Bengaluru CEO Suchana Seth esakal
प्रीमियम महाराष्ट्र

Bengaluru CEO Suchana Seth: एक क्षुल्लक गोष्ट अन् पोटच्या मुलाला संपवून बॅगमध्ये भरलं.. ही आई एवढी क्रूर का वागली?

घटस्फोटाचा खटला, पतीला मुलाला भेटण्यासाठी कोर्टाने दिलेली परवानगी या कारणातून सूचना सेठनं हे टोकाचे पाऊल उचलले.

Shraddha Kolekar

मुंबई : बेंगळुरूतील स्टार्टअप कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदावर कार्यरत असलेल्या सूचना सेठ या महिलेनं आपल्या ४ वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केली.

घटस्फोटाचा खटला, पतीला मुलाला भेटण्यासाठी कोर्टाने दिलेली परवानगी या कारणातून सूचना सेठनं हे टोकाचे पाऊल उचलले.

पण खरंच ऐवढ्या क्षुल्लक कारणावरून आई आपल्याच मुलाची हत्या करू शकते का? अशी मानसिकता का निर्माण होते, याला रोखता येईल का?

सूचना सेठने ६ ते १० जानेवारी या कालावधीसाठी गोव्यातील एका रिसोर्टमध्ये खोली बुक केली होती. सात जानेवारीला रात्री सूचनाने रिसोर्टमधील कर्मचाऱ्यांना तातडीने काम असल्याने बेंगळुरूत परत जायचे आहे, असा फोन केला.

कर्मचाऱ्यांनी सूचनाला विमान तिकीटांचा पर्याय दिला पण सूचनाने आग्रह केला. कर्मचाऱ्यांनी एका स्थानिक कॅब चालकाला बोलावून घेतले. गोवा ते बेंगळुरू या प्रवासासाठी सूचना तब्बल ३२ हजार रुपये द्यायला तयार झाली.

रात्री एकच्या सुमारास सूचना रिसोर्टमधून बाहेर पडली. सकाळी १० च्या सुमारास रिसोर्टमधील कर्मचारी सूचना ज्या खोलीत थांबलेली त्या खोलीच्या साफसफाईसाठी गेले आणि सूचना पोलिसांच्या जाळ्यात अडकली.

माध्यमांमधील वृत्तानुसार, सूचनाचे केरळात राहणाऱ्या वेंकट यांच्याशी २०१० मध्ये लग्न झाले होते. वेंकट हे देखील एआय क्षेत्रातच कार्यरत असल्याचे समजते.

सूचना- वेंकट यांना २०१९ मध्ये मुलगा झाला. मात्र २०२० मध्ये पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेला आणि त्या दोघांनी घटस्फोट घेण्याचे निश्चित केले.

काही दिवसांपूर्वी कोर्टाने वेंकट यांना त्यांच्या चार वर्षांच्या मुलाला आठवड्यातून एकदा भेटण्याची परवानगी दिली होती.

याच कारणावरून सूचनाने मुलाची हत्या केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. सध्या सूचना पोलीस कोठडीत असून चौकशीदरम्यान ऐवढे टोकाचे पाऊल का उचलले हे हळूहळू स्पष्ट होईल.

मात्र, या घटनेमुळे अनेकांच्या मनात एखादी व्यक्ती एवढ्या क्षुल्लक कारणावरून आपल्याच जवळच्या व्यक्तीचा जीव कसा काय घेऊ शकते, परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये शिकलेली, बड्या टेक कंपन्यांमध्ये काम केलेली महिलेला स्वत:च्या मनस्थितीचा अंदाज येत नव्हता का? याच प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला.

याविषयी बोलताना पुणे गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) अपर पोलीस अधीक्षक (Additional Superintendent of Police) अनुजा देशमाने म्हणाल्या, असे गुन्हे हे अनेकदा भावनिक गुंतागुंतीतून घडतात.

साधारण २०१५ साली मी वारजे पोलीस स्टेशनला काम करत असतानाही अशीच केस समोर आली होती.

एका तान्ह्या बाळाला त्या मुलाच्या आईनेच मारले आणि ती माहेरी निघून गेली होती. नवऱ्याशी झालेले भांडण आणि सासरी झालेल्या तणावातून तिने हा टोकाचा निर्णय घेतला होता.

पण जेव्हा आम्ही तिला ताब्यात घेतलं तेव्हा ती आई खूप धक्क्यात होती. खूप जास्त रडत होती.

कधी कधी भावना या वस्तूस्थितीच्या वरचढ ठरतात आणि राग, भावना यांचा एकत्रित परिणाम होऊन त्यावेळी ती घटना घडते.

हा सगळा एका दिवसातल्या रागातून घडलेला प्रकार नसतो तर अनेकदा यामागे खूप काही घटना घडून गेलेल्या असतात. अनेक मानसिक धक्के पचवून व्यक्ती एवढी हिंमत करण्यापर्यंत आलेली असते.

मी माझ्या तीस वर्षांच्या सेवेत अनेक अनुभव घेतले आहेत, ज्यात हेतू वाईट नसला तरी रागाच्या आणि भावनेच्या भरात चोरीपासून ते खुनापर्यंत अनेक घटना घडताना पहिल्या आहेत.

अशा केसेस मध्ये अनेकदा नातेवाईकांचा पाठिंबा नसतो आणि यातून आलेल्या नैराश्यातून अशा घटना घडतात.

अनुजा देशमाने पुढे म्हणाल्या, अनेकदा घरात देखील जेव्हा भांडणे होतात तेव्हा लहान मुलांवर त्याचा राग निघताना दिसतो.

त्यामुळे रागावर ताबा ठेवणे, नैराश्यात मदत घेणे गरजेचे आहे. आणि असं जेव्हा होत नाही तेव्हा काहीसे गंभीर प्रकार घडण्याची शक्यता बळावते.

(Latest marathi news about #suchana seth)

नागपूर येथील महाराष्ट्र शासनाच्या 'गव्हर्नमेंट इन्स्टिटयूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स' मधील डिपार्टमेंट ऑफ फॉरेन्सिक सायकॉलॉजी या विभागाचे प्रमुख, प्राध्यापक हरेंद्रकुमार बाम्बुर्डे म्हणाले, प्रत्येक घटना ही वेगळी असते.

परंतु अशा केसमध्ये अनेकदा असे असते की, त्या वडिलांविषयी त्या आईला प्रचंड राग असतो. आपलं मुलं आपल्यापासून लांब नेलं जातंय, त्याला आपल्यापासून तोडण्याचा प्रयत्न होतोय ही असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली असते.

अशा वेळी लहान मुलाने वडिलांविषयी दाखविलेले प्रेम देखील त्रासदायक ठरू शकते. यावेळी संताप अनावर होऊन अशा घटना घडू शकतात.

हा दीर्घकाळातील नैराश्यातून आलेला प्रकार असतो. अतिविचार करून हा आई ते 'गुन्हेगार आई' चा प्रवास घडत असतो.

अशा वेळी माणसाच्या मेंदूवरील नियंत्रण सुटून भावना, राग या गोष्टी वरचढ होतात आणि त्यातून अशा घटना घडतात.

मानसोपचारतज्ज्ञ स्वप्नील पांगे म्हणाले, अशा घटना या एका रात्रीत घडत नाहीत. त्याच्या पाऊलखुणा असतात.

असे प्रकार घडत असताना त्या व्यक्तीला मानसिक त्रास असू शकतो किंवा नैराश्याने टोक गाठलेले असू शकते आणि भावनांचा आवेग जसे की अती राग किंवा अती दुःख याच्या भरात असे निर्णय घेतले जातात.

यामध्ये दुसरा प्रकार असा की काही खुनशी माणसं, ज्यांना इतरांना त्रास देताना आनंद घ्यायचा असतो अशा प्रकारातही अशा प्रकारच्या टोकाच्या गोष्टी करू शकतात.

जेव्हा भावना टोकाच्या पातळीवर जातात तेव्हा मेंदूतील सारासार विचार करणारी जागा ते व्यापून टाकतात.

त्यामुळे तुमच्या भावना टोकाकडे जात नाहीयेत ना हे त्या व्यक्तीने आणि त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तींनी लक्षात घ्यायला हवे.

तसेच जेव्हा जेव्हा समाजात अशा घटना घडतात तेव्हा त्यावर घरात, समाजात निरोगी, कारणमीमांसा करणाऱ्या चर्चा घडायला हव्यात.

एखादी व्यक्ती अति तापट, रागात असेल तर ती अशी वागण्यामागे कारणे आहेत का याचा शोध घरातल्या मंडळींनी घ्यायला हवा. त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत चर्चा व्हायला हवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT