gold esakal
साप्ताहिक

Gold Investment सोन्यातली गुंतवणूक दागिन्यांत असावी की..?

Shraddha Kolekar

आपण कॉइन घेतो किंवा वेढणी घेतो तेव्हाही जीएसटी भरतो आणि त्याचे जेव्हा दागिने करतो तेव्हाही जीएसटी देतो. कारण वस्तूचे स्वरूप बदलले की जीएसटी द्यावा लागतो. व्हॅट लागू झाल्यापासूनच हे धोरण अमलात आले. आता हे अधिक जाणवते, कारण व्हॅट एक टक्का होता आणि जीएसटी तीन टक्के आहे. त्यापेक्षा थेट दागिना घेतलेला केव्हाही सोयीस्कर..

आदित्य मोडक

सोने केवळ भारतीयांसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. कारण हा केवळ चमकणारा धातू नसून त्याला सार्वभौमत्वाचे कोंदण आहे. त्यामुळेच सोने जगात सर्वांनाच हवे आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक घटकांचा प्रभाव सोन्यावर असल्यामुळे सोने वापराच्या पद्धतीत आपल्याला काळानुसार बदल झालेला दिसतो. २०व्या शतकापूर्वी परदेशातही सोन्याची भुरळ होती. त्यामुळेच सोन्याचे दागिने, वस्तू, शोभेच्या वस्तू, राजमहालांमध्ये सोन्याचा भरपूर वापर झालेला दिसतो. २१व्या शतकात निवडक दागिने वापरण्याची पद्धत पाश्चिमात्त्य देशांतून आहे. मात्र, गुंतवणूक म्हणून सोन्याचे बार, कॉइन, गिन्नी आदी स्वरूपात खरेदी करण्याचे प्रमाण मोठे आहे. याच कालावधीतील भारताचा विचार केल्यास सोने आणि त्याचा वापर यांचे पिढ्यांपिढ्यांचे नाते आहे आणि आजही ते तेवढेच घट्ट आहे. भारतात सोने समृद्धी, गुंतवणूक म्हणून खरेदी केले जाते. अगदी जन्मापासून मधातून सोने चाटविण्यापासून, गळ्यात जिवती बांधण्यापासून ते सासरच्या उंबरठ्यावर पाय ठेवताना नव्या नात्याचे डोरले गळ्यात बांधण्यापर्यंत सोन्याचा वावर असतो. गुरुपुष्यामृताला अगदी गुंजभर का होईना सोने खरेदी करणाऱ्या गृहिणीच्या सौंदर्यात भर घालणारे सोने भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे.

भारतात सोन्याचे दागिने करण्याचे प्रमाण जगाच्या अन्य बाजारपेठांपेक्षा अधिक आहे. प्रामुख्याने स्त्रियांसाठी ते केले जातात. गृहलक्ष्मीसाठी केलेला दागिना आपल्याकडे क्वचितच म्हणजे घर खरेदी, गृहकर्ज फेड, वैद्यकीय उपचार वा अन्य आपत्कालीन स्थितीतच मोडला जातो आणि हे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे भारतात दागिने स्वरूपात झालेली सोने खरेदी ही आपोआपच दीर्घकालीन होते. आज जरी सरासरी सोने प्रति १० ग्रॅमला ६० हजार रुपये असले, तरी भारतातील बहुतेक घरांतून सोने विविध भाव-टप्प्यांवर वेगवेगळ्या भावांत खरेदी करून साठवलेले असते. भारतीय स्त्रिया सोने खरेदी करणाऱ्या आणि साठवणाऱ्या आहेत. त्यामुळे या गुंतवणुकीला एकच दार आहे, एंट्रीचे. सोने ही वाढत जाणारी मालमत्ता आहे.

महागाईवरचे एक टूल

जगाच्या पाठीवर कोणत्याही बाजारपेठेत मान्यता असणारा, गुंतवणूक वा चलन क्षमता असणारा गुंतवणूक पर्याय म्हणजे सोने. आपत्कालीन स्थितीत पैसे मिळवून देणारे सोनेच आहे. बाकी काही नाही चालले तरी हातातले सोने अर्ध्या रात्रीतही पैसे उभे करून देऊ शकेल, असा विश्वास लोकांना आहे. सोने या गोष्टीचे स्टँडर्डायझेशन असे आहे, की जगात तुम्ही कुठेही जा, ते एकच असते. त्याचे वजन, त्याचा चोखपणा सगळीकडे सारखाच येतो. त्यामुळे लोकांना ते ‘नेक्स्ट टू करन्सी’ म्हणून होल्ड करता येते. सोने चलनवाढीवरील महत्त्वाचा उपाय आहे. महागाईप्रमाणे सोन्याची किंमत वाढते. बँकेत मिळणारे व्याज आणि चलनवाढ यांचा विचार केल्यास महागाईबरोबर चालणारा एकच गुंतवणूक पर्याय म्हणजे सोने. कारण ठेवींवर पाच-सहा टक्क्यांनी व्याज मिळते आणि महागाई दहा ते अकरा टक्क्यांनी वाढते. त्यामुळे सोन्यात केलेली गुंतवणूक केव्हाही इतर गुंतवणुकींपेक्षा उजवी ठरते.

सोन्याची परिमाणे

सोन मोजण्याचे माप कॅरेट आहे. जितक्या कॅरेटचा दागिना तितक्या कॅरेटच्या शुद्धतेचे त्यात सोने असते. म्हणजे तो पूर्ण दागिना जर वितळवला, तर त्या त्या कॅरेटचे सोने मिळते. हॉलमार्किंगमध्ये 916 मार्क दिसला तर २२ कॅरेट सोने, 750 मार्क दिसला तर १८ कॅरेट सोने असते. १४, १८ व २२ कॅरेटचे दागिने असतात. २२ कॅरेटचे दागिने स्टॅण्डर्ड समजले जातात. दागिन्यात रत्ने घट्ट बसावीत यासाठी सोन्याचे काठिण्य अधिक लागते. त्यामुळे मौल्यवान रत्नांचे दागिने १४ किंवा १८ कॅरेटमध्ये घडविले जातात.

सोन कधीही चांगलेच

गोल्ड इनव्हेस्टमेंट केव्हाही चांगली. ती गोल्ड बॉण्डच्या स्वरूपातही करता येते. त्याला ‘एसजीबी’ म्हणतात. सरकार वर्षातून त्याच्या चार सिरीज काढते. विशिष्ट किमतीला त्या दिल्या जातात. रिटेल सबस्क्राईबरला डिस्काउंट दिला जातो. हे बॉण्ड दोन ग्रॅम आणि त्याच्या पटीत असतात. या बॉण्डची किंमत वाढणे किंवा घटणे हे सोन्याच्या किमतीवर अवलंबून असते. ते एक्सपायर झाले की त्याची किंमत तुम्हांला परत दिली जाते. त्यातून मिळणारे ॲप्रिसिएशन टॅक्स फ्री असते. परंतु त्याची खरेदी-विक्री क्लिष्ट असते. सोन्याप्रमाणे रात्रीतून तो बॉण्ड विकून पैसे उभे करता येत नाहीत. सोन्याचे रोखे बँका तारण म्हणून घेऊन सहजतेने कर्ज देतात. हे रोख किंवा बॉण्ड डीमॅट स्वरूपात असतात.

थेट दागिना करणे चांगले

आपण कॉइन घेतो किंवा वेढणी घेतो तेव्हाही जीएसटी भरतो आणि त्याचे जेव्हा दागिने करतो तेव्हाही जीएसटी देतो. कारण वस्तूचे स्वरूप बदलले की जीएसटी द्यावा लागतो. व्हॅट लागू झाल्यापासूनच हे धोरण अमलात आले. आता हे अधिक जाणवते, कारण व्हॅट एक टक्का होता आणि जीएसटी तीन टक्के आहे. त्यापेक्षा थेट दागिना घेतलेला केव्हाही सोयीस्कर. सोनेभिशी योजनेमध्ये पैसा गुंतवल्याने तुमचे सोने तुमच्या नावाने बुक होत राहते आणि शेवटी तुम्ही त्याचे सोने किंवा दागिना घेता. त्यामुळे तुम्हांला एकदाच जीएसटी पडतो. शिवाय सोने म्युच्युअल फंड एसआयपी सारखे ॲव्हरेज रेटने बुक होते. दागिन्यासाठी एकरकमी रक्कम नसेल, तर टप्प्याटप्प्याने पैसे गुंतवता येतात. शिवाय सराफ त्या अगेन्स्ट करणावळीवर सवलत किंवा काही किमतीचे व्हाऊचर देतात. त्यामुळे हे फायदेशीर आहे.

भारतातून दागिन्यांची निर्यात

भारतात सोने निर्माण होत नाही. कोल्लारच्या खाणीत दोन टनापर्यंत सोने निर्माण व्हायचे. पण ते विकून मिळणाऱ्या पैशापेक्षा खाणी चालवायचा खर्च अधिक येत असल्याने त्या खाणी सरकारने बंद केल्या. बिहारमध्येही अशा खाणी असण्याची शक्यता सध्या चर्चेत आहे. पण सद्यःस्थितीत मात्र सोने दोन मार्गांनी भारतात येते. जुन्या दागिन्यांच्या मोडीतून आणि दुसरा मार्ग म्हणजे बाहेरून मागवले जाणारे ७० ते ९५ टक्के प्युरिटी असलेल्या कच्च्या मालाचे दगड म्हणजे डोरे. भारतात सरकारने रिफायनिंगचे परवाने दिलेले लोक हे सोने म्हणजे रॉ गोल्ड डोरे आयात करू शकतात. दुबईसारख्या देशातून आणलेल्या दागिन्यांवर तेथील मेकिंग चार्ज आणि जीएसटी लागतो आणि येथे ते सोने पुन्हा दागिना करण्यासाठी वापरताना येथील जीएसटी आणि मेकिंग चार्ज भरावे लागतात. महत्त्वाचे म्हणजे हे दागिने भारतातूनच निर्यात झालेले असतात.

सोन्यातील शाश्वतता

सध्याच्या स्थितीत सोने बाजारात जागतिक पातळीवर मंदीसदृश परिस्थिती आहे. तसेच चलनवाढही होत आहे व तरीही सोन्याचे भाव घटत आहेत, हे खरेतर सोन्याबाबतच्या अर्थविषयक नियमांच्या विरुद्ध आहे. मात्र, सर्वच डेट इन्स्ट्रूमेंट, ट्रेझरी इन्स्ट्रूमेंटमध्ये मोठ्या फंड हाऊसना तोटा होत आहे. सदर तोटा भरून काढण्यासाठी त्यांना सोने विक्रीशिवाय इतर कोणताही पर्याय उरलेलाही नाही. चीनमधील स्थावर मालमत्ता बाजार अतिशय अनिश्चित झाला आहे. त्यांना मागणी नसल्याने मोठ्या प्रमाणावर मंदी निर्माण झाली याचाही परिणाम रोख तरलता निर्माण करण्यासाठी मॉर्गेज फंडिंग मार्केटमधील कित्येक संस्थांना सोने विक्रीशिवाय पर्याय नसल्याने चीनच्या बाजारपेठेतून मोठ्या प्रमाणात पडत्या भावात सोन्याची विक्री होत आहे, ह्या अशा अपवादात्मक घटना सोडल्यास दीर्घकाळ सोने तेजीत राहण्याची शक्यता अधिक आहे. सोन्यात अशाप्रकारे अर्थविषयक नियमांना सोडून जेव्हा विक्री होते त्या वेळेस घाबरून न जाता सोन्याची खरेदी लाभदायक ठरू शकते. सोने घटत असेल तर थोडेथोडे करून त्यात गुंतवणूक करणे, हे दीर्घकालीन शहाणपणाचे ठरू शकते. कोणत्याही अर्थव्यवस्थेत संकट काळात निश्चितपणे रोख तरलता देऊ शकणारे गुंतवणूक केवळ सोनेचे आहे.

मध्यवर्ती बँकांकडेही सोने

मध्यवर्ती बँकांची सोन्यावर असणारी भिस्त २०२३मध्येही कायम आहे. २०२३च्या पहिल्या सहामाहीत जगातील नऊ मध्यवर्ती बँकांनी सोन्याची खरेदी केली आहे. चीनच्या पीपल्स बँक ऑफ चायनाने याच काळात १०३ टन, सिंगापूरने ७३ टन, पोलंडने ४८ टन, रिझर्व्ह बँकेने १० टन, चेक रिपब्लिकने ८ टन, फिलिपीन्सचे ४ टन, इराकने २ टन, कतारने २ टन आणि युरोपियन सेंट्रल बँकेने २ टन सोने खरेदी केले आहे.

जगातील प्रमुख मध्यवर्ती बँकांनी २०२० व २०२१मध्ये अनुक्रमे २७३ व ४६३ टन सोने खरेदी केले होते. मात्र, २०२२ हे वर्ष सोने खरेदीबाबत अनन्यसाधारण ठरले. जागतिक पातळीवर अस्थिरता निर्माण झाल्याने व रशिया-युक्रेन युद्धामुळे सोन्यात गुंतवणुकीस मध्यवर्ती बँकांनी प्राधान्य दिले. त्यामुळेच दोन वर्षांत झालेल्या एकूण खरेदीच्या सुमारे तिप्पट सोने खरेदी मध्यवर्ती बँकांनी केली. त्यांच्याकडून २०२२मध्ये एकूण १,१३६ टन सोन्याला मागणी आली, जी सोन्याच्या वार्षिक उपलब्धतेच्या जवळपास २५ टक्के होती.

डिझायनर दागिन्यांना मागणी

पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांच्या वापरात गेल्या तीन दशकांपासून बदल होत आहेत. भारतीय लोक, विशेषतः मुली, स्त्रिया फॅशनच्या बाबतीत अधिक चोखंदळ होत आहेत. त्यानुसार त्यांची दागिन्यांची गरज आणि फॅशनही बदल आहे. पारंपरिक दागिन्यांबरोबर डिझायनर दागिन्यांना मागणी वाढत आहे. त्यामुळे नव्या रचनांचे, नव्या प्रतीकांचे दागिने घडविण्याकडे कल वाढत आहे. तरुणाईचा विचार केल्यास त्यांचा ओढा लाइट वेट, डायमंड व डिझायनर दागिन्यांकडे वाढतो आहे. त्यामुळेच १४ व १८ कॅरेट दागिने आपल्याला मोठ्या स्वरूपात बाजारपेठेत दिसतात. त्यातही रोझ गोल्ड दागिन्यांना अधिक पसंती आहे. पारंपरिक दागिने नव्या स्वरूपात व पहिल्यापेक्षा कमी वजनाचे करण्याकडे कल दिसतो आहे.

----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Supriya Sule: बुलेट ट्रेनसाठी करोडो रुपये खर्च करतात; पण मुलांच्या शिक्षणासाठी निधी नाही, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT