kolhapuri tambda padhara Esakal
साप्ताहिक

Kolhapuri Food: तांबडा रस्सा पांढरा रस्सा खायला लय भारी..! पण तो करतात कसा? ही घ्या रेसिपी..

Kolhapuri Tambda Pandhra Rassa: पांढरा रस्सा करताना तो उकळू नये. पांढरा रस्सा उकळला की तो फुटतो त्यामुळे फक्त गरम करावा

साप्ताहिक टीम

फूडपॉइंट : गंधाली दिंडे

कोल्हापुरी तांबडा रस्सा

साहित्य : अर्धा किलो मटण, २ मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले, १ मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला, १ वाटी ओल्या खोबऱ्याची पेस्ट, पाव वाटी भाजलेले सुके खोबरे, १ चमचा आले पेस्ट, १ चमचा लसूण पेस्ट, २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, ३ चमचे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, अर्धा चमचा धने पूड, ५० ग्रॅम तेल, पाव चमचा हळद, मीठ स्वादानुसार, १ तुकडा दालचिनी, १ हिरवा वेलदोडा, २ लवंग, अर्धे बदाम फूल, १ तमालपत्र.

कृती : प्रथम थोडेसे मीठ लावून मटण स्वच्छ धुऊन घ्यावे. नंतर एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये तेल घालून बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, आले-लसूण पेस्ट घालावी व त्यामध्ये मटण घालावे. तेलामध्ये मटण चांगले परतून घ्यावे. नंतर त्यामध्ये सात कप उकळलेले पाणी घालावे. मटण पूर्ण शिजवून घ्यावे.

लवंग, दालचिनी, बदाम फूल, तमालपत्र कोरडेच खमंग भाजून घ्यावे. नंतर त्याची पावडर करावी. नंतर दुसऱ्या एका पातेल्यामध्ये तेल घालावे, तेलामध्ये ओल्या खोबऱ्याची पेस्ट, सुक्या खोबऱ्याची पेस्ट व कांदा-लसूण चटणी व बारीक केलेल्या खड्या मसाल्याची पावडर घालून चांगले परतून घ्यावे. नंतर भाजलेल्या मसाल्याला पूर्ण तेल सुटले असे वाटले, की त्यामध्ये शिजवलेल्या मटणाचे पाणी म्हणजे शिजवलेल्या मटणाचा फक्त स्टॉक घालावा व रसाला चांगली उकळी येऊ द्यावी.

टीप : पांढरा रस्सा करताना तो उकळू नये. पांढरा रस्सा उकळला की तो फुटतो त्यामुळे फक्त गरम करावा. तसेच मटण किंवा चिकन शिजवताना त्यामध्ये हळदीचा वापर करू नये. तांबडा रस्सा करताना आपण जे वाटण लावतो ते तेलामध्ये चांगले परतले, की रश्शाला चांगला कट येतो.

कोल्हापुरी पांढरा रस्सा

साहित्य : अर्धा किलो मटण किंवा चिकन, पाव वाटी काजू, २ चमचे मगज बी, ४ काळी मिरी, १ दालचिनी तुकडा, २ हिरवे वेलदोडे, २ हिरव्या मिरच्या, ४ चमचे तूप, मीठ स्वादानुसार, अर्धा चमचा आले पेस्ट, अर्धा चमचा लसूण पेस्ट, ३ कप नारळाचे दूध, पाव वाटी बारीक चिरलेला कांदा.

कृती : प्रथम मटण किंवा चिकन स्वच्छ धुऊन घ्यावे. एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये दोन चमचे तूप घालावे. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, आले व लसूण पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे. त्यामध्ये चिकन किंवा मटण घालून, आठ कप पाणी घालावे व चांगले शिजवून घ्यावे. शिजवलेल्या मटणाचा स्टॉक बाजूला काढून घ्यावा. परत एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये दोन चमचे तूप घेऊन त्यामध्ये लवंग, दालचिनी, हिरवे वेलदोडे, काळी मिरी व हिरवी मिरची घालून चांगली फोडणी करून घ्यावी.

काजू व मगज बी आधी दोन तास भिजवून घ्यावे. त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी व ती पेस्ट तुपाच्या फोडणीमध्ये चांगली परतून घ्यावी. नंतर मिश्रण चांगले परतले असे वाटले, की त्यामध्ये चिकन किंवा मटणाचा स्टॉक घालावा. नंतर नारळाचे दूध घालावे व पांढरा रस्सा गरम करावा.

-------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT