Ganesh Chaturthi 2023 esakal
साप्ताहिक

Ganesh Chaturthi 2023 : कार्यक्रमांची लयलूट...

उत्सवकाळात शैव परंपरेनुसार श्रीगणेशाचा दररोज राजोपचार होतो. त्यात संगीत व नृत्य, वैदिक अवधार्य, अलंकार दीपम, नक्षत्र दीपम, छत्र चामर सगळे आले.

सकाळ डिजिटल टीम

मुकुंद कुटे / गौतमी जोगळेकर

अमेरिकेतील सर्वात पहिला, मोठा व भारताबाहेरील सर्वात आदर्श गणेश महोत्सव, अशी प्रसिद्धी असलेला दहा दिवसांचा सार्वजनिक फेस्टिवल, फिलाडेल्फियात साजरा होतो! २००५मध्ये सुरू झालेल्या या सार्वजनिक उत्सवाला त्याआधीची ३४ वर्षांची एक दिवसीय उत्सव म्हणून परंपरा आहे.

उत्सवकाळात शैव परंपरेनुसार श्रीगणेशाचा दररोज राजोपचार होतो. त्यात संगीत व नृत्य, वैदिक अवधार्य, अलंकार दीपम, नक्षत्र दीपम, छत्र चामर सगळे आले. दररोज संगीत सेवा होते. त्यामध्ये अमेरिकेतील आणि भारतातील नावाजलेले कलाकार आपली कला सादर करतात. पहिल्या व शेवटच्या दिवशी गणपतीची ढोल-ताशाच्या गजरात मोठी मिरवणूक निघते.

हा उत्सव सामाजिक बांधिलकी सांभाळून दरवर्षी सपोर्ट-अ-चाइल्ड या विश्व हिंदू परिषदेमार्फत चालविलेल्या उपक्रमाला भरीव मदत करून दहा मुलांचा सांभाळ करतो. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्लॅस्टिकचा वापर नगण्य असतो. उसाच्या चिपाडापासून केलेल्या पत्रावळी, लाकडी चमचे, कागदी पेले इत्यादींचा वापर करून हा महोत्सव एक हरित उत्सव म्हणून गणल्या जातो.

Also Read - ‘फेलिचे’ : एका अनोख्या चवीचा प्रवास....

यंदाच्या उत्सवात दिल्लीच्या गुरू राधिका सॅम्सन यांचे ओडिसी नृत्य, पद्मश्री मालिनी अवस्थी यांचे गायन, केरळमधील कलामंडलं यांचे कथकली नृत्य, पुण्याच्या निश एंटरटेनमेंटचा लताजींना आदरांजली वाहणारा कार्यक्रम, गुजराथी डायरो, पं. मुकुंदराज देव रचित कथक नृत्य, गायन व वादन कृती, कर्नाटकी शैलीमधील अनाहिता आणि अपूर्वा यांचे गायन, विदुषी गौरी पाठारे, पं. धनंजय हेगडे व विदुषी शाल्मली जोशी यांचे शास्त्रीय गायन असे भरगच्च कार्यक्रम गणरायासाठी सादर होतील.

सामाजिक बांधिलकी म्हणून व समाज एकीकरणासाठी होत असलेल्या या महोत्सवात १५०हून अधिक सेवाभावी कार्यकर्ते झटून काम करतात. हा उत्सव सर्व भक्तांसाठी पूर्णतः विनामूल्य असून, आलेल्या ऐच्छिक देणगीवरच हा उत्सव दिमाखात गेली १८ वर्षे, गणरायाच्या कृपेने सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT