी अभ्यास करण्यासाठी काही शैक्षणिक संस्थांशी हातमिळवणी देखील केली आहे.

झोप हा साधारण वाटत असला तरीही प्रत्येकाच्या आणि पर्यायाने समाजाच्या आरोग्यावर परिणाम करणारा घटक असल्याने उत्पादन करणाऱ्या बाजाराला या झोपेची किंमत कळली आहे, त्यानिमित्ताने का होईना आपल्यालाही या झोपेची किंमत वेळीच कळेल हीच अपेक्षा..!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT