sushila Esakal
साप्ताहिक

Indian Fast Food : सकाळचा नाश्ता किंवा सायंकाळचे स्नॅक म्हणून सुशिला रुचकर आणि पौष्टिक.!

साप्ताहिक टीम

वीणा व्यंकटेश मेतन, सोलापूर

आजच्या भाषेत सांगायचे, तर सुशिला हे ‘भारतीय फास्ट फूड’ आहे असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. सुशिला करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी व साधी आहे. घरातील मंडळींसाठी तसेच घरी आलेल्या पाहुण्यांसाठी सकाळचा नाश्ता किंवा सायंकाळचे स्नॅक म्हणून सुशिला चांगला पर्याय आहे.

महाराष्ट्रातील स्मार्ट सिटी सोलापूर हे शहर कर्नाटक व आंध्र प्रदेश या सीमेवर असल्याकारणाने येथील खाद्यसंस्कृतीमध्ये विविधता आढळते. हे या शहराचे वैशिष्ट्य आहे. तशी मी कर्नाटकातल्या बंगळूरची; पण लग्न झाल्यावर जेव्हा मी सोलापूरला आले, त्यावेळी मला येथील अनेकविध नवीन खाद्यपदार्थ पाहायला व खायला मिळाले.

माझ्या सासू लक्ष्मीबाई मेतन या तर साक्षात अन्नपूर्णाच. त्यांच्या हातच्या पदार्थांची चव फक्त आमच्यासाठीच नव्हे, तर नातेवाईक, शेजारी व मित्रमंडळी यांच्यासाठीसुद्धा एक पर्वणीच होती. मी माझ्या सासूबाईंकडून अनेक खाद्यपदार्थ करण्यास शिकले. त्यापैकी अत्यंत लोकप्रिय, पौष्टिक, रुचकर, स्वस्त आणि खमंग नाश्त्याचा प्रकार म्हणजे ‘सुशिला’.

भारतामध्ये तांदळापासून अनेक खाद्यपदार्थ केले जातात. त्यापैकी पोहे, इडली, दोसा, तांदळाच्या पोळ्या व भाताचे विविध प्रकार आपणास ठाऊकच आहेत. तांदळापासून केलेल्या चुरमुऱ्यांपासून सुशिला केला जातो. मी सुशिला करण्यासाठी खास कर्नाटकातील रायचूर येथून मुरमुरे मागवले होते. आजच्या भाषेत सांगायचे, तर सुशिला हे ‘भारतीय फास्ट फूड’ आहे असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही.

सुशिला करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी व साधी आहे. सुशिला मोजून दहा ते बारा मिनिटांत करता येतो. घरातील मंडळींसाठी तसेच घरी आलेल्या पाहुण्यांसाठी सकाळचा नाश्ता किंवा सायंकाळचे स्नॅक म्हणून सुशिला चांगला पर्याय आहे. माझी दोन्ही मुलेदेखील सुशिला करायला शिकली आहेत.

सुशिला करण्यासाठी लागणारे घटक : (तीन ते चारजणांसाठी)

५०० ग्रॅम चुरमुरे, अर्धा चमचा मोहरी, एक चमचा जिरा, तीन कांदे, चार-पाच हिरव्या मिरच्या, एक चमचा तिखट, एक चमचा हळद, तीन चमचे तेल, कोथिंबीर, कढीपत्ता, चार चमचे शेंगदाण्याचे कूट, अर्धा चमचा साखर किंवा पिठीसाखर, अर्धी वाटी कुटलेले फुटाणे व चवीनुसार मीठ.

सुशिला करण्याची पद्धत

एक मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यात चुरमुरे भिजवा. भिजलेले चुरमुरे हाताच्या मुठीने पिळून घ्या. हे चुरमुरे एका ताटात घेऊन, त्यात फुटाण्यांचे कूट, अर्धा चमचा साखर, चवीनुसार मीठ घाला व हलक्या हाताने नीट मिसळा. एका कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवा. त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, मिरच्या, तिखट, हळद, कढीपत्ता, बारीक लांब चिरलेला कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घ्या.

कढईत फोडणी देऊन झाल्यावर त्यामध्ये ताटातील भिजवलेले चुरमुरे घालून हलक्या हाताने हलवा. हे मिश्रण कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर तीन ते चार मिनिटं शिजू द्या. नंतर त्यावर कोथिंबीर घाला. दोन-तीन मिनिटांनी गॅस बंद करून गरमागरम सुशिला प्लेटमध्ये वाढा. वरून लिंबाची फोड, बारीक शेव व दही यांचा वापर केल्यास सुशिला अजून रुचकर व स्वादिष्ट लागेल.

(वीणा व्यंकटेश मेतन फूड ब्लॉगर आहेत.)

------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MVA Seat Sharing: विधानसभेत रंगत! महाविकास आघाडीकडे मागितली स्वतंत्र लढण्याची परवानगी, कोणत्या पक्षाने केलं शक्ती प्रदर्शन?

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; देशांतर्गत शेअर बाजार कसा असेल?

Maharashtra Politics: निवडणुकीनंतर होणार प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ; सातवड यात्रेतील होईकाची भविष्यवाणी नेमकी काय?

Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' बंद केली, शेतकरी सन्मान, पीएम आवासही थांबणार आहे का? माजी मुख्यमंत्र्यांचा सवाल

Latest Maharashtra News Updates : कोकण, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT